मुंबईच्या नेव्हल डाॅकयार्डमध्ये 933 व्हेकन्सी, 'असा' करा अर्ज

Naval Dockyard Mumbai Recruitment, Jobs - मुंबईच्या नेव्हल डाॅकयार्डमध्ये नोकरीची संधी आहे

News18 Lokmat | Updated On: Sep 9, 2019 04:38 PM IST

मुंबईच्या नेव्हल डाॅकयार्डमध्ये 933 व्हेकन्सी, 'असा' करा अर्ज

मुंबई, 09 सप्टेंबर : नेव्हल डाॅकयार्डमध्ये 933 जागांवर भरती केली जाणार आहे. या व्हेकन्सीसाठी भरती वेगवेगळ्या ट्रेड्समध्ये होईल. ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2019 आहे. ऑनलाइन अर्जासाठी उमेदवारानं www.bhartiseva.com इथे क्लिक करावं. उमेदवाराचा जन्म 1 एप्रिल 1999 ते 31 मार्च 2006च्या मध्ये झाला असावा.

शैक्षणिक योग्यता

उमेदवार 10वी उत्तीर्ण हवा. कमीत कमी 50 टक्के मार्क हवेत. मान्यताप्राप्त संस्थेशी संबंधित ट्रेडमध्ये 1 किंवा 2 वर्षांचं आयटीआय प्रमाणपत्र हवं.

महाराष्ट्र पोलीस दलात मोठी व्हेकन्सी, मुंबईत जास्त जागा, 'अशी' होईल निवड

उमेदवाराची निवड परीक्षा, इंटरव्ह्यू, स्किल टेस्टद्वारे होईल. सर्वात आधी लिखित परीक्षा होईल. त्यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराला मेरिट लिस्टच्या आधारे इंटरव्ह्यू, स्किल टेस्टसाठी बोलावलं जाईल. अर्जासाठी फी नाही.

Loading...

असा करा अर्ज

www.bhartiseva.com च्या होमपेजवर अप्रेंटिसशिप ट्रेनिंग ऑप्शनवर जा.

नव्या वेबपेजवर इम्पाॅर्टंट नोटिफिकेशन सेक्शनमध्ये ENROLMENT FOR APPRENTICESHIP TRAINING IN DESIGNATED TRADES (IT-23) या शीर्षकाच्या खाली अॅडव्हर्टाइजमेंट ऑप्शनवर  क्लिक करा. जाहिरात वाचा.

राज्याच्या आरोग्य विभागात नोकरीची संधी, 'या' पदांसाठी 153 जागा

त्याखाली असलेल्या हियर टु अप्लाय ऑप्शनवर जा

रजिस्ट्रेशन पेजवर मागितलेली सर्व माहिती भरून कंटिन्यू ऑप्शनवर क्लिक करा

मोबाइल नंबर आणि ईमेल आयडीवर मिळालेल्या लाॅगइन आणि पासवर्डनं लाॅगइन करून ऑनलाइन अर्ज करा

आर्मी पब्लिक स्कूलमध्ये 8 हजार जागांवर भरती, 'या' उमेदवारांनी करावा अर्ज

पद आणि पद संख्या

फिटर, पद- 141

मशीनिस्ट, पद- 60

वेल्डर (गॅस अँड इलेक्ट्रिक), पद- 65

शीट मेटल वर्कर, पद- 8

टेलर (जी), पद- 13

मेकॅनिक मशीन टुल्स लिमिटेड, पद- 59

मेकॅनिक रेफ्रिजरेटरअँड एअर कंडिशनिंग, पद- 39

मेकॅनिक डिझेल, पद- 73

पेंटर (जनरल), पद- 34

पाॅवर इलेक्ट्रिशियन, पद- 198

इंस्ट्रुमेंट मेकॅनिक, पद- 24

इलेक्ट्रोप्लेटर, पद- 06

फाउंड्रीमॅन, पद- 07

पाइप फिटर, पद- 56

शिपराइट (वुड), पद- 63

पॅटर्न मेकर, पद- 09

दोन वर्ष ट्रेनिंगची पदं

शिपराइट (स्टील), पद- 34

रिगर, पद- 41

फोर्जर अँड हिट ट्रीटर, पद- 3

VIDEO : आदर्श! 4 सुनांनी दिला सासूच्या पार्थिवाला खांदा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: jobs
First Published: Sep 9, 2019 04:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...