मराठी बातम्या /बातम्या /मनी /25 हजारात पती-पत्नीने सुरू केला स्टार्टअप, आज लाखांची उलाढाल; वाचा प्रेरणादायी कहाणी

25 हजारात पती-पत्नीने सुरू केला स्टार्टअप, आज लाखांची उलाढाल; वाचा प्रेरणादायी कहाणी

मध खाण्याचे फायदे

मध खाण्याचे फायदे

`या` दाम्पत्याने मुर्मू आदिवासींच्या मदतीने सुरु केलं स्टार्टअप; आज मध विक्रीतून महिन्याला होते 5 लाखांची उलाढाल

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई : कोरोनामुळे गेल्या दोन ते अडीच वर्षांत नोकऱ्या, व्यवसायावर प्रतिकूल परिणाम झाल्याचं चित्र आहे. कोरोनाकाळात अनेकांना आपली नोकरी गमवावी लागली. अनेकांच्या उद्योग-व्यवसायावर परिणाम झाला. एकीकडे हे चित्र असताना, काही लोकांनी कोरोनाच्या संकटादरम्यान संधी शोधण्याचा प्रयत्न केला.

    या कालावधीत अनेक नवीन स्टार्टअप सुरू झाली. द बेस्ट इंडिया कंपनी ही त्यापैकीच एक स्टार्टअप होय. ही कंपनी मधाचा व्यवसाय करते. विशेष म्हणजे हा व्यवसाय आदिवासींच्या सहभागातून चालवला जातो. मुंबईतील धीरांकुर दाम्पत्याने हे स्टार्टअप सुरू केलं असून, त्यात त्यांना चांगलं यश मिळालं आहे.

    युवरस्टोरीने दिलेल्या वृत्तानुसार मुंबईतील धीरांकुर दाम्पत्याने द बेस्ट इंडिया कंपनी नावाचं स्टार्टअप सुरू केलं आहे. त्यांनी हा व्यवसाय कोरोनाकाळात सुरू केला. या व्यवसायात मुर्मू आदिवासींचा मोठा सहभाग आहे. धीराकुंर दाम्पत्य व्यवसायासोबतच आदिवासींना मदत करत आहे.

    देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या मुर्मू आदिवासी आहेत. त्यांच्या निवडीनंतर हा आदिवासी समाज जोरदार चर्चेत आहे. खरं तर राज्यांची सरकारं आदिवासी विकासासाठी काही ना काही उपक्रम, योजना राबवतात. पण आता स्टार्टअपच्या माध्यमातून धीरांकुर दाम्पत्य आदिवासींना मदत करत आहे. हे स्टार्टअप मधाचा व्यवसाय करतं. हा मध अत्यंत शुद्ध असतो. मुर्मू आदिवासी जंगलातून हा मध मिळवतात. द बेस्ट इंडिया कंपनी या मधाची विक्री करते.

    दुष्काळग्रस्त बीडमध्ये फुलवले झेंडू, आज करतोय लाखोंची कमाई, पाहा PHOTO

    हे स्टार्टअप यशस्वी होण्यासाठी धीरांकुर दाम्पत्याला विशेष परिश्रम घ्यावे लागले. सुमारे 20 वर्षे मीडिया आणि जाहिरात कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या धीरांकुर उपासक यांनी कोरोनाकाळात मधाचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी लष्करात सेवा बजावलेली त्यांची पत्नी अमृता शर्मांच्या मदतीने हा व्यवसाय सुरू केला. कोरोनाकाळात एकीकडे अनेक लोक आपल्या उदरनिर्वाहासाठी साधनं शोधत होते, तेव्हा या दोघांनी डिसेंबर 2020 मध्ये केवळ 25,000 रुपयांत हा व्यवसाय सुरू केला. आज या व्यवसायाची दरमहा सरासरी 5 लाख रुपयांची उलाढाल आहे.

    बिहारमधील बोधगया येथे धीरांकुर यांचा जन्म झाला. 11-12 वर्षाचे असताना त्यांचे वडील देशात शिक्षणासाठी काम करणाऱ्या एका एनजीओसोबत जोडले गेले होते. ते बिहारमधील धोंगेश्वरी येथे एक शाळा उभारण्याचं काम करत होते. त्यामुळे बऱ्याचदा त्यांचा मुक्काम धोंगेश्वरी येथे असे. त्यावेळी धीरांकुर यांना 20 किलोमीटर दूर त्यांच्यासाठी जेवण घेऊन जावं लागे.

    हे अंतर पार करण्यासाठी बऱ्याचदा त्यांना बसमध्ये गर्दीतून प्रवास करावा लागे आणि सहा ते सात किलोमीटर पायपीट करावी लागे. बिहारमधील गया येथे उन्हाळ्यात तापमान 46ते 47 अंश सेल्सिअसपर्यंत असते. त्यावेळी धीरांकुर यांनी त्यांच्या वडिलांना घरापासून दूर दुर्गम भागात असं काम करण्याची गरज काय, असा प्रश्न विचारला. त्यावर त्यांचे वडील म्हणाले, ``जेव्हा आपल्याला आयुष्यात काही क्षणच शिल्लक आहेत, याची जाणीव होईल तेव्हा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे असं काम करणं गरजेचं आहे.`` वडिलांच्या या उत्तरातून धीरांकुर यांना मुर्मू आदिवासींसोबत मधाचा व्यवसाय करण्याची प्रेरणा मिळाली.

    कोरोनाकाळात लॉकडाउनदरम्यान प्रत्येक जण आपल्या नातेवाईकांशी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संवाद साधत होता. त्यावेळी धीरांकुरदेखील त्यांच्या नातेवाईकांशी याच माध्यमातून संपर्कात होते. एक दिवस त्यांचा व्हिडिओ कॉलद्वारे धाकटी बहीण आणि मेहुण्यांशी संवाद सुरु होता. त्यावेळी त्यांना किचनमध्ये मधाची एक बरणी दिसली.

    नोकरी सोडून शेती करतोय 'हा' तरुण, वर्ध्यात स्ट्रॉबेरीच्या लागवडीतून 4 लाखांचे उत्पन्न!

    हा मध त्यांनी हासिमारामधील जंगलात राहणाऱ्या मुर्मू आदिवासींकडून खरेदी केला होता. हे पाहून धीरांकुर यांनीदेखील हा मध मागवला. धीरांकुर यांना या मधाची चव खूप आवडली. त्यानंतर त्यांनी अजून मध मागवला आणि मित्र आणि नातेवाईकांना टेस्ट करण्यासाठी दिला. मित्र आणि नातेवाईकांनादेखील हा मध आवडल्यानंतर धीराकुंर यांनी 2020 मध्ये स्वतःचा मध विक्रीचा व्यवसाय सुरू केला.

    मुर्मू आदिवासींचा पाठिंबा मिळाला नसता तर धीरांकुर यांची द बेस्ट इंडिया कंपनी आज जिथे आहे तिथे कधीच पोहोचली नसती. दुसरीकडे कूचबिहारमधील मुर्मू आदिवासींनाही या पूर्वी कधीही अशाप्रकारे मदत मिळाली नव्हती. मात्र आता या कंपनीकडून त्यांना मदत मिळत आहे.

    मुर्मू आदिवासी गेल्या अनेक वर्षांपासून जंगलांतून मध गोळा करून त्याची विक्री करतात.

    त्यांना या स्टार्टअपमुळे मधाच्या विक्रीसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला आहे. आज दोघंही एकमेकांच्या मदतीने यशाची चव चाखत आहेत. कंपनी जंगलांतून मिळत असलेला शुद्ध मध देशातील कानाकोपऱ्यांत पोहोचवत आहेत.

    कंपनी आंब्यापासून मोहरीपर्यंत विविध प्रकारच्या चवीचे मध विकते. हे फ्लेवर मधात मिसळले जात नाहीत. नैसर्गिक पद्धतीने या चवीचा मध मिळतो. मधमाशांनी कोणत्या फुलांमधून मध गोळा केलाय त्यावर मधाची चव ठरते.

    त्याचप्रमाणे आंब्याची फुलं, मोहरीची फुलं किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या फुलांपासून गोळा केलेला मध हीच चव देतो. वेगवेगळ्या भागात विविध प्रकारची फुलं असतात, ज्यामुळे मधाची चवदेखील वेगवेगळी असते. द बेस्ट इंडिया कंपनी या नैसर्गिक मधाचा पुरवठा ई-कॉमर्स वेबसाईट अ‍ॅमेझॉन आणि tbic.in या स्वतःच्या वेबसाईटच्या माध्यमातून देशभरात करते.

    First published:

    Tags: Business, Business News, Mumbai, Startup, Startup Success Story