मराठी बातम्या /बातम्या /मनी /रक्षाबंधनाच्या आधी सुरु करा हा व्यवसाय; एका दिवसात होईल1लाखाची कमाई!

रक्षाबंधनाच्या आधी सुरु करा हा व्यवसाय; एका दिवसात होईल1लाखाची कमाई!

सणासुदीच्या काळात फक्त एका दिवसात 1 लाख रुपये या व्यवसायातून कमवता (Earn money) येतील.

सणासुदीच्या काळात फक्त एका दिवसात 1 लाख रुपये या व्यवसायातून कमवता (Earn money) येतील.

सणासुदीच्या काळात फक्त एका दिवसात 1 लाख रुपये या व्यवसायातून कमवता (Earn money) येतील.

    मुंबई, 4 ऑगस्ट: रक्षाबंधन असो किंवा दिवाळी, अशा सणासुदीच्या दिवशी मिठाईला महत्त्व असते. आपल्या देशात मिठाईची मागणीही चांगली आहे. त्यामुळे तुम्ही जर एखादा नवीन व्यवसाय (Business opportunity) सुरू करण्याच्या विचारात असाल, तर मिठाईचे दुकान (Sweets Business) हा चांगला पर्याय ठरू शकतो. सणासुदीच्या काळात फक्त एका दिवसात 1 लाख रुपये या व्यवसायातून कमवता (Earn money) येतील. तर, इतर दिवसांचा विचार केल्यास या व्यवसायातून महिन्याला 1 लाख रुपयांचा नफा सहज मिळू शकतो.

    भारतात सण-उत्सवाच्या दिवशी मिठाईची मागणी मोठ्या प्रमाणात असते. याकाळात मिठाईच्या दुकानात खरेदीसाठी गर्दी होते. लवकरच राखी पौर्णिमा येत आहे. यापूर्वीच हा व्यवसाय सुरू केल्यास रक्षाबंधनाच्या दिवशी चांगली कमाई करण्याची संधी मिळेल, त्यामुळेच हा व्यवसाय सुरू करण्याची (How to start own business) ही योग्य वेळ आहे.

    या गोष्टी लक्षात घ्या

    मिठाईचे दुकान उघडताना, आपल्या दुकानात येणाऱ्या ग्राहकांची आवड लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानुसार दुकानात कोणकोणत्या प्रकारच्या मिठाई असाव्यात, हे ठरवावे. मिठाई बनवण्यासाठी तूप, तेल यापैकी काय वापरणार, ग्राहकांना नेमकी तुपातील मिठाई आवडते का तेलामधील, याचा विचार केल्यास हा व्यवसाय करताना जास्त फायदा होईल.

    (हे वाचा:Aadhaar Card असल्यास मोदी सरकार देतंय 1% व्याज दरानं कर्ज? इथे वाचा सविस्तर)

    जागेची निवड-

    मिठाईच्या दुकानासाठी जागा सर्वात महत्त्वाची आहे. दुकान जर बाजारपेठेत किंवा गर्दीच्या ठिकाणी असेल, तर नफा अधिक वाढू शकतो. त्यामुळे मिठाईचे दुकान हे अशा ठिकाणी असावं, जिथे ग्राहकांची गर्दी असेल, इतर खाद्यपदार्थ्यांची दुकाने असतील.

    साहित्याची आवश्यकता-

    मिठाईचं दुकान सुरू करण्यासाठी काही साहित्याचीही आवश्यकता आहे. त्यामध्ये मिठाई बनवण्यासाठी मशीन, जागा, आचारी, वीज कनेक्शन आदींचा समावेश होतो. दुकानातील मिठाई जास्तीतजास्त ग्राहकांनी विकत घ्यावी, यासाठी मार्केटिंग करण्याची गरज आहे.

    (हे वाचा:लवकर पाहा तुमच्याकडे आहेत का या नाणी, नोटा; घरबसल्याच लखपती बनण्याची मोठी संधी  )

    किती करावी लागेल गुंतवणूक?-

    हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सुरुवातीला कमीतकमी दोन ते तीन लाख रुपये गुंतवणूक करावी लागेल. तुमचे घर हे बाजारपेठेत असेल तर घरी सुद्धा हा व्यवसाय सुरू करता येऊ शकतो. एखादा गाळा घेऊन हा व्यवसाय सुरू करता येईल. याशिवाय हा व्यवसाय सुरू करताना कच्चा माल, आचारी, भांडी, काउंटर याचीही आवश्यकता आहे.

    एक लाखांपर्यंत नफा-

    सणासुदीच्या काळात मिठाईचा व्यवसाय हा सर्वाधिक कमाई करून देणाऱ्या व्यवसायांपैकी एक आहे. भारतामध्ये कोणताही सण मिठाईशिवाय साजरा केला जात नाही. त्यामुळे सणासुदीच्या काळात या व्यवसायातून एका दिवसात लाखो रुपये कमाई होऊ शकते. इतर दिवसांचा विचार केल्यास महिन्याला किमान 80 हजार ते 1 लाख रुपये सहज नफा मिळेल. त्यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या मिठाईची गुणवत्ता आणि ग्राहकांच्या आवडीनिवडींची काळजी घ्यावी लागेल.

    First published:
    top videos

      Tags: Business News, Money