'असे' करा EPFचे पैसे NPS मध्ये ट्रान्सफर, होईल मोठा फायदा

'असे' करा EPFचे पैसे NPS मध्ये ट्रान्सफर, होईल मोठा फायदा

EPF, NPS - तुम्हाला जास्त पैसे हवे असतील तर तुमच्या PFचा असा करा वापर

  • Share this:

मुंबई, 07 सप्टेंबर : तुम्ही नोकरी करत असाल तर तुमचा PF असतोच. EPF चे व्याज दर सरकार ठरवतं. नॅशनल पेन्शन सिस्टिम म्हणजेच NPSमध्ये व्याज दर ठरलेला नसतो. तुमच्या पैशांच्या गुंतवणुकीचे अनेक पर्याय असतात. त्यात तुम्ही तुमचा EPF हा NPS मध्ये ट्रान्सफर करू शकता. त्याचे रिटर्न जास्त मिळतात.

NPS मध्ये गुंतवणूक केल्यानं करातही सवलत मिळते. 1.5 लाख रुपयांच्या टॅक्सची ही सवलत मिळते. शिवाय कलम 80CCD (1B)प्रमाणे अतिरिक्त 50 हजार रुपयांच्या कपातीचा फायदा मिळतो. निवृत्तीनंतर जास्त फायदा हवा असेल तर EPF तुम्ही नॅशनल पेन्शन सिस्टिम (NPS)मध्ये ट्रान्सफर करू शकता.

गोल्ड बाॅण्डची विक्री येत्या सोमवारपासून होणार सुरू, 'ही' आहे प्रति ग्रॅम किंमत

EPFचे पैसे NPSमध्ये कसे ट्रान्सफर करायचे?

त्यासाठी तुमच्याकडे NPSचं अकाउंट हवं. ते चालू असावं. तुम्ही NPSच्या पोर्टलवर जाऊन नवं अकाउंट उघडू शकता. NPS अकाउंट उघडण्यासाठी तुम्ही npstrust.org.in इथे क्लिक करा.

NPS अकाउंट उघडल्यावर तुम्ही EPF ट्रान्सफर करण्यासाठी अर्ज करू शकता. अर्ज केल्यानंतर EPFचे पैसे NPSमध्ये ट्रान्सफर होईल. PF अकाउंट NPSमध्ये तुमचे पैसे ट्रान्सफर करेल.

बँकेचं कर्ज फेडू न शकणाऱ्यांकडेही असतात 'हे' 5 कायदेशीर अधिकार

नोकरदारवर्गासाठी एम्प्लाॅयमेंट प्राॅव्हिडंट फंड काढणं आता एकदम सोपं झालंय. पीएफ निवृत्ती प्लॅनसाठी आहे. त्यात गुंतवणूक करण्याचा फायदा पुढच्या काळासाठी मिळू शकतो. सुरुवातीला लोक नोकरी बदलताना पीएफ ट्रान्सफर करायचे. पण आता ईपीएफओच्या रेकाॅर्डप्रमाणे पीएफ काढण्यासाठी जास्त अर्ज आलेले दिसतात. काही दिवसांपूर्वी EPFOच्या नियमात बदल केले गेलेत. आता तुम्ही ऑफलाइन पीएफ काढू शकत नाही. त्यासाठी एक अटही आहे.

कार झाली स्वस्त! 2 लाखांपर्यंत मिळणार सूट

हे झालेत नवे बदल

1. तुमचा आधार नंबर EPFOच्या युनिव्हर्सल अकाउंट नंबर ( UAN )शी लिंक असेल तर तुम्ही प्राॅव्हिडंट फंड म्हणजे PF ऑफलाइन काढू शकणार नाही.

2. म्हणजे आता तुम्ही PF ऑनलाइन काढू शकता. रिजनल कमिशन एन. के. सिंह यांच्या मते ईपीएफओनं फिल्ड ऑफिसमध्ये ऑफलाइन क्लेमची गर्दी वाढली. म्हणून हा निर्णय घेतलाय.

3. EPFO नं प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलंय की PF सदस्य फाॅर्म भरून PF क्लेम करत होते. त्यानं ऑफिसवर ओझं वाढत होतं.

4. यामुळे PF मिळायला उशीर व्हायचा. त्यामुळे आता ऑफलाइन क्लेम स्वीकारला जाणार नाही. कंपन्यांना ऑनलाइनचाच वापर करण्याचा सल्ला दिला गेलाय.

5. या प्रसिद्धी पत्रकात म्हटलंय की सदस्यांनी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही क्लेम केलं तर फक्त ऑनलाइन क्लेमच स्वीकारला जाईल.

6. असा करा ऑनलाइन क्लेम - यासाठी http://www.epfindia.com/site_en/ वर जावं लागेल. तिथे तुम्हाला ऑनलाइन क्लेमचा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक केलं तर https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ ही लिंक ओपन होईल.

7. इथे तुम्हाला युएन नंबर आणि पासवर्ड टाकावा लागेल. मग सबमिटचा पर्याय मिळेल. त्यानंतर विथड्राॅअल फाॅर्म कंपनीत द्यावा लागणार नाही.

8. ऑनलाइन क्लेम झाल्यानंतर फिल्ड ऑफिसर त्या क्लेमला व्हेरिफाय करेल. त्यासाठी तुम्हाला युनिफाइड पोर्टलवर केवायसी पूर्ण करावी लागेल.

VIDEO : आम्हीही ऐकून घेणार नाही, जलील यांचा 'वंचित'वर पलटवार

First published: September 7, 2019, 7:08 PM IST
Tags: EPF

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading