मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Multibagger Stock: या शेअरने 3 वर्षात दिला 800 टक्के रिटर्न, 1 लाखाचे केले 9.25 लाख; तुमच्याकडे आहे का हा स्टॉक?

Multibagger Stock: या शेअरने 3 वर्षात दिला 800 टक्के रिटर्न, 1 लाखाचे केले 9.25 लाख; तुमच्याकडे आहे का हा स्टॉक?

सध्या एव्हरेस्ट काँटो (Everest Kanto Share Price) या स्मॉल कॅप शेअरचा (Small Cap Share) मल्टिबॅगर शेअर्सच्या यादीत समावेश झाला आहे. या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअरनं आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे.

मुंबई, 02 फेब्रुवारी: शेअर बाजारात (Share Market Latest News Update) कोणता शेअर कधी उसळी घेईल आणि कधी खाली कोसळेल याचा अचूक अंदाज करणं अतिशय कठीण असतं. अनेकदा शेअर बाजारात अगदी किरकोळ किंमतीचे शेअर एकदम झेप घेतात आणि त्यात सतत वाढ होत राहते, त्यामुळे अगदी अल्प गुंतवणूकीवरही गुंतवणूकदारांना प्रचंड फायदा मिळतो. अशा शेअर्सना मल्टिबॅगर शेअर (Multibagger Share) असं म्हणतात. सध्या एव्हरेस्ट कांटो (Everest Kanto Share Price) या स्मॉल कॅप शेअरचा (Small Cap Share) मल्टिबॅगर शेअर्सच्या यादीत समावेश झाला आहे. या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअरनं आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे. तीन वर्षांत या समभागाने तब्बल 800 टक्क्यांनी झेप घेतली आहे. परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनीदेखील (FPIs) एव्हरेस्ट कांटोमध्ये गुंतवणूक केली आहे. 1 फेब्रुवारी 2019 रोजी एव्हरेस्ट कांटोच्या एका शेअरची किंमत केवळ 27 रुपये 55 पैसे इतकी होती, आज या शेअरची किंमत 255 वर पोहोचली आहे. मुंबई शेअर बाजारात (BSE) इंट्राडे व्यवहारांमध्ये या शेअरनं आज कालच्या भावात 3.5 टक्क्यांनी वाढ नोंदवली. गेल्या दोन दिवसांत हा शेअर 8 टक्क्यांनी वाढला आहे. हे वाचा-फेब्रुवारी महिन्यात 13 बंद राहणार बॅंका; लवकरात लवकर पूर्ण करा बँकिंग कामं एव्हरेस्ट कांटोचा शेअर 5 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांच्या टप्प्यावर सरासरीच्या वर ट्रेडिंग करत आहे. एका वर्षाच्या कालावधीत, या शेअरच्या किंमतीत तब्बल 354 टक्क्यांनी वाढ झाली असून, 2022 मध्ये तो 12.7 टक्क्यांनी वाढला आहे. डिसेंबर 2021 ला संपलेल्या तिमाहीअखेर या कंपनीच्या 11 प्रवर्तकांकडे 67.39 टक्के हिस्सा किंवा 7.56 कोटी शेअर्स आहेत. त्याचवेळी, 42 हजार 419 सार्वजनिक भागधारकांकडे 32.61 टक्के हिस्सा, म्हणजे 3.65 कोटी शेअर्स आहेत. 21 परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांकडेही कंपनीचे 6.22 लाख शेअर्स किंवा 0.56 टक्के हिस्सा आहे. लाखाचे झाले साडे नऊ लाख एखाद्या गुंतवणूकदाराने 1 फेब्रुवारी 2019 रोजी एव्हरेस्ट कांटोच्या शेअर्समध्ये एक लाखाची गुंतवणूक केली असेल, तर तीन वर्षांत ती 9.25 लाख रुपये झाली असती. कंपनीच्या व्यवसायात सातत्याने होत असलेली वाढ हे कंपनीच्या शेअरमध्ये वाढ होण्याचे प्रमुख कारण असल्याचं शेअर बाजार तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हे वाचा-Budget 2022 | देशात तुटीचाच अर्थसंकल्प का होतो सादर? याचे फायदे तोटे काय? एव्हरेस्ट कांटो ही फॅब्रिकेटेड मेटलची उत्पादने (Fabricated Metal Products) बनवते. कंपनी सीमलेस गॅस सिलिंडर तसेच इतर सिलिंडर, द्रवीभूत पेट्रोलियम गॅस आणि इतर वायूंसाठी उपकरणे तयार करते. कंपनीचा व्यवसाय भारत, चीन, अमेरिका, संयुक्त अरब अमिराती, हंगेरी आणि थायलंड या देशांमध्ये पसरलेला आहे.
First published:

Tags: Money, Share market

पुढील बातम्या