SBI च्या ग्राहकांसाठी खूशखबर! 1 ऑक्टोबरपासून मोफत होतील बँकेच्या 'या' सेवा

SBI च्या ग्राहकांसाठी खूशखबर! 1 ऑक्टोबरपासून मोफत होतील बँकेच्या 'या' सेवा

SBI - एसबीआयनं ग्राहकांसाठी बऱ्याच गोष्टी सोप्या केल्यात. जाणून घेऊ त्याबद्दल

  • Share this:

मुंबई, 11 सप्टेंबर : देशाची सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया SBI आपल्या सर्विस चार्जेसमध्ये बदल करणार आहे. SBI ग्राहकांना कमीत कमी बॅलन्सच्या कटकटीपासून मुक्त करण्याचा प्लॅन करतेय. या योजनेप्रमाणे बँक अकाउंटमध्ये मंथली अॅव्हरेज बॅलन्स मेन्टेन केला नाही तरी चार्ज 80 टक्के कमी होईल. याशिवाय NEFT आणि RTGS सारखे डिजिटल ट्रँझॅक्शनही स्वस्त करण्याचा प्लॅन सुरू आहे. फायनॅन्शियल एक्सप्रेसच्या माहितीनुसार हे नवे दर 1 ऑक्टोबरपासून लागू होऊ शकतात.

कमीत कमी मंथली अॅवरेज बॅलन्स न ठेवला तर लागणारा दंड कमी

मेट्रो शहर, पूर्ण शहरी भागात एसबीआय ब्रँचमध्ये खातं सुरू करण्यासाठी 5000 रुपये आणि 3000 रुपये ठेवावे लागतात. 1 ऑक्टोबरपासून आता दोन्ही ठिकाणी 3000 रुपयेच ठेवावे लागू शकतात. त्याहून कमी बॅलन्स झाला तर दंड 15 रुपये आणि जीएसटी लागू शकते. आता हा दंड 80 रुपये आणि जीएसटी असा आहे.

पाकिस्तानात हाहाकार! दूध झालं पेट्रोलपेक्षा महाग, किंमत ऐकून व्हाल थक्क

मुंबईच्या नेव्हल डाॅकयार्डमध्ये 933 व्हेकन्सी, 'असा' करा अर्ज

NEFT/RTGS चार्जेस

SBI डिजिटल मोडवरून RTGS आणि NEFT द्वारे ट्रॅन्झॅक्शन चार्जेस काढून काढलेत. 1 जुलैपासून ते सुरू झालंय. SBI शाखेत NEFT/RTGS द्वारे ट्रॅन्झॅक्शनची किंमतही कमी केलीय.

SBI च्या एटीएमचे दरही 1 ऑक्टोबरपासून बदलतायत. ग्राहक मेट्रो शहरांच्या 6 SBI ATM मधून 10 वेळा मोफत डेबिट ट्रान्झॅक्शन करू शकेल. इतर ठिकाणी 12 वेळा मोफत एटीएम वापरू शकेल.

पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर, जाणून घ्या तुमच्या शहरातले दर

चेकबुकला द्यावे लागतील इतके पैसे

सेव्हिंग अकाउंट असलेल्या खातेधारकांना एका आर्थिकक वर्षात 10 चेक्स मोफत असतील. त्यानंतर 10 चेक्स असलेलं चेकबुक 40 रुपये जीएसटी आणि 25 चेक्स असलेल्या चेकबुकला 75 रुपये जीएसटी द्यावे लागतील. ज्येष्ठ नागरिक आणि सॅलरी पॅकेज अकाउंट्स असलेल्यांना मोफत चेक्स मिळतील.

वाहतूक पोलिसाची मुजोरी! सर्वसामान्यावर दमदाटी करत मारली लाथ VIDEO VIRAL

Published by: Sonali Deshpande
First published: September 11, 2019, 1:44 PM IST
Tags: SBI

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading