नवी दिल्ली, 07 एप्रिल : कोरोना व्हायरस (Coronavirus Pandemic) मुळे अनेक देशातील आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. भारतातही आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमानसेवा बंद आहे. मात्र आता लॉकडाऊन संपल्यानंतर एअरलाइन्स पुन्हा एकदा उड्डाण करण्याची शक्यता आहे. काही कंपन्यांनी त्यांच्या ग्राहकांना माहिती दिली आहे की, एका विशिष्ट तारखेनंतर फ्लाइट्सचे बुकिंग सुरू होणार आहे. सोमवारी बजेट एअरलाइन गोएअर (GoAir) ने यासंदर्भात माहिती दिली. GoAirचं फ्लाइट बुकिंग सुरू होण्याची तारीख गोएअरने सोमवारी दिलेल्या माहितीनुसार लॉकडाऊन संपल्यानंतर 15 एप्रिलपासूनच ते देशांतर्गत फ्लाइट्सचं बुकिंग सुरू करणार आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी बुकिंग थोड्या उशिराने सुरू आहेत. गोएअरने दिलेल्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय विमानसेवांलाठी बुकिंग 1 मेपासून सुरू होणार आहे.
लॉकडाऊननंतर बुकिंगबाबत निर्णय घेणार Air India याआधी सरकारी विमान कंपनी Air India ने सांगितलं होतं की, 30 एप्रिलपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानांचं बुकिंग बंद ठेवण्यात आले आहे. सध्या कंपनी 14 एप्रिलपर्यंतच्या लॉकडाऊनकडे विशेष लक्ष केंद्रित करत आहे. 14 एप्रिलनंतर काय निर्णय होईल याकडे आमचं लक्ष असल्याची माहिती एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. (हे वाचा- लॉकडाऊन संपल्यावर 15 एप्रिलपासून रेल्वे धावणार? सरकारने दिलं हे स्पष्टीकरण ) 2 मार्च 2020 रोजी सिव्हील एव्हिएशन सचिव प्रदीप सिंह खरोला यांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 एप्रिलनंतर कोणत्याही तारखेपासून विमान कंपन्या त्यांची तिकिट विक्री करू शकतात. कोरोनामुळे विमान व्यवसायाची अवस्था बिकट जगभरात कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. याचा सर्वात मोठा फटका बसला तो विमान व्यवसायाला. आज जगभरात 12 लाखांपेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण आहेत. जगभरातील अनेक देश या संकटाशी लढत आहे. भारतामध्ये देखील 21 दिवसांचा लॉकडाऊन आहे. अशा परिस्थितीत अनेक देशातील विमान उड्डाण बंद असल्यामुळे हा व्यवसाय मोठा तोटा सहन करत आहे.