COVID-19 : गरिबांना मोदी सरकाराचा मदतीचा हात, आर्थिक साहाय्यासाठी 6,834 कोटी

COVID-19 : गरिबांना मोदी सरकाराचा मदतीचा हात, आर्थिक साहाय्यासाठी 6,834 कोटी

कोरोना व्हायरसचा (Coronavirus) मोठा फटका हातावरचं पोट असणाऱ्या मजूर वर्गाला बसला आहे. सरकारकडून काही योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 07 एप्रिल : कोरोना व्हायरसचा (Coronavirus) मोठा फटका हातावरचं पोट असणाऱ्या मजूर वर्गाला बसला आहे. सरकारकडून काही योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. मोदी सरकारने या गरीब वर्गाच्या खात्यांमध्ये पैसे पाठवण्यास सुरूवात केली आहे. मजूरांसाठी सुरू करण्यात आलेल्या मनरेगा योजनेअंतर्गत केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाने 6,834 कोटी रुपये जारी केले आहेत.  एवढी रक्कम पाठवण्यात येणार असल्याची माहिती स्वत: ग्रामविकास मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिली आहे. सर्व राज्यांकडे ही रक्कम देण्यात येणार आहे.

(हे वाचा-कोरोनाच्या संकटकाळात खूशखबर! या कंपनीने कर्मचाऱ्यांचा पगार 25 टक्क्यांनी वाढवला)

मंत्रालयातील सूत्रांच्या माहितीनुसार वर्ष 2020-21 साठी पहिला हफ्ता 15 एप्रिल 2020 आधी राज्यांना पाठवण्यात येणार आहे. सर्व राज्यांमध्ये मनरेगा मजूरी भिन्न आहे. महाराष्ट्रात मनरेगा मजूराला प्रतिदिन 234 रुपये मिळतात. झारखंड आणि बिहारमध्ये मनरेगा मजूराला प्रतिदिन 171 रुपये मिळतात. तर हरियाणामध्ये सर्वाधिक 284 रुपये मिळतात. सामान्यपणे या मजूरांना वर्षभरात केवळ 100 दिवस काम मिळतं.

केंद्र सरकारने 20 रुपयांनी वाढवली मजूरी

ग्रामविकास विभागाने कोरोनाची वाढती समस्या लक्षात घेता मजूरांना मिळणाऱ्या मजूरीमध्ये काही बदलाव केले आहेत. 1 एप्रिलपासून हे बदल लागू झाले आहे. देशभरातील मनरेगा मजूरांच्या वेतनात 20 रुपयांनी वाढ केली आहे. प्रत्येक राज्यातील मनरेगा मजूराला प्रतिदिन 20 रुपये अधिकचे मिळणार आहेत. या योजनेमुळे आपापल्या गावी पलायन करणाऱ्या मजुरांना अटकाव आणण्याचा सरकारचा मानस आहे. यातून त्यांच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा करण्यात येत आहेत.

अन्य बातम्या

लॉकडाऊनमुळे SBI ने बंद केलं क्रेडिट कार्डचं कार्यालय, केवळ आवश्यक सुविधा सुरू

या सरकारी बँकेने घटवले व्याजदर, आजपासून गृह-वाहन कर्जावरील EMI स्वस्त

जाणून घ्या लॉकडाऊन संपल्यावर कधी सुरू होणार विमानसेवा, GoAirने दिली ही माहिती

First published: April 7, 2020, 2:41 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading