जाहिरात
मराठी बातम्या / मनी / लॉकडाऊनमुळे SBI ने बंद केलं क्रेडिट कार्डचं कार्यालय, केवळ आवश्यक सुविधा सुरू

लॉकडाऊनमुळे SBI ने बंद केलं क्रेडिट कार्डचं कार्यालय, केवळ आवश्यक सुविधा सुरू

लॉकडाऊनमुळे SBI ने बंद केलं क्रेडिट कार्डचं कार्यालय, केवळ आवश्यक सुविधा सुरू

भारतातील दुसरी मोठी क्रेडिट कार्ड जारी करणारी कंपनी SBI Cards and Payment Services ने कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे (Coronavirus Lockdown) त्यांच्या सर्व कार्यालयांना 14 एप्रिलपर्यंत बंद ठेवले आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 07 एप्रिल : भारतातील दुसरी मोठी क्रेडिट कार्ड जारी करणारी कंपनी SBI Cards and Payment Services ने कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे (Coronavirus Lockdown) त्यांच्या सर्व कार्यालयांना 14 एप्रिलपर्यंत बंद ठेवले आहे. कंपनीने हे शटडाऊन केंद्र आणि राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेल्या अधिसूचनांचं पालन करण्यासाठी घेतला आहे. मात्र कंपनीतील अत्यावश्यक काम सुरू राहणार आहे. कंपनीने त्यांच्या प्रेस रिलीजमध्ये नमूद केले आहे की, त्यांचा Business Continuity Plan (BCP) सुरू आहे आणि त्यातील क्रिटिकल प्रोसेस नेहमीप्रमाणे सुरू आहेत. कंपनीतील कर्मचारी वर्क फ्रॉम होम अर्थात घरबसल्या कामं करत आहेत. (हे वाचा- या सरकारी बँकेने घटवले व्याजदर, आजपासून गृह-वाहन कर्जावरील EMI स्वस्त ) कंपनीकडून पुढे सांगण्यात आले आहे की, गेल्या काही वर्षात झालेल्या Digital Transformation अर्थात डिजिटल बदलांमुळे कंपनीला मोठा फायदा होत आहे. त्यामुळे कंपनीतील व्यवहार सुरळीत सुरू आहेत. मात्र या बंदीमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानाचा अंदाज बांंधता येणार नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून निर्देश आल्यानंतरच ही बंदी उठवण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. सेल्सशी निगडीत व्यवहार सुरू ठेवणं कठीण असल्यामुळे कंपनीने त्यांची कस्टमर एक्विजेशन प्रोसेस थांबवली आहे. मात्र remittance व्यवहार सुरू आहे. (हे वाचा- जाणून घ्या लॉकडाऊन संपल्यावर कधी सुरू होणार विमानसेवा, GoAirने दिली ही माहिती ) SBI Card कडून पुढे सांगण्यात आले आहे की, ग्राहकांकडून करण्यात येणाऱ्या रिपेमेंटमध्ये घसरण झाली आहे. आरबीआय ने घोषित केलेली 3 महिन्यांची ईएमआय स्थगिती आणि या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या ग्राहकांच्या संख्येवर लक्ष ठेवण्यात येत आहे. टेलिकॉलिंग आणि फिल्ड कलेक्शन बंद झाल्यामुळे कंपनीच्या कलेक्शन आणि रिकव्हरी या व्यवहारांवर नकारात्मक परिणाम झाला आहे. 3 महिन्यांचा moratorium एसबीआयने त्यांच्या हाय रिस्क कस्टमर्ससाठी आधीच काही खास पोर्टफोलिओ मॅनेजमेंट लागू केली आहे. ग्राहकांसाठी त्यांनी रिस्ट्रक्चरिंग आणि सेटलमेंटसारख्या ऑफर्स देऊ केल्या आहेत. आरबीआयच्या moratorium पॉलिसीला एसबीआय कार्डने सुद्धा मंजूरी दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: sbi card
  • First Published :
जाहिरात
जाहिरात