मराठी बातम्या /बातम्या /मनी /

UAE मधला अब्जाधीश भारतीय झाला कंगाल, एक अहवालाने 50 वर्षांच्या मेहनतीवर पाणी

UAE मधला अब्जाधीश भारतीय झाला कंगाल, एक अहवालाने 50 वर्षांच्या मेहनतीवर पाणी

भारतातून युएईला जाताना 8 डॉलर घेऊन गेले होते. त्यानंतर अब्जाधीश झालेल्या या व्यक्तीचे जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलीफामध्ये दोन मजले आहेत.

भारतातून युएईला जाताना 8 डॉलर घेऊन गेले होते. त्यानंतर अब्जाधीश झालेल्या या व्यक्तीचे जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलीफामध्ये दोन मजले आहेत.

भारतातून युएईला जाताना 8 डॉलर घेऊन गेले होते. त्यानंतर अब्जाधीश झालेल्या या व्यक्तीचे जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलीफामध्ये दोन मजले आहेत.

  • Published by:  Suraj Yadav
नवी दिल्ली, 26 एप्रिल : संयुक्त अरब अमीरातीमध्ये सर्वात मोठी हेल्थकेअर कंपनी एका भारतीयाची आहे. मात्र त्या कंपनीविरोधात अनेक प्रकरणं न्यायालयात असल्यानं मालक बी आर शेट्टी यांच्यावर कंगाल होण्याची वेळ आहे. भारतीय वंशाच्या शेट्टी यांची कंपनी पाच अब्ज डॉलरच्या कर्जात बुडाली आहे. सध्या कंपनीविरुद्ध फसवणुकीच्या तक्रारींची चौकशी सुरू आहे. यामुळे कंपनीच्या शेअर्सचे स्टॉक एक्सचेंज करण्यास स्थगिती देण्यात आली आहे. अरेबियन बिझनेस या वेबसाइटने म्हटलं की, एनएमएसी हेल्थ कंपनी विरुद्ध अनेक तक्रारी आहे. कंपनीचे मालक बी आर शेट्टी सध्या भारतात असल्याचा दावाही यामध्ये करण्यात आला आहे. बराच काळ झालं ते युएईमध्ये नाहीत. त्यांच्या कंपनीविरुद्ध कमीत कमी पाच तक्रारी दाखल कऱण्यात आल्याची माहिती समजते. युएईमध्ये हेल्थ केअर इंडस्ट्रीतून गडगंज संपत्ती मिळवणारे शेट्टी हे पहिले भारतीय आहेत. त्यांनी 1970 मध्ये एनएमसी हेल्थची सुरूवात केली होती. पुढे 2012 मध्ये लंडन स्टॉक एस्कचेंजवर लिस्ट होण्याआधी देशाची पहिली कंपनी ठरली होती. 1970 च्या दशताक बी आर शेट्टी फक्त 8 डॉलर घेऊन य़ुएईला पोहोचले होते. मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून त्यांनी काम करायला सुरुवात केली होती. बीआर शेट्टी यांनी 1980 मध्ये अमीरातीमध्ये सर्वात जुन्या रेमिटेंस बिझनेस युएई एक्सचेंजची सुरुवात केली. ही कंपनी युकेतील कंपन्या आणि प्रोव्हायडर्स यांच्यासोबत 2018 मध्ये सामायिक झाली. शेट्टी यांनी हेल्थकेअर आणि फायनान्शियल सर्व्हिसेसशिवाय हॉस्पिटिलिटी, फूड अँड बेव्हरेज, फार्मास्यूटिकल मॅन्युफॅक्चरिंग आणि रिअल इस्टेटमध्येही गुंतवणूक केली होती. हे वाचा : आजोबांसाठी कबर खोदत होता नातू , शेवटी दोघांनाही एकत्रच दफन करण्याची आली वेळ शेट्टी यांना एका रिपोर्टमुळे मोठा धक्का बसला. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मड्डी वॉटर रिसर्चचे फाउंडर आणि शॉर्ट सेलर कारसन ब्लॉक यांनी एक रिपोर्ट सादर केला होता. त्यामध्ये एनएमसी हेल्थ कंपनीवर संपत्तीची खोटी माहिती देण्याचा तसंच संपत्तीची चोरी केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर तीनच महिन्यात एनएमचीच्या शेअरचा लंडन स्टॉक एक्चेंजमध्ये व्यवहार करण्यावर निर्बंध घालण्यात आले. दोन आठवडे आधी जाहीर करण्यात आलं की कंपनीवर जवळपास 40 हजार कोटींचे कर्ज आहे. हे वाचा : TCS च्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, 'वर्क फ्रॉम होम'बाबत घेतला 'हा' निर्णय युएई एक्सचेंजने त्यांच्या इतर शाखा आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून नवीन व्यवहार बंद केले आहेत. कारण युएईच्या केंद्रीय बँकेनं सांगितलं होतं की, कंपनीविरुद्ध चौकशी सुरु आहे आणि यांच्या व्यवस्थापनाची आणि व्यवहारांची चौकशी करण्यात येईल. हे वाचा : कोरोनामुळे चार महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू, आई वडील शेवटचं पाहू शकले नाही जगातील सर्वात उंच इमारत असलेल्या बुर्ज खलीफामध्ये बीआर शेट्टी यांचे दोन मजले आहेत .याशिवाय पॉम जुमेरिया इथं एक घरही आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात त्यांनी सांगितलं होतं की,'आव्हान प्रत्येकवेळी असतं मात्र जेव्हा तुम्ही त्यासमोर न झुकता काम करता तेव्हा ते तुमच्या वाटेतून बाजूला होतात.' हे वाचा : आनंद महिंद्रांनी रिक्षाचालकाचं केलं कौतुक, कोरोनाच्या संकटात थक्क करणारी कल्पना संपादन - सूरज यादव
First published:

Tags: UAE

पुढील बातम्या