पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर, जाणून घ्या तुमच्या शहरातले दर

पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर, जाणून घ्या तुमच्या शहरातले दर

Petrol, Diesel - पेट्रोल आणि डिझेलच्या आजच्या किमती घ्या जाणून

  • Share this:

मुंबई, 11 सप्टेंबर : पेट्रोल-डिझेलच्या किमतीत आज बुधवारी काही बदल झाले नाहीत. काल ( 10सप्टेंबर ) 14 दिवसांनंतर पेट्रोल-डिझेलचे दर वाढले होते. दिल्लीत ते 5 पैशांनी तर चार महानगरांमध्ये डिझेलची किंमत 5 ते 6 पैशांनी वाढली होती. मुंबई, कोलकाता आणि चेन्नई इथे पेट्रोल क्रमश: 71.76 रुपये, 77.45 रुपये, 74.49 रुपये आणि 74.56 रुपये प्रति लीटर भावानं मिळतंय. तर डिझेल क्रमश: 65.14 रुपये, 68.32 रुपये, 67.55 रुपये आणि 68.84 रुपये प्रति लीटर मिळतंय.

आपल्या शहरातील इंधनाचे दर असे तपासा

विशेष नोंदणीकृत क्रमांकावर SMS पाठवून तुम्हाला तुमच्या शहरातील इंधनाच्या दरांबाबत माहिती मिळवता येईल. पण ही सुविधा आपल्या फोनवरून उपलब्ध व्हावी, यासाठी एसएमएस पाठवण्यापूर्वी तुम्हाला कोणत्याही पेट्रोल पंपावरून डीलर कोड घ्यावा लागेल. SMS सुविधा मिळवण्यासाठी कोड असणं आवश्यक आहे.

तुम्ही प्रवासाला चाललात? मग ट्रॅव्हल इन्शुरन्स हवाच, 'हे' आहेत फायदे

बीपीसीएल ग्राहक  RSP<डीलर कोड> 9223112222

एचपीसीएल ग्राहक HPPRICE<डीलर कोड> 9222201122

या क्रमांकावर सुविधा पाठवून तुम्हाला इंधनाचे दर स्मार्टफोनवरच मिळवता येतील.

एवढ्यात नोकरी सोडण्याचा विचार अजिबात करू नका, कारण...

रिकाम्या पाण्याच्या बाटल्यांतून तुम्ही 'असे' कमवाल पैसे

रोज पेट्रोल - डिझेलच्या किमतींचं समीक्षण करून सकाळी 6 वाजता नव्या किमती घोषित करतात. या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिकन डाॅलर्सचे भाव यावर ठरवल्या जातात. मूळ किंमतींमध्ये अबकारी कर (excise duty), डीलर कमीशन या सर्व बाबी मिळून इंधनाच्या दरामध्ये वाढ होते. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीवर भारतात पेट्रोल-डिझेलचे दर अवलंबून असतात.

मराठी सेलिब्रिटींनी केला बदलाचा श्रीगणेशा, पाहा हा VIDEO

Published by: Sonali Deshpande
First published: September 11, 2019, 11:23 AM IST
Tags: petrol

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading