मराठी बातम्या /बातम्या /मनी /

नोकरीची चिंता सोडून AMUL सह सुरू करा स्वत:चा व्यवसाय, महिन्याला होईल 5 लाखांची कमाई

नोकरीची चिंता सोडून AMUL सह सुरू करा स्वत:चा व्यवसाय, महिन्याला होईल 5 लाखांची कमाई

तुम्ही अमूलसह (business opportunity with amul) जोडले जाऊन दर महिन्याला भरभक्कम कमाई करू शकता. या सुवर्णसंधीमध्ये नुकसान होण्याची शक्यता अत्यल्प आहे.

तुम्ही अमूलसह (business opportunity with amul) जोडले जाऊन दर महिन्याला भरभक्कम कमाई करू शकता. या सुवर्णसंधीमध्ये नुकसान होण्याची शक्यता अत्यल्प आहे.

तुम्ही अमूलसह (business opportunity with amul) जोडले जाऊन दर महिन्याला भरभक्कम कमाई करू शकता. या सुवर्णसंधीमध्ये नुकसान होण्याची शक्यता अत्यल्प आहे.

    मुंबई, 09 ऑक्टोबर: कोरोना काळात (Coronavirus Pandemic in India) अनेकांनी नोकऱ्या गमावल्या. अद्यापही मोठा तरुणवर्ग नोकरीच्या शोधात आहे. मात्र काहींनी नोकरीच्या संधीची वाट न पाहत स्वत:चा व्यवसाय सुरू केला आणि यामध्ये त्यांनी जम बसवला आहे. दरम्यान तुम्ही देखील स्वत:चा व्यवसाय (Start Your Own Business) सुरू करुन त्यातून पैसे कमावू इच्छित (Earn Money) असाल तर देशातील आघाडीची डेअरी प्रोडक्ट बनवणारी कंपनी अमूल (Amul Business Idea) तुम्हाला ही संधी देत आहे. तुम्ही अमूलची फ्रँचायझी घेऊन (business opportunity with amul) दरमहा चांगली कमाई करू शकता. 2 लाखात सुरू करता येईल व्यवसाय अमूल कोणत्याही रॉयल्टी किंवा प्रॉफिट शेअरिंगशिवाय फ्रँचायझी (amul franchise) देत ​​आहे.  तुम्ही 2 लाख ते 6 लाख रुपये खर्च करून तुमचा व्यवसाय सुरू करू शकता. व्यवसायाच्या सुरुवातीला चांगला नफा मिळू शकतो. फ्रँचायझीद्वारे दरमहा सुमारे 5 ते 10 लाख रुपयांची विक्री होऊ शकते.  दरम्यान तुम्ही कोणत्या ठिकाणी व्यवसाय सुरू करणार आहात त्याववर देखील ही कमाई अवलंबून असते. हे वाचा-Air India Sale:टाटांसमोर मोठं आव्हान, 4विमानसेवांचं शेड्यूलिंग सांभाळण्याची कसरत किती करावी लागेल गुंतवणूक? अमूल दोन प्रकारच्या फ्रँचायझी देत ​​आहे. पहिला प्रकार म्हणजे अमूल आउटलेट, अमूल रेल्वे पार्लर किंवा अमूल कियोस्कची फ्रँचायझी आणि दुसरा प्रकार म्हणजे अमूल आईसक्रीम स्कूपिंग पार्लरची फ्रँचायझी. जर तुम्हाला पहिल्यामध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला 2 लाख रुपये गुंतवावे लागतील. जर तुम्ही दुसरी फ्रेंचाइजी घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला 5 लाखांची गुंतवणूक करावी लागेल. शिवाय यामध्ये नॉन-रिफंडेबल ब्रँड सिक्युरिटी म्हणून 25 ते 50 हजार रुपये भरावे लागतील. किती मिळेल कमिशन? यात एमआरपीवर कमिशन मिळेल. अमूल आउटलेट घेतल्यावर, कंपनी अमूल उत्पादनांच्या किमान विक्री किंमतीवर (एमआरपी) कमिशन देते. यामध्ये एका दुधाच्या पिशवीवर 2.5 टक्के, दुग्धजन्य पदार्थांवर 10 टक्के आणि आइसक्रीमवर 20 टक्के कमिशन मिळते. अमूल आइस्क्रीम स्कूपिंग पार्लरची फ्रेंचाइजी घेतल्यावर रेसिपीवर आधारित आइसक्रीम, शेक, पिझ्झा, सँडविच, हॉट चॉकलेट ड्रिंकवर 50 टक्के कमिशन उपलब्ध आहे. त्याचबरोबर कंपनी प्री-पॅक्ड आइसक्रीमवर 20 टक्के आणि अमूल उत्पादनांवर 10 टक्के कमिशन देते. हे वाचा-RBIने बदलला बँक व्यवहारासंबंधित महत्त्वाचा नियम, 2 लाखांऐवजी पाठवता येणार 5 लाख एवढी जागा आवश्यक जर तुम्हाला अमूल आउटलेट घ्यायचे असेल तर तुमच्याकडे 150 वर्ग फुट जागा आवश्यक आहे. तर अमूलच्या आइसक्रीम पार्लरसाठी 300 वर्ग फुट जागा आवश्यक आहे. या फ्रँचायझीसाठी अप्लाय करण्यासाठी retail@amul.coop वर तुम्हाला मेल करावा लागेल. याशिवाय अधिक माहितीसाठी http://amul.com/m/amul-scooping-parlours या लिंकवर देखील क्लिक करू शकता.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Business, Business News, Small business

    पुढील बातम्या