जाहिरात
मराठी बातम्या / मनी / SBI नं दिली ग्राहकांना खास भेट, आता 'इतका' कमी होणार तुमचा EMI

SBI नं दिली ग्राहकांना खास भेट, आता 'इतका' कमी होणार तुमचा EMI

हे गुन्हेगार तुमच्या फोनवर फोन करतात आणि तुमचं खातं अपडेट करायचंय, सांगून तुमच्या बँक खात्याची, डेबिट, क्रेडिट कार्डांची माहिती घेतात.

हे गुन्हेगार तुमच्या फोनवर फोन करतात आणि तुमचं खातं अपडेट करायचंय, सांगून तुमच्या बँक खात्याची, डेबिट, क्रेडिट कार्डांची माहिती घेतात.

SBI, Loan - स्टेट बँक ऑफ इंडियानं ग्राहकांसाठी एक खूशखबर आणलीय

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 09 सप्टेंबर : देशाची सर्वात मोठी बँक SBI नं आपल्या ग्राहकांसाठी मोठी घोषणा केलीय. बँकेनं MCLR मध्ये कपात केलीय. ही कपात 0.10 टक्के आहे. बँकेनं हे जाहीर केलंय. आता 1 वर्षाच्या MCLR चे व्याज दर 8.25 टक्क्यांपेक्षा कमी होऊन ते 8.15 टक्के केलेत. नवे दर 10 सप्टेंबरपासून लागू होतील. यामुळे आता ग्राहकांसाठी खूशखबर आहे. आता गृहकर्ज, ऑटो आणि पर्सनल लोन स्वस्त होणार. तुमचं कर्ज सुरू असलं तरीही तुम्हाला याचा फायदा मिळेल. पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर, ‘हे’ आहेत आजचे दर बँकेनं MCLR वाढवला किंवा कमी केला, तर त्याचा परिणाम कर्ज घेणाऱ्या नव्या ग्राहकांवर तर पडतोच. पण ज्यांनी एप्रिल 2016नंतर कर्ज घेतलंय त्यांच्यावरही परिणाम होतो. एप्रिल 2016च्या आधी रिझर्व्ह बँकेद्वारे कर्ज देण्यासाठी ठरलेला कमीत कमी रेट बेस रेट म्हटला जायचा. म्हणजे बँक याहून कमी दरानं ग्राहकांना कर्ज देऊ शकत नव्हती. 1 एप्रिल 2016 पासून बँकिंग सिस्टिममध्ये MCLR लागू झाला आणि हा कर्जाचा कमीत कमी दर झाला. त्यानंतर MCLRच्या आधारावर कर्ज दिलं जायला लागलं. ‘असे’ करा EPFचे पैसे NPS मध्ये ट्रान्सफर, होईल मोठा फायदा आर्थिक वर्ष 2019-20मध्ये पाचव्यांदा SBIनं कर्ज दरांमध्ये कपात केलीय. तसंच तुम्हाला गृहकर्ज किंवा पर्सनल कर्ज घेताना लागणारा वेळ नको वाटतो. म्हणूनच आता नवी सिस्टिम येतेय.त्यामुळे तुम्हाला 1 तासात कर्ज मिळू शकतं. तुम्ही  PSB Loans in 59 Minutes द्वारे कुठल्याही टेंशनशिवाय कर्ज घेऊ शकता. या प्रोजेक्टला तत्वत: मंजुरी मिळालीय. SBI, PNB, बँक ऑफ बडोदा यांच्यासहित 10 सरकारी बँका PSB Loans in 59 Minutes द्वारे कर्ज देऊ शकतात. बँकेचं कर्ज फेडू न शकणाऱ्यांकडेही असतात ‘हे’ 5 कायदेशीर अधिकार मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात ही सुविधा सुरू केली होती. त्यात 59 मिनिटांमध्ये कर्ज मिळू शकतं. या योजनेचं नाव PSB Loans in 59 Minutes आहे. या योजनेअंतर्गत 5 कोटींचं कर्ज केवळ 59 मिनिटांमध्ये मिळतं. कर्जाची रक्कम 8 दिवसांमध्ये तुमच्या अकाउंटमध्ये जाते. ही सुविधा गृहकर्ज आणि पर्सनल लोनसारख्या रिटेल लोनसाठीही सुरू केलीय. SPECIAL REPORT: दापोलीचा मतदारसंघात शिवसेना मंत्र्याचा मुलगा मारणार बाजी?

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: SBI
  • First Published :
जाहिरात
जाहिरात