मराठी बातम्या /बातम्या /मनी /मोठी बातमी! SBI चाही डिजिटल करन्सीला पाठिंबा; सीमे पलीकडच्या आर्थिक व्यवहारांसाठी ठरणार फायदेशीर

मोठी बातमी! SBI चाही डिजिटल करन्सीला पाठिंबा; सीमे पलीकडच्या आर्थिक व्यवहारांसाठी ठरणार फायदेशीर

SBI नं काय म्हंटल जाणून घ्या

SBI नं काय म्हंटल जाणून घ्या

भविष्यात सीबीसीडी (CBCD) सीमे पलीकडच्या व्यवहारांचं पूर्ण स्वरुप बदलून टाकणार आहेत. जगभरातील देश या सीबीसीडी म्हणजेच डिजिटल करन्सीपासून दूर राहू शकणार नाहीत.

  मुंबई, 14 डिसेंबर: आपल्या देशात Central Bank Digital Currency (CBDC) म्हणजेच डिजिटल करन्सी ही संकल्पना लवकरच प्रत्यक्षात येऊ शकते. सेंट्रल बँकेद्वारा प्रसिध्द करण्यात आलेला हा डिजिटल ॲसेट सीमे पलीकडल्या व्यवहारांसाठी (cross-border deals) अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. देशात एकीकडे क्रिप्टोकरन्सी रेग्युलेटरी फ्रेमवर्क (cryptocurrency regulatory framework) कधी येईल याची प्रतिक्षा आहे.

  या पार्श्वभूमीवर स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) चे व्यवस्थापकीय संचालक (Managing Director Of SBI) सी. एस. शेट्टी (C. S. Shetty) यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी ISB Leadership Summit 2021 मध्ये सहभागी झालेल्यांना मार्गदर्शन केलं. भविष्यात सीबीसीडी (CBCD) सीमे पलीकडच्या व्यवहारांचं पूर्ण स्वरुप बदलून टाकणार आहेत. जगभरातील देश या सीबीसीडी म्हणजेच डिजिटल करन्सीपासून दूर राहू शकणार नाहीत. सीबीसीडीची सुरुवात झाल्यावर बँकेच्या मध्यस्थीच्या भूमिकेचं काय होणार, देशाच्या चलन आणि राजकोशीय नीतींवर याचा प्रभाव कसा पडणार अशा अनेक शंका उपस्थित केल्या जातील.

  पुढच्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये रिझर्व्ह बँक (RBI) एका पायलट प्रोजेक्टच्या रुपात डिजिटल करन्सी लाँच करण्यावर काम करत असल्याची बातमी काही दिवसांपूर्वी आली होती. आम्ही पुढच्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीपर्यंत डिजिटल करन्सीशी निगडीत पायलट प्रोजेक्ट लाँच करण्याबाबत उत्सुक आहोत, असं RBI च्या पेमेंट आणि सेटलमेंट विभागाचे मुख्य महाप्रबंधक पी. वासुदेवन यांनीही म्हटलं होतं.

  'या' स्टॉकमध्ये वर्षभरात 110% रिटर्न; शेअर आणखी वर जाण्याचा तज्ज्ञांचा अंदाज

  डिजिटल करन्सीचा वापर कसा होणार?

  भारताच्या केंद्रीय बँके म्हणजे रिझर्व्ह बँकेकडून जारी करण्यात येणारी ही डिजिटल करन्सी म्हणजेच CBDC मूलत: भारतासाठी मान्यता असलेल्या चलनाचं डिजिटल रुप असणार आहे. भारतात हे अंतर्गत वापरासाठीचं चलन म्हणून वापरता येईल. यापूर्वी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरनं याबद्दल एक महत्त्वाचं वक्तव्य केलं होतं. “डिसेंबरपर्यंत CBDC चं सॉफ्ट लाँचिंग होऊ शकतं. मात्र हे नेमकं कधी लाँच होईल याबद्दल RBI नेमका कालावधी सांगितलेला नाही ”, असं ते म्हणाले होते.

  “सध्या आम्ही त्याच्या लाँचिंगवरच काम करत आहोत आणि CBDC शी संबंधित विविध मुद्दे आणि छोट्या छोट्या गोष्टींवर काम केलं जात आहे. लाँच झाल्यावर लगेचच CBDC ची सवय होणं शक्य नाही. हे कसं लागू केलं जाईल यावर त्याबाबतची भूमिका अवलंबून असणार आहे. मात्र आम्ही याच्या लाँचिगबाबत कोणतीही घाई करणार नाही, ” असंही ते म्हणाले. “CBDC शी निगडीत प्रत्येक गोष्ट RBI कडून काळजीपूर्वक तपासली जात आहे. यामध्ये रिटेल व्हेरिफिकेशन आणि डिस्ट्रिब्युशन चॅनेलसारखे विभागही यामध्ये सहभागी आहेत.” असंही ते म्हणाले.

  First published:

  Tags: Digital currency, Money, SBI