मुंबई, 25 मे : जून महिना सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सुट्ट्यांच्या यादीनुसार जून महिन्यात बँकांना एकूण 12 दिवस सुट्या असतील. जर तुम्हाला बँकेशी संबंधित काम करायचे असेल तर ते लवकर करुन घ्या. कारण नंतर सुट्ट्यांमुळे तुमची कामं अडकू शकतात. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या दिवशी बँका बंद राहतील. शनिवार, रविवार व्यतिरिक्त, आम्ही तुम्हाला या महिन्यात राज्यांमध्ये येणाऱ्या काही विशेष सुट्ट्यांबद्दल सांगत आहोत. ज्यामुळे तुम्ही तुमच्या कामाचं नियोजन करु शकता.
आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या सुट्ट्यांच्या यादीनुसार, या सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये आहेत. या सर्व सुट्ट्या सर्व राज्यांमध्ये लागू होणार नाहीत. त्याच वेळी, आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, रविवार व्यतिरिक्त महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद राहतील.
पती-पत्नी दोघांनाही PM किसान योजनेचा लाभ मिळेल? 6 ऐवजी येतील 12 हजार, जाणून घ्या नियम
4 जून - हा दिवस रविवार असल्याने संपूर्ण देशातील बँकांना सुट्टी असेल.
10 जून- या दिवशी महिन्याचा दुसरा शनिवार असल्याने बँकांना सुट्टी असेल.
11 जून- या दिवशी रविवार असल्यामुळे सुट्टी असेल.
15 जून - हा दिवस रज संक्रांती आहे, त्यामुळे मिझोराम आणि ओडिशामध्ये बँका बंद राहतील.
18 जून- या दिवशी रविवारची सुट्टी असेल.
20 जून- या दिवशी रथयात्रा निघणार असल्याने ओडिशा आणि मणिपूरच्या बँका बंद राहतील.
24 जून- हा दिवस जूनचा शेवटचा आणि चौथा शनिवार असल्याने देशभरातील बँका बंद राहणार आहेत.
25 जून- जूनला बँकांमध्ये रविवारची सुट्टी असेल
26 जून- खर्ची पूजेमुळे या दिवशी फक्त त्रिपुरामध्ये बँका बंद राहतील.
28 जून- महाराष्ट्र, जम्मू काश्मीर आणि केरळमध्ये ईद उल अजहानिमित्त बँका बंद राहतील.
29 जून- ईद-उल-अजहानिमित्त देशभरातील बँका बंद राहणार आहेत.
30 जून - मिझोराम आणि ओडिशातील बँका ईद-उल-अझाच्या सुट्टीमुळे बंद राहतील.
ट्रेनमध्ये काही निळे तर काही लाल रंगाचे कोच का असतात? दोघांत काय फरक?
आरबीआयच्या सुट्ट्यांच्या यादीनुसार, विविध राज्यांतील सण, शनिवार आणि रविवार पाहता बँकांना एकूण 12 दिवस सुट्या आहेत. यात दुसऱ्या आणि चौथ्या शनिवार आणि रविवारचाही समावेश आहे.
बँका बंद राहिल्यानंतरही ग्राहकांना कोणतीही अडचण येणार नाही. सुट्टीच्या दिवशीही लोक आपली सर्व कामे ऑनलाइन बँकिंगच्या मदतीने करू शकतात. त्यामुळे सुट्टीच्या दिवशीही तुम्ही घरी बसून बँकिंगची अनेक कामे करू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bank holidays, Money18