नवी दिल्ली, 05 ऑगस्ट: देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) 60,000 पेक्षा जास्त चालू खाती (Current Accounts) बंद केली आहेत. बँकेने ईमेल आणि एसएमएसच्या माध्यमातून ग्राहकांना याबाबत माहिती दिली आहे. काही सरकारी आणि खासगी बँकांनी त्यांच्याकडील करंट अकाउंट्स बंद करण्यास सुरुवात केली आहे. रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करताना बँकांनी लाखोंच्या संख्येत करंट अकाउंट बंद केली आहेत. आरबीआयच्या या निर्णयामुळे MSME आणि छोट्या व्यावसायिकांना अडचणींचा सामना करावा लागेल.
आरबीआयने दिले आहेत हे निर्देश
RBI ने निर्देशात असं म्हटलं आहे की बँकेने त्या ग्राहकांचं करंट अकाउंट त्यांच्या बँकेत उघडू नये ज्यांनी दुसऱ्या बँकेतून कर्ज घेतले आहे. काही ग्राहकांनी एका बँकेकडून लोन घेऊन आणि मग दुसऱ्या बँकेत करंट अकाउंट उघडून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे आरबीआयने असे निर्देश दिले आहेत. अशाप्रकारच्या घटनांवर निर्बंध आणण्यासाठी आरबीआयने हा निर्णय घेतला आहे. आरबीआयच्या या नियमाचं पालन करण्याअंतर्गत एसबीआयने 60000 चालू खाती बंद केली आहेत.
हे वाचा-नाशिकमधील बँकेसह 2 बँकांवर RBI ची मोठी कारवाई, ठोठावला 50 लाखांपेक्षा जास्त दंड
करंट अकाउंट म्हणजे काय?
चालू खातं अर्थात करंट अकाउंटमधून खातेधारकांना एका दिवसात अनेक ट्रान्झॅक्शन करण्याची मुभा असते. तुम्ही एका दिवसात अनेक वेळा एटीएममधून पैसे काढू शकता, बँकेतील व्यवहारही अनेक वेळा करु शकता. या व्यवहारांसाठी तुम्हाला शुल्क द्यावे लागत नाही. हे एक बिझनेस अकाउंट असतं, ज्यामध्ये ओव्हरड्राफ्ट अर्थात खात्यात पैसे नसले तरी पैसे काढण्याची सुविधा मिळते. मात्र या खात्यातील रकमेवर बचत खात्याप्रमाणे व्याज मिळत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: SBI, SBI bank, Sbi bank job, SBI Bank News