• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • हा हिट फॉर्म्यूला वापरुन करा भरघोस कमाई! केवळ 5000 रुपये गुंतवून दरमहा मिळवा 50000

हा हिट फॉर्म्यूला वापरुन करा भरघोस कमाई! केवळ 5000 रुपये गुंतवून दरमहा मिळवा 50000

New Business Idea: भारतात असंख्य चहाप्रेमी आहेत. त्यात 'कुल्हड' अर्थात मातीच्या कप्समधून चहा पिण्याची मजा काही औरच असते. सध्या या कुल्हडची मागणी वाढू लागली आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली, 05 ऑगस्ट: तुम्हाला देखील तुमचा असा छोटेखानी व्यवसाय  (business opportunity) सुरू करायचा असेल, तर काही बिझनेस आयडिया तुम्हाला फायदेशीर ठरू शकतात. आज आम्ही तुम्हाला अशी बिझनेस आयडिया (Small Business Idea) सांगणार आहोत, ज्यातून दर महिन्याला तुमची चांगली कमाई होईल. भारतात असंख्य चहाप्रेमी आहेत.  त्यात 'कुल्हड' अर्थात मातीच्या कप्समधून चहा पिण्याची मजा काही औरच असते. सध्या या कुल्हडची मागणी वाढू लागली आहे. रेल्वे स्थानकांमध्ये, बस डेपोत आणि विमानतळांवर देखील कुल्हडमधून चहा मिळतो. अशावेळी तुम्ही कुल्हड बनवण्याचा आणि विकण्याचा व्यवसाय सुरू करू शकता.  जाणून घ्या तुम्ही कशाप्रकारे हा व्यवसाय सुरू करू शकाल. सरकार देत आहे प्रोत्साहन सरकार सध्या कुल्हडची मागणी वाढवण्यावर लक्ष केंद्रीत करत आहे. काही महिन्यांपूर्वी केंद्रीय रस्ता आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी कुल्हडना प्रोत्साहन देण्यासाठी प्लास्टिक आणि कागदी कपात चहा देण्यास बंदी घालण्याची मागणी केली होती. हे वाचा-SBI Alert! एसबीआयने बंद केली 60000 खाती, यामध्ये तुमचं अकाउंट तर नाही आहे ना? कुल्हड व्यवसायाला चालना देण्यासाठी मोदी सरकारने कुंभार सशक्तीकरण योजना लागू केली. या योजनेंतर्गत, केंद्र सरकार देशभरातील  कुंभारांना वीजेवर चालणारे चाक देत आहे, ज्यावर कुल्हडसह मातीची  इतर भांडीही बनवता येतात. त्यानंतर सरकार या कुंभारांकडून चांगल्या किंमतीत कुल्हड खरेदी करते. 5 हजार रुपये  गुंतवून सुरू करा हा व्यवसाय सध्याची परिस्थिती पाहता अत्यंत कमी रक्कम गुंतवून हा व्यवसाय सुरू करता येईल. याकरता तुम्हाला थोड्या जागेसह 5000 रुपयांची आवश्यकता आहे. गेल्यावर्षी सरकारने 25 हजार विद्युत चाकं वाटल्याची माहिती खादी ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष विनय कुमार सक्सेना यांनी दिली आहे. किती रुपयांत विकता येतील कुल्हड? चहा-कॉफी पिण्यासाठी वापरण्यात येणारं कुल्हड स्वस्त असण्याबरोबर पर्यावरणाच्या दृष्टीने देखील सुरक्षित आहे. सध्याच्या दरानुसार कुल्हडचा दर 50 रुपये शेकडा आहे. याप्रकारे लस्सी आणि दुधाच्या कुल्हडची किंमत 150 रुपये शेकडा आहे. मागणी वाढल्यामुळे यापेक्षा उत्तम दराने विक्री होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे वाचा-रक्षाबंधनाच्या आधी सुरु करा हा व्यवसाय; एका दिवसात होईल1लाखाची कमाई! शहरांमध्ये कुल्हडच्या चहाची किंमत 15-20 रुपये आहे. जर हा व्यवसाय योग्य पद्धतीने चालवला आणि कुल्हड विकण्यावर लक्ष केंद्रीत केलं तर दिवसाला 1000 रुपयांपर्यंत बचतही होईल. प्लास्टिक कपला (Plastic Cups)पर्याय म्हणून कुल्हडमध्ये चहा देण्यात येईल, स्टेशनवर प्लास्टिक कप पूर्णपणे बंद करण्याचा सरकारचा मानस आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published: