मराठी बातम्या /बातम्या /मनी /

PF Balance: पीएफ बॅलन्स तपासणं झालं सोपं, मिस्ड कॉल देऊनही होईल काम

PF Balance: पीएफ बॅलन्स तपासणं झालं सोपं, मिस्ड कॉल देऊनही होईल काम

How to check PF Balance: जर तुम्ही नोकरदार वर्गापैकी आहात तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. हे काम तुम्ही घरबसल्या करू शकता.

How to check PF Balance: जर तुम्ही नोकरदार वर्गापैकी आहात तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. हे काम तुम्ही घरबसल्या करू शकता.

How to check PF Balance: जर तुम्ही नोकरदार वर्गापैकी आहात तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. हे काम तुम्ही घरबसल्या करू शकता.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 13 डिसेंबर: जर तुम्ही नोकरदार वर्गापैकी आहात तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. हे काम तुम्ही घरबसल्या करू शकता. तुम्ही तुमच्या पीएफ खात्यात (PF Balance) किती बॅलन्स आहे हे वेबसाइट किंवा उमंग अॅपच्या (UMANG App)माध्यमातून तपासून पाहू शकता. याशिवाय मिस्ड कॉल किंवा एसएमएसच्या माध्यमातून देखील तुम्ही तुमच्या पीएफ खात्यात (how to check pf account balance) किती रक्कम आहे ते पाहू शकता.

1. Missed Call च्या माध्यमातून जाणून घ्या PF Balance

>> यूएएन पोर्टलवर नोंदणीकृत सदस्यांना मिस्ड कॉल देऊन त्यांच्या खात्यातील शिल्लक जाणून घेता येईल. आपल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून 011-22901406 वर एक मिस कॉल करावा लागेल.

>> यानंतर पीएफचा तपशील तुम्हाला ईपीएफओच्या मेसेजद्वारे प्राप्त होईल. दोन रिंगनंतर हा कॉल स्वयंचलितपणे डिस्कनेक्ट होईल.

>> या सेवेसाठी कोणतेही पैसे आकारले जाणार नाहीत. ईपीएफओ UAN सेवा प्रदान करते, ज्याद्वारे खातेदार त्यांच्या पीएफ खात्यातील शिल्लक पाहू शकता.

हे वाचा-Home Loan संदर्भात या 10 गोष्टी ठेवा लक्षात; तुमचा अर्ज कधीच फेटाळला जाणार नाही

2. SMS च्या माध्यमातून जाणून घ्या पीएफ बॅलन्स

>> SMS च्या माध्यमातून तुमच्या पीएफ खात्यातील रक्कम तपासण्यासाठी तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून 7738299899 या नंबरवर मेसेज करावा लागेल. EPFOHO UAN ENG असे लिहून तुम्हाला हा मेसेज करावा लागेल.

>> ENG म्हणजे इंग्रजी भाषेमध्ये तुम्हाला माहिती मिळेल. परंतू तुम्हाला अन्य कोणत्या भाषेत माहिती हवी असेल तर ENG ऐवजी तुम्हाला हव्या असलेल्या भाषेची पहिली तीन अक्षरं तुम्हाला टाकावी लागतील.

>> हिंदी, पंजाबी, गुजराती, मराठी, कन्नड, तेलुगु, तमिळ, मलयाळम आणि बंगाली भाषेमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. या क्रमांकावर मेसेज करण्यासाठी ईपीएफओ मध्ये तुमचा नंबर रजिस्टर्ड असणे अनिवार्य आहे.

3. Umang App च्या माध्यमातून

>> याकरता तुमचे उमंग App (Unified Mobile Application for New-age Governance) उघडा आणि ईपीएफओवर क्लिक करा. तुम्हाला एका वेगळ्या पेजवर इम्प्लॉयी-सेंट्रिक सर्विस (employee-centric services) वर क्लिक करावे लागेल.

>> याठिकाणी व्ह्यू पासबुकवर क्लिक करा आणि तुमचा यूएएन नंबर आणि पासवर्ड (OTP) प्रविष्ट करा.

>> ओटीपी तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड क्रमांकावर येईल. यानंतर तुम्ही तुमचा बॅलन्स तपासू शकता.

>> याठिकाणी तुम्ही पासबुक पाहण्याव्यतिरिक्त क्लेम देखील करू शकता. हे एक सरकारी App आहे. तुम्ही विविध सुविधांचा फायदा या अॅपमधून घेऊ शकता.

हे वाचा-Amazon Prime Membership उद्यापासून महागणार! कमी किंमतीत आजच खरेदी करा

4. वेबसाइटच्या माध्यमातून तपासा पीएफमधील शिल्लक

>> याकरता तुम्हाला Epfindia.gov.in वर लॉग इन करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला ई-पासबुकवर क्लिक करावं लागेल.

>> त्यावेळी तुम्ही passbook.epfindia.gov.in या नवीन पेजवर याल. याठिकाणी युजर नेम, तुमचा UAN क्रमांक, पासवर्ड आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करून ई-पासबुकवर क्लिक करा.

>> याठिकाणी एक नवीन पेज ओपन होईल. याठिकाणी मेंबर आयडीवर क्लिक करा आणि अशाप्रकारे तुम्ही खात्याचील रक्कम वेबसाइटच्या माध्यमातून तपासू शकता.

First published:

Tags: Epfo news, Pf, PF Amount, Pf news