मुंबई, 11 सप्टेंबर : पाकिस्तानात सर्वसामान्य माणसाची स्थिती फारच वाईट होत चाललीय. आता तर पाकिस्तानचे लोक चहासाठीही तरसतायत. कारण दुधाची किंमत गगनाला भिडलीय. एक लीटर दुधाचा दर 140 रुपये झालाय. दूध पेट्रोल-डिझेलपेक्षा महाग झालंय. पाकिस्तानात सध्या पेट्रोल 113 रुपये आणि डिझेल 91 रुपये प्रति लीटर विकलं जातंय. का बिघडतेय पाकिस्तानाची परिस्थिती? पाकिस्तानी वर्तमानपत्र एक्सप्रेस न्यूजअनुसार डेअरी माफिया मोहरमच्या वेळी नागरिकांची अक्षरश: लूटमार करत होते. मोहरमला दुधाची किंमत प्रचंड वाढली. पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर, जाणून घ्या तुमच्या शहरातले दर पाकिस्तानचं सर्वात मोठं शहर कराची आणि सिंध प्रांतात दुधाची किंमत 140 रुपये प्रति लीटर आहे. मोहरमला लोकांमध्ये दुधाचं सरबत, खीर वाटली जाते. त्या काळात दुधाला मागणी जास्त असते. मागणी वाढल्यानं दूध विक्रेत्यांनी पैसे वाढवले. या बातमीत म्हटलंय की नागरिक प्रशासन आणि सिंधमधल्या राज्य सरकारला लोकांच्या अडचणींचं काहीच सोयरसुतक नाही. त्यांनी आपले डोळे बंद केलेत. तुम्ही प्रवासाला चाललात? मग ट्रॅव्हल इन्शुरन्स हवाच, ‘हे’ आहेत फायदे दुधाच्या सरकरनं ठरवल्या किमतीतही काही कमी नाहीत. सरकार 1 लीटर दुधाची किंमत 94 रुपये घेतंय. पण हेच दूध 110 रुपये लीटरपेक्षा कमी दरानं मिळत नाही. आता मोहरमला हेच दूध 140 रुपये लीटर झालंय. रिकाम्या पाण्याच्या बाटल्यांतून तुम्ही ‘असे’ कमवाल पैसे 28 हजार अब्ज डॉलर्सचं कर्ज पाकिस्तानातल्या 21 पैकी 7 कोटी जनतेकडे खायला पुरेसे अन्न नाही आणि प्यायला पाणीही नाही. प्रत्येक 10 पैकी चार नागरिकांना उपाशी पोटी राहावं लागतं. सरकारी तिजोरीतही खडखडाट आहे. 60 दिवस आयात होऊ शकेल एवढच विदेशी चलन पाकिस्तानकडे शिल्लक आहे. पाकिस्तानी रुपयांचं मूल्य आंतरराष्ट्रीय बाजारात संपलं असून एका डॉलरची किंमत 140 पाकिस्तानी रुपयांवर गेली आहे. VIDEO : भाजप प्रवेशाआधी हर्षवर्धन पाटलांनी पुन्हा बोलून दाखवली मनातील खदखद
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.