Home /News /money /

'COVID-19 च्या संकटात भारतीय डिजिटल उद्योगात झालेली FACEBOOK-JIO गुंतवणूक महत्त्वाची'

'COVID-19 च्या संकटात भारतीय डिजिटल उद्योगात झालेली FACEBOOK-JIO गुंतवणूक महत्त्वाची'

आपापल्या क्षेत्रातल्या आघाडीच्या कंपन्या Facebook आणि Jio यांनी एकत्र येत भारतीय डिजिटल उद्योगात 5.7 अब्ज गुंतवणूक करून नवसंजीवनी दिल्याचं BIF ने म्हटलं आहे.

  नवी दिल्ली, 27 एप्रिल : जागतिक अर्थव्यवस्थेने कधी नव्हे इतकी मान टाकलेली असताना भारतात डिजिटल जगात एका बहुराष्ट्रीय कंपनीची मोठी गुंतवणूक येते, जग Coronavirus च्या विळख्यात धडपडत असताना ही अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक विश्वास वाढवणारी आहे, असं ब्रॉडबँड इंडिया फोरम (BIF)ने म्हटलं आहे. सोशल मीडिया सम्राट फेसबुक आणि जिओ यांच्या कराराविषयी हे सगळ्यात मोठं सकारात्मक पाऊल अशी नोंद केली आहे. BIF हे देशातील डिजिटल कम्युनिकेशन माध्यमांचा अभ्यास आणि विश्लेषण करणारं स्वतंत्र व्यासपीठ समजलं जातं. त्यांनी गेल्या आठवड्यात झालेल्या JIO आणि Facebook कराराबद्दल विश्लेषण केलं आहे. फेसबुकने 43,574 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. फेसबुकने यासंदर्भात बुधवारी मोठी घोषणा केली. फेसबुकने जिओमध्ये केलेली गुंतवणूक उल्लेखनीय आहे. कारण या दोन कंपन्यांच्या एकत्र येण्यामुळे 5 अब्ज छोट्या आणि मध्यम व्यापाऱ्यांना, व्यावसायिकांना यातून लाभ होणार आहे. 10 अब्ज शेतकरी यातून लाभ घेऊ शकतात, असं BIF ने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. BIF चे अध्यक्ष टी. व्ही. रामचंद्रन म्हणाले, "आपापल्या क्षेत्रातल्या या दोन दिग्गज कंपन्यांच्या एकत्र येण्याने डिजिटल इंडियाचा मोठा फायदा आहे. हे या उद्योगाच्या आणि डिजिटल सेवा वापरणाऱ्यांच्या दृष्टीने विश्वासार्ह पाऊल आहे."

  संबंधित - Jio मध्ये Facebook आता सर्वात मोठा भागीदार, जाणून घ्या या करारातील 8 महत्त्वाच्या गोष्टी

  गेल्या आठवड्यात रिलायन्स रिटेल, जिओ प्लॅटफॉर्म आणि फेसबुक, whatsapp यांच्यादरम्यान ई कॉमर्समधल्या समन्वयासाठी करार झाला. JioMart या ऑनलाईन पोर्टलसाठी व्हॉट्सअॅपसुद्धा डिजिटल कनेक्टिव्हिटी देत ग्राहक आणि उद्योजकांमधल्या समन्वयाचं काम करणार आहे. भारतातल्या ऑनलाईन खरेदीचा अनुभव बदलण्याची क्षमता या दोघांच्या एकत्र येण्यातून निर्माण झाली असल्याचं BIF चं मत आहे. स्थानिक किराणा दुकानदारांपासून उद्योजकांपर्यंत आणि शेतकऱ्यापासून सामान्य ग्राहकापर्यंत डिजिटल माध्यमातून एकत्र जोडण्याचं लक्ष्य यात आहे. संपूर्ण जग COVID-19 च्या संकटामुळे आर्थिक आघाडीवर गटांगळ्या खात असताना फेसबुककडून ही गुंतवणूक झाली, ही मोठी गोष्ट असल्याचं Broadband India Forum चं म्हणणं आहे. अन्य बातम्या Jio आणि Facebook भारतातील लोकांना व्यवसायाच्या नव्या संधी देणार : मार्क झुकरबर्ग UAE मधला अब्जाधीश भारतीय झाला कंगाल, एक अहवालाने 50 वर्षांच्या मेहनतीवर पाणी
  Published by:अरुंधती रानडे जोशी
  First published:

  Tags: Coronavirus

  पुढील बातम्या