मराठी बातम्या /बातम्या /मनी /पती-पत्नी दोघांनाही PM किसान योजनेचा लाभ मिळेल? 6 ऐवजी येतील 12 हजार, जाणून घ्या नियम

पती-पत्नी दोघांनाही PM किसान योजनेचा लाभ मिळेल? 6 ऐवजी येतील 12 हजार, जाणून घ्या नियम

पीएम किसान योजनेचा पती-पत्नी दोघंही लाभ घेऊ शकता का?

पीएम किसान योजनेचा पती-पत्नी दोघंही लाभ घेऊ शकता का?

पती-पत्नी दोघंही शेतकरी असले तर त्यांना दोघांनाही वेगवेगळा पीएम किसान योजनेचा लाभ मिळेल का? याविषयी सरकारने स्पष्टीकरण दिलं आहे. यावर नेमकं काय म्हटलं ते पाहूया.

मुंबई, 24 मे : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जातेय. या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये दिला जातो. आतापर्यंत 13 हप्त्यांचे पैसे शेतकऱ्यांच्या अकाउंटवर जमा झाले आहेत. अशा वेळी देशभरातील मोठ्या संख्येने शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 14व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 14 व्या हप्त्यासाठी पैसे ट्रान्सफर करण्याबाबत सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण जर मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवायचा असेल तर केंद्र सरकार 26 मे ते 31 मे दरम्यान पीएम किसान योजनेच्या 14 व्या हप्त्यासाठी पैसे ट्रान्सफर करू शकते. या योजनेचा शेतकरी कुटुंबातील पती-पत्नी दोघांनाही फायदा होईल का? जाणून घेऊया…

पती-पत्नी दोघांनाही लाभ मिळेल का?

पीएम किसान सन्मान निधी योजना शेतकरी कुटुंबासाठी चालवली जाते. त्यामुळे पती-पत्नी दोघेही शेतकरी असले तरी कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळणार आहे. खुद्द सरकारने पीएम किसान पोर्टलवर याबाबत स्पष्टीकरण दिलेय. या योजनेमध्ये शेतकरी कुटुंबातील एकच व्यक्ती नोंदणी करू शकते. यासाठी एकापेक्षा जास्त व्यक्तींनी नोंदणी केल्यास ती रद्द केली जाते. दुसरीकडे, या योजनेचा लाभ दोन्ही लोकांना मिळत असेल, तर सरकार ते केव्हाही रिकव्हर करू शकते.

अशी चेक करा लाभार्थ्यांची लिस्ट

ज्या शेतकऱ्यांनी 13 व्या हप्त्यानंतर नोंदणी केली आहे आणि ते या योजनेशी आधीच जोडलेले आहेत, त्यांना पुढील हप्ता मिळेल की नाही हे सहज कळू शकते. पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध लाभार्थ्यांची यादी पाहून, तुम्हाला 14 व्या हप्त्यासाठी 2,000 रुपये मिळतील की नाही हे लगेच स्पष्ट होतं.

ऑनलाइन अशी मिळेल माहिती

-तुम्ही घरबसल्या PM किसान 2023 च्या नवीन यादीत तुमचे नाव चेक करु शकता. बेनिफिशियरी लिस्ट पाहणे खूप सोपे आहे.

-सर्वात आधी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर जा.

-येथे farmer corner अंतर्गत beneficiary list ऑप्शन आहे.

-beneficiary list ऑप्शनवर क्लिक करा.

-नवीन पेज उघडेल. यामध्ये पहिले राज्य, नंतर जिल्ह्याचे नाव, ब्लॉक आणि गाव सिलेक्ट करा.

-मागितलेली सर्व माहिती भरल्यानंतर get report वर क्लिक करा.

-असे केल्याने पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांची यादी तुमच्यासमोर उघडेल.

-ही लिस्ट पाहून तुमचे नाव लाभार्थी शेतकर्‍यांमध्ये आहे की नाही हे कळू शकते.

First published:
top videos

    Tags: Farmer, PM Kisan, PM Modi