जाहिरात
मराठी बातम्या / मनी / सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याची योग्य वेळ, महिन्याभरात व्हाल मालामाल; वाचा सविस्तर

सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याची योग्य वेळ, महिन्याभरात व्हाल मालामाल; वाचा सविस्तर

सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याची योग्य वेळ, महिन्याभरात व्हाल मालामाल; वाचा सविस्तर

Gold Outlook: सध्या सोन्याचे दर रेकॉर्ड स्तरापेक्षा साधारण 10000 रुपयांनी कमी आहेत. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये सोन्याच्या दराने सर्वोच्च स्तर गाठला होता.

  • -MIN READ
  • Last Updated :

 नवी दिल्ली, 01 जुलै: सोन्यामध्ये गुंतवणूक (Gold Investment) करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. . जगभरात भारत असा दुसरा देश आहे ज्याठिकाणी सोन्याची मागणी (Demand of Gold in India) सर्वाधिक आहे. भारतामध्ये सोनेखरेदीकडे केवळ गुंतवणूक म्हणून नाही तर परंपरा म्हणून देखील पाहिलं जातं. भारतीयांसाठी सोनं (Gold Rates Today) हा एक शुद्ध धातू आहे. याशिवाय सोन्यामध्ये गुंतवणूक हा एक सुरक्षित पर्याय आहे. भारतात सोन्याला एवढं महत्त्व आहे की लग्नसमारंभाच्या बजेटमधील (Gold Investment) एक मोठा हिस्सा सोनेखरेदीसाठी वापरला जातो. यामध्ये दागिने किंवा नाण्यांची खरेदी केली जाते. दरम्यान सध्या सोन्याचे दर रेकॉर्ड स्तरापेक्षा साधारण 10000 रुपयांनी कमी आहेत. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये सोन्याच्या दराने सर्वोच्च स्तर गाठला होता. शिवाय सातत्याने सोन्याचे दर कमी होत आहेत. आणखी काहीच दिवस असेल घसरण कमोडिटी एक्सपर्ट्सच्या मते जुलैनंतर सोन्याचे दर वधारतील. त्यावेळी गुंतवणुकदारांना चांगला रिटर्न मिळेल मात्र त्यावेळी सोनंखरेदी महाग पडू शकेल. तज्ज्ञांच्या मते या मौल्यवान धातूमध्ये आलेली घसरण अस्थायी आहे आणि सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनी सध्या होत असलेल्या घसरणीकडे एक संधी म्हणून पाहिलं पाहिजे. सराफा तज्ज्ञांच्या मते सोन्याचे दर लवकरच बदलतील आणि एका महिन्यानंतर दर 48,500 प्रति तोळावर पोहोचतील. त्यामुळे आता उतरलेले दर असताना गुंतवणूक करणं फायद्याचं ठरेल. हे वाचा- आजपासून बदलणार हे महत्त्वाचे आर्थिक नियम; LPG, बँकिंगसंदर्भात होणार असे बदल सोन्याने 28 टक्के परतावा दिला (Gold Investment & Return ) सोन्याच्या गुंतवणूकीबद्दल बोलायचे झाले तर गेल्या वर्षी सोन्याने 28 टक्के परतावा दिला आहे. त्या आधीच्या वर्षीही सोन्याने दिलेला परतावा सुमारे 25 टक्के होता. जर तुम्ही दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करत असाल तर सध्या सोनं गुंतवणूकीसाठी एक अतिशय सुरक्षित आणि चांगला पर्याय आहे, जो चांगला परतावा देईल. तज्ज्ञांच्या मते येत्या काही दिवसांत सोन्याची किंमत वाढेल, म्हणून तुमच्यासाठी ही चांगली गुंतवणूक संधी आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात