Home /News /news /

Jio आणि Facebook भारतातील लोकांना व्यवसायाच्या नव्या संधी देणार : मार्क झुकरबर्ग

Jio आणि Facebook भारतातील लोकांना व्यवसायाच्या नव्या संधी देणार : मार्क झुकरबर्ग

फेसबुकने भारताची मोठी टेलिकॉम कंपनी जिओमध्ये 43 हजार 574 कोटींची गुंतवणूक करत 9.99 टक्के भागीदारी खरेदी केला आहे.

    मुंबई, 22 एप्रिल : भारतातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपनी Reliance Jioमध्ये भागीदारी घेतल्यानंतर फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी या भागीदारीबाबत आनंद व्यक्त केला. तसेच मार्क म्हणाले की, "सध्या जगात बरेच काही सुरू आहे. पण मला माझ्या भारतातील कामाविषयी काहीतरी सांगायचे आहे. फेसबुक Jio Platformsसोबत काम करत आहे. आम्ही एक आर्थिक गुंतवणूक करीत आहोत आणि त्याहीपेक्षा आम्ही काही मोठ्या प्रकल्पांवर एकत्र काम करण्यासाठी सज्ज आहोत. यामुळे संपूर्ण भारतातील लोकांना नवीन व्यवसाय संधी देईल". जगातील प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकने भारताची मोठी टेलिकॉम कंपनी जिओमध्ये 43 हजार 574 कोटींची गुंतवणूक करत 9.99 टक्के भागीदारी खरेदी केला आहे. (हे वाचा-io मध्ये Facebook सर्वात मोठा भागीदार, वाचा या करारातील 8 महत्त्वाच्या गोष्टी) 2016मध्ये रिलायन्स कंपनीने टेलिकॉम क्षेत्रात जिओ आणलं. जिओनं 4 वर्षांमध्ये प्रतिस्पर्धांना टक्कर देत टेलिकॉम क्षेत्रात आपलं वचर्स्व निर्माण केलं आहे. रिलान्सने टेलिकॉम ते होम ब्रॉडबॅण्डपर्यंत आपल्या सेवा विस्तारीत केल्या आहेत. भारतात फेसबुक आणि मेसेज अॅप आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी वापरलं जाणारं अॅप म्हणजे व्हॉटसअॅपचं मोठं मार्केट आहे. फेसबुकचे 400 मिलियन यूझर्स आहेत. 2020 मध्ये इंटरनेट यूझर्सची संख्या दुप्पट होण्याची अशा आहे. फेसबुक आणि व्हॉट्स अॅपचा वापर भारतातील बर्‍याच भागात केला जातो. तसेच, सध्या भारत मोठ्या डिजिटल परिवर्तनातून जात आहे. जिओ सध्या कोट्यवधी भारतीय आणि लघु उद्योगपतींचा व्यवसाय सुकर करण्यास मदत करत आहे.त्यामुळं या भागीदारीमुळे छोट्या व्यवसायिकांना याचा फायदा होईल. मार्क झुकरबर्ग म्हणाले की, "लघु उद्योग प्रत्येक अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण असतात आणि त्यांना मदतीची आवश्यकता असते. भारतात 6 कोटींहून अधिक लघु उद्योग आहेत आणि कोट्यावधी लोक नोकरीसाठी त्यांच्यावर अवलंबून आहेत". मुख्य म्हणजे या भागीदारीत जिओ प्लॅटफॉर्म, रिलायन्स रिटेल आणि व्हॉट्सअ‍ॅपवरही करार होणार आहे. या अंतर्गत रिलायन्स रिटेलच्या व्यवसायाला वेग देण्याचा करार होईल. 'ही भागीदारी भारताला जगातील अग्रगण्य डिजिटल देशांपैकी एक बनवेल' रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी एका व्हिडिओ निवेदनात या भागीदारीबद्दल माहिती दिली. मुकेश अंबानी यांनी सांगितले की, "दीर्घकालीन भागीदार म्हणून फेसबुकचे स्वागत करण्यात मला आनंद होत आहे. हा करार भारताला जगातील आघाडीच्या डिजिटल देशांपैकी एक बनविण्यासाठी फायद्याचा आहे". तसेच, "मार्क झुकरबर्ग आणि माझ्यासाठी डिजिटल परिवर्तन आणि सर्व भारतीयांची सेवा करणे हा या भागीदारीचा मुख्य उद्देश आहे", असे सांगितले. संपादन - प्रियांका गावडे
    First published:

    Tags: Mukesh ambani

    पुढील बातम्या