जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Budget 2022 LIVE: पुढील 5 वर्षात मिळणार 60 लाख रोजगार, अर्थमंत्र्यांची महत्त्वाची माहिती

Budget 2022 LIVE: पुढील 5 वर्षात मिळणार 60 लाख रोजगार, अर्थमंत्र्यांची महत्त्वाची माहिती

Budget 2022 LIVE: पुढील 5 वर्षात मिळणार 60 लाख रोजगार, अर्थमंत्र्यांची महत्त्वाची माहिती

Budget 2022 LIVE: निर्मला सीतारामन चौथ्यांना अर्थसंकल्प सादर करत आहेत. दरम्यान पुढील पाच वर्षात 60 लाख रोजगार उपलब्ध होतील असा विश्वास अर्थमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 01 जानेवारी: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitaraman) लोकसभेत अर्थसंकल्प (Union Budget 2022) सादर करत आहेत. निर्मला सीतारामन चौथ्यांना अर्थसंकल्प सादर करत आहेत. दरम्यान पुढील पाच वर्षात 60 लाख रोजगार उपलब्ध होतील असा विश्वास अर्थमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की आत्मनिर्भर भारताचे (Atmanirbhara Bharat) उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रोडक्ट लिंक्ड इन्सेंटिव्ह (PLI) योजनेला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला आहे, ज्यामध्ये पुढील पाच वर्षांमध्ये 60 लाख नवीन रोजगार निर्माण करण्याची क्षमता आहे. शिवाय या पाच वर्षात 30 लाख कोटीचे अतिरिक्त उत्पादन निर्माण होईल.

जाहिरात

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांपूर्वी सादर होणाऱ्या या बजेटकडून सामान्यांच्या विशेष अपेक्षा होत्या. या दरम्यान करण्यात आलेली 60 ला रोजगारांची घोषणा देशातील तरुणांसाठी महत्त्वाची आहे. निर्मला सीतारामन यांनी असेही म्हटले की, आत्मनिर्भर भारत अंतर्गत 16 लाख नोकऱ्या दिल्या जातील. मेक इन इंडिया अंतर्गत 60 लाख रोजगार उपलब्ध होतील. हे वाचा- Income Taxpayers या अर्थसंकल्पातून काय मिळाले? काय आहेत बजेटमधील मोठ्या घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यावेळी म्हणाल्या की, ‘या बजेटमधून भारताला पुढी 25 वर्षांसाठी पाया मिळेल. पुढील आर्थिक वर्षात आर्थिक वाढ 9.2% राहण्याची अपेक्षा आहे. चालू वर्षात भारताची आर्थिक वाढ 9.2% राहील असा अंदाज आहे, हा अंदाज सध्याच्या प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये सर्वाधिक आहे.’ अर्थमंत्री सीतारामन यांनी सांगितले की एअर इंडियाची निर्गुंतवणूक पूर्ण झाली आहे आणि एलआयसीचा आयपीओ आता लवकरच येईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात