नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर : देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या एसबीआयच्या ऑनलाइन सेवा (Online Banking Services) आज ठप्प झाल्या आहेत. बँकेने ट्विटरवर याबाबत पोस्ट शेअर करून दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र यामुळे एटीएम किंवा पीओएस मशीन्स प्रभावित झाले नाही आहेत. बँकेने अशी माहिती दिली आहे की, कनेक्टिव्हिटी इश्यूमुळे ग्राहकांना ऑनलाइन बँकिंग सेवा वापरण्यात समस्या येत आहे. लवकरच या सेवा सुरळित होतील.
बँकेने दिलेल्या माहितीनुसार ग्राहक एटीएममधून पैसे काढू शकतात किंवा कार्डच्या माध्यमातून शॉपिंग देखील करू शकतात. स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांची गैरसोय झाली असल्यामुळे ट्वीट करून दिलगिरी व्यक्त केली आहे. ग्राहकांना एसबीआयचे YONO App वापरण्यामध्ये समस्या निर्माण होत आहेत.
We request our customers to bear with us. Normal service will resume soon.#SBI #StateBankOfIndia #ImportantNotice #YONOSBI #OnlineSBI pic.twitter.com/dDFAgmGLQl
— State Bank of India (@TheOfficialSBI) October 13, 2020
एसबीआयच्या या ट्वीटवर ग्राहकांच्या संतप्त प्रतिक्रिया येत आहे. एका युजरने असे म्हटले आहे की, एसबीआयने ही माहिती ट्वीट करण्यापेक्षा ग्राहकांना मेसेजच्या माध्यमातून ट्वीट करणे गरजेचे होते. आणखी एका युजरने म्हटले आहे की, ऑनलाइन बँकिंग वेबसाइट आणि युपीआयचा वापर कालपासून होत नाही आहे. कालपासूनच एसबीआय युजर्सना समस्येचा सामना करावा लागत आहे.
(हे वाचा-तीन दिवसांनंतर स्वस्त झालं सोनं, आतापर्यंत 5374 रुपये प्रति तोळाने उतरली किंमत)
(हे वाचा-या बँकांमध्ये FD केल्यास मिळत आहे सर्वाधिक नफा,1 वर्षासाठी आहे 7% पर्यंत व्याजदर)
एसबीआयचे 6.6 कोटी ग्राहक मोबाइल बँकिंग आणि एटीएम सुविधेचा वापर करतात. या सर्व ग्राहकांना या समस्येचा फटका बसला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर काही संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.