रोहित देशपांडे, बीड, 24 जानेवारी : शेती करताना शेतकऱ्यांना खूप मेहनत घ्यावी लागते. अनेकदा पूर्ण मेहनत घेऊनही शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटांमुळे पुरेसे उत्पन्न मिळत नाही. कधी पिकांना भावही मिळत नाही. परंतु योग्य नियोजन करुन आणि अभ्यासपूर्ण शेती केल्यास तुम्हाला नफा मिळू शकतो. याचेच एक उदाहरण आपण आज पाहणार आहोत.
बीड जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने दोन एकर क्षेत्रामध्ये झेंडूच्या फुलांची लागवड केली आहे. या शेतीतून त्याने लाखो रुपयांचे उत्पन्न देखील घेतलं आहे.
शेतकरी पारंपारिक शेतीला फाटा देत आधुनिक शेतीकडे आपला मोर्चा वळवत आहेत. कमी मेहनत आणि अगदी कमी वेळात जास्तीत जास्त उत्पन्न मिळावे अशी प्रत्येक शेतकऱ्याची अपेक्षा असते. बीड जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने आधुनिक शेती करत लाखो रुपयांचे उत्पन्न घेतले आहे.
शेतकरी आता आधुनिक शेती करत आहेत. पारंपारिक पिक न घेता नवीन काही तरी प्रयोग शेतकऱ्यांकडून केला जातोय.
बीडमधील लवूळ या गावातील आनंद शिंदे यानी हा प्रयोग केला. त्यांनी दोन एकर क्षेत्रावर झेंडू फुलाची लागवड केली.
या लागवडीमधून आनंद यांना जवळपास 20 टन झेंडूच्या फुलांचे उत्पादन झाले. त्यांना केवळ दोन महिन्यांमध्ये 4 लाख 50 हजार रुपयांचे उत्पन्न देखील मिळाले आहे.