जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Bank Privatisation बाबत मोठी बातमी! या बँका होणार खाजगी, पावसाळी अधिवेशनात होणार निर्णय

Bank Privatisation बाबत मोठी बातमी! या बँका होणार खाजगी, पावसाळी अधिवेशनात होणार निर्णय

Bank Privatisation बाबत मोठी बातमी! या बँका होणार खाजगी, पावसाळी अधिवेशनात होणार निर्णय

Bank privatisation संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर येत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 01 जुलै: बँकांच्या खाजगीकरणाबाबत (Bank privatisation) महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली एका उच्चस्तरीय पॅनेलने अलीकडेच सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खाजगीकरणाबाबत नीति आयोगाच्या (NITI Ayog) शिफारशींवर विचार करण्यासाठी बैठक घेतली होती.  CNBC-TV18 च्या मते इंडियन ओव्हरसीज बँक आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकांचे आधी खाजगीकरण होऊ शकतं. मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यन (Chief Economic Adviser Krishnamurthy Subramanian) यांनी एका मुलाखतीदरम्यान असे संकेत दिले की संसदेच्या पावसाळी अधिवेशनात बँकेच्या खासगीकरणाचा प्रस्ताव मांडला विचारात घेतला जाऊ शकतो. काय म्हणाले सुब्रमण्यम? सुब्रमण्यम यांनी असं म्हटलं की, ‘त्या सर्व सुधारणा लागू करण्यावर जोर दिला जाईल ज्यांची गेल्या दीड वर्षात घोषणा करण्यात आली आहे आणि जे बजेट आहेत. याकरता अंमलबजावणीवर खरोखर गंभीर लक्ष दिले जात आहे, मग ते खाजगीकरण कार्यक्रम असो वा सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खाजगीकरण.’ हे वाचा- सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याची योग्य वेळ, महिन्याभरात व्हाल मालामाल; वाचा सविस्तर संसदीय कामकाजाच्या मंत्रिमंडळाच्या समितीने (CCPA) मंगळवारी 19 जुलै ते 13 ऑगस्ट दरम्यान संसदेचे आगामी पावसाळी अधिवेशन घेण्याची शिफारस केली. या अधिवेशनात 20 बैठका होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हे वाचा- 16 राज्यातील गावांत पोहोचणार इंटरनेट, सरकारची भारतनेट प्रोजेक्टबाबत मोठी घोषणा केव्हा सुरू होणार मान्सून सत्र? सूत्रांच्या माहितीनुसार अधिवेशनादरम्यान  संसदेच्या आवारात सर्व कोविड-19 संबंधित प्रोटोकॉल पाळले जातील. अधिवेशनात येणाऱ्या सर्वांनी कोविड लशीचा कमीत कमी एक डोस घेतला असेल, अशी अपेक्षा आहे.  मान्सूनचा सत्र सहसा जुलैच्या तिसर्‍या आठवड्यात सुरू होतं आणि 15 ऑगस्टपूर्वी संपतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bank , investment , money , rbi
  • First Published :
जाहिरात
जाहिरात