मुंबई, 09 सप्टेंबर : आज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत काही बदल झालेले नाहीत. दोघांचेही भाव स्थिर आहेत. म्हणजे तुम्हाला जुनी किंमतच द्यावी लागेल. दिल्लीत आज पेट्रोलची किंमत 71.71 रुपये प्रति लीटर आहे आणि डिझेल 65.09 रुपये प्रति लीटर झालीय. मुंबईत पेट्रोल 74.44 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 68.26 रुपये प्रति लीटर आहे. कोलकत्त्यात पेट्रोलची जुनी किंमत 74.44 रुपये प्रति लीटर आणि डिझेलची 67.50 रुपये प्रति लीटर आहे. चेन्नईत पेट्रोल 74.51 रुपये प्रति लीटरला मिळतंय. तर डिझेल 68.79 रुपये प्रति लीटर आहे. Tiago, Harrier यासह TATA च्या या गाड्यांवर 90 हजारांपर्यंत सूट रोज पेट्रोल - डिझेलच्या किमतींचं समीक्षण करून सकाळी 6 वाजता नव्या किमती घोषित करतात. या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिकन डाॅलर्सचे भाव यावर ठरवल्या जातात. मूळ किंमतींमध्ये अबकारी कर (excise duty), डीलर कमीशन या सर्व बाबी मिळून इंधनाच्या दरामध्ये वाढ होते. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीवर भारतात पेट्रोल-डिझेलचे दर अवलंबून असतात. ‘असे’ करा EPFचे पैसे NPS मध्ये ट्रान्सफर, होईल मोठा फायदा आपल्या शहरातील इंधनाचे दर असे तपासा विशेष नोंदणीकृत क्रमांकावर SMS पाठवून तुम्हाला तुमच्या शहरातील इंधनाच्या दरांबाबत माहिती मिळवता येईल. पण ही सुविधा आपल्या फोनवरून उपलब्ध व्हावी, यासाठी एसएमएस पाठवण्यापूर्वी तुम्हाला कोणत्याही पेट्रोल पंपावरून डीलर कोड घ्यावा लागेल. SMS सुविधा मिळवण्यासाठी कोड असणं आवश्यक आहे. बँकेचं कर्ज फेडू न शकणाऱ्यांकडेही असतात ‘हे’ 5 कायदेशीर अधिकार इंडियन ऑयल ग्राहक RSP<डीलर कोड> 92249 9 2249 बीपीसीएल ग्राहक RSP<डीलर कोड> 9223112222 एचपीसीएल ग्राहक HPPRICE<डीलर कोड> 9222201122 या क्रमांकावर सुविधा पाठवून तुम्हाला इंधनाचे दर स्मार्टफोनवरच मिळवता येतील. CCTV VIDEO: धक्कादायक! भरधाव कारनं 3 महिलांना चिरडलं
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.