कोरोनाच्या संकटकाळात एक आनंदाची बातमी! 'या' कंपनीने कर्मचाऱ्यांच्या पगारात केली 25 टक्के वाढ

कोरोनाच्या संकटकाळात एक आनंदाची बातमी! 'या' कंपनीने कर्मचाऱ्यांच्या पगारात केली 25 टक्के वाढ

केरळमधील बॉबी चेम्मनूर ग्रृपने (Boby Chemmanur Group) कर्मचाऱ्यांच्या पगारात 25 टक्क्याने वाढ केली आहे. या कंपनीमध्ये 5 लाख कर्मचारी आहेत

  • Share this:

नवी दिल्ली, 07 एप्रिल : कोरोना व्हायरस (Coronavirus)मुळे जगभरातील आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे अनेक कंपन्या त्यांच्या आर्थिक बाजू सांभाळून ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करत आहे. एकंदरित कोरोनामुळे अनेकांचं आर्थिक नुकसान होत आहे. काहीना त्यांचे पगार उशीरा होण्याची भीती देखील आहे. मात्र अशा परिस्थितीत केरळमधील एका कंपनीने पगार देण्याचा केवळ दिला नसून त्यांनी पगारवाढ देखील केली आहे. केरळमधील बॉबी चेम्मनूर ग्रृपने (Boby Chemmanur Group) कर्मचाऱ्यांच्या पगारात 25 टक्क्याने वाढ केली आहे. या कंपनीमध्ये 5 लाख कर्मचारी आहेत, यातील अनेक जण कमिशनवर काम करतात. कंपनीच्या मायक्रोफायनान्स व्यवहारामध्ये जवळपास 70,000 महिला जोडल्या गेल्या आहेत.

(हे वाचा-लॉकडाऊनमुळे SBI ने बंद केलं क्रेडिट कार्डचं कार्यालय, केवळ आवश्यक सुविधा सुरू)

न्यू इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या अहवालानुसार केरळमधील बॉबी चेम्मनूर ग्रृप (Boby Chemmanur International Jewellers - Chemmanur Group ) केलेल्या पगारवाढीबाबत माहिती मिळते आहे. केरळमधील ही कंपनी दागिन्यांच्या व्यवसायाव्यतिरिक्त टूर अँड ट्रॅव्हल्सच्या व्यवसायात सुद्धा आहे.

(हे वाचा-या सरकारी बँकेने घटवले व्याजदर, आजपासून गृह-वाहन कर्जावरील EMI स्वस्त)

कोरोना व्हायरसचे वाढते संक्रमण थांबवण्यासाठी अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना विविध सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. अनेकांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची करण्यास सांगितले आहे.  मात्र केरळच्या या कंपनीमुळे 5 लाख कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. कोरोनाच्या संकटकाळात ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे. कंपनीचे सीईओ बॉबी चेम्मनूर यांनी सांगितले आहे की, 'मला माझ्या 5 लाख कर्मचाऱ्यांचा अभिमान आहे. ते याठिकाणी सक्रिय पार्टनरप्रमाणेच काम करतात. त्यांचं कंपनीच्या वेगवेगळ्या शाखा आणि डेव्हलपमेंटमध्ये मोठं योगदान आहे.' बॉबी चेम्मनूर ग्रृपचे एचआर हेड राजन मेनन यांनी अशी माहिती दिली की,'ही पगारवाढ कर्मचाऱ्यांच्या कामासाठी पुरस्कार आहे.' या पडत्या काळात कंपनीचे कर्मचारी कंपनीबरोबर राहावेत यासाठी ही पगारवाढ करण्यात आली आहे.

First published: April 7, 2020, 1:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading