मराठी बातम्या /बातम्या /मनी /

35 पैशांचा शेअर पोहोचला 200 रुपयांवर! तीन वर्षात 1 लाखाचे बनले 5 कोटींपेक्षाही जास्त

35 पैशांचा शेअर पोहोचला 200 रुपयांवर! तीन वर्षात 1 लाखाचे बनले 5 कोटींपेक्षाही जास्त

गेल्या दोन वर्षात अनेक शेअर्सनी गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर रिटर्न (Share Market Multibagger Return) दिला आहे. फ्लोमिक ग्लोबल लॉजिस्टिक्स (Flomic Global Logistics) या कंपनीचा शेअर देखील भारतातील मल्टीबॅगर स्टॉकपैकी एक आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 14 डिसेंबर: गेल्या दोन वर्षात अनेक शेअर्सनी गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर रिटर्न (Share Market Multibagger Return) दिला आहे. फ्लोमिक ग्लोबल लॉजिस्टिक्स (Flomic Global Logistics) या कंपनीचा शेअर देखील भारतातील मल्टीबॅगर स्टॉकपैकी एक आहे. हा मल्टीबॅगर स्टॉक एक पेनी स्टॉक (Penny Stock investments) आहे. या स्टॉकची किंमत 0.35 पैसे प्रति शेअरवरुन 198.45 रुपये प्रति शेअरवर पोहोचली आहे. जवळपास 3 वर्षात हा शेअर 567 पटींनी वाढला आहे.

या मल्टीबॅगर पेनी स्टॉकच्या शेअरच्या किंमतीच्या इतिहासावर (Share Price History) नजर टाकल्यास, हे समजते की फ्लोमिक ग्लोबल लॉजिस्टिक शेअरची किंमत गेल्या 6 महिन्यांत ₹10.37 वरून ₹198.45 पर्यंत वाढली आहे. या कालावधीत हा शेअर सुमारे 1,913 टक्क्यांनी वाढला आहे.

हे वाचा-SBI चाही डिजिटल करन्सीला पाठिंबा; सीमे पलीकडच्या आर्थिक व्यवहारांसाठी फायदेशीर

1 लाखाचे 5.67 कोटी

जर एखाद्या गुंतवणूकदाराने तीन वर्षांपूर्वी या पेनी स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याचे 1 लाख रुपये 5.67 कोटी झाले असते. या स्टॉकने 28 ऑक्टोबर 2021 रोजी ₹216 चा 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला होता. तर 8 डिसेंबर 2020 रोजी या कंपनीचा शेअर 52 आठवड्यांच्या नीचांकी (रु. 1.53) पातळीवर होता. सप्टेंबर तिमाहीत, फर्मने निव्वळ नफ्यात 17.65% ची घट नोंदवली.

जाणून घ्या फ्लोमिक ग्लोबल लॉजिस्टिक बद्दल..

फ्लोमिक ग्लोबल लॉजिस्टिक लिमिटेड एक लॉजिस्टिक कंपनी म्हणून काम करते. कंपनी जगभरातील ग्राहकांना गोदाम, वितरण, मालवाहतूक अग्रेषण, सीमाशुल्क ब्रोकिंग, कार्गो, कन्सॉलिडेशन, मल्टीमॉडल वाहतूक आणि कंट्री ट्रेड सेवा प्रदान करते.

हे वाचा-PF Balance: पीएफ बॅलन्स तपासणं झालं सोपं, मिस्ड कॉल देऊनही होईल काम

मल्टीबॅगर स्टॉक्स म्हणजे काय?

गुंतवणुकदारांच्या गुंतवणुकीच्या रक्कम अनेक पटींनी वाढवणाऱ्या स्टॉकला मल्टीबॅगर म्हणतात. कंपनीची कामगिरी पाहून तुम्ही मल्टीबॅगर स्टॉक्स सहज ओळखू शकता. मल्टीबॅगर शेअर्समधील प्रति शेअर कमाई खूप जास्त आहे, ज्यामुळे गुंतवणुकीच्या रकमेवर तुमचे लाभांश उत्पन्न वाढते.

First published:

Tags: Share market