जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Bank Holiday: जून महिन्यात कोणत्या दिवशी राहणार बँका बंद, खोळंबा टाळण्यासाठी इथे तपासा यादी

Bank Holiday: जून महिन्यात कोणत्या दिवशी राहणार बँका बंद, खोळंबा टाळण्यासाठी इथे तपासा यादी

Bank Holiday: जून महिन्यात कोणत्या दिवशी राहणार बँका बंद, खोळंबा टाळण्यासाठी इथे तपासा यादी

Bank Holidays in June 2021: जूनमध्ये काही ठराविक दिवसांसाठी बँका बंद राहणार आहेत. हल्ली बहुतांश बँका अधिकाधिक ऑनलाइन सेवा देत आहेत. मात्र तुम्हाला बँकेत जाण्याची आवश्यकता असेल तर याठिकाणी तपासा सुट्ट्यांची यादी

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 29 मे: कोरोना काळात (Coronavirus Pandemic) देशातील सर्वाधिक बँका त्यांच्या ग्राहकांना ऑनलाइन (Online Bank Service) सेवा देत आहेत. त्यामुळे बँकेत जाण्याची आवश्यकता भासत नाही आहे. परंतू जर तुम्हाला काही अत्यावश्यक कामासाठी बँकेत जायचे असेल तर त्याआधी बँकेला सुट्टी (Bank Holiday) कोणत्या दिवशी आहे हे माहित असणं आवश्यक आहे. जून महिन्यातही देशातील विविध भागात मिळून एकूण 9 दिवस बँका (Bank Holidays in June 2021) बंद राहणार आहेत. काही सुट्ट्या प्रत्येक राज्यानुसार वेगवेगळ्या असू शकतात. या 9 दिवसांमध्ये साप्ताहिक सुट्ट्यांचा देखील समावेश आहे. आरबीआयने जारी केलेल्या सुट्ट्यांच्या यादीनुसार या जून महिन्यात या सुट्ट्या असणार आहेत. त्यामुळे तुम्हाला जर खोळंबा टाळायचा असेल तर त्यापूर्वी तपासून घ्या कोणत्या दिवशी सुट्टी आहे. जून महिन्यात फार जास्त सणसमारंभ नाही आहेत. त्यामुळे साप्ताहिक सुट्टी व्यतिरिक्त केवळ तीनच इतर सुट्ट्या आहेत. त्या देखील काही राज्यांमध्येच आहेत. कारण वेगवेगळ्या राज्यातील फेस्टिव्हल नुसार सुट्ट्या वेगवेगळ्या असू शकतात. हे वाचा- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका! 1 जूनपासून प्रवासासाठी मोजावे लागणार अधिक पैसे इथे तपासा सुट्ट्यांची यादी 6 जून- रविवार 12 जून- दुसरा शनिवार 13 जून- रविवार 15 जून- मिथुन संक्रांती आणि रज पर्व (इजवाल-मिझोरम, भुवनेश्वर याठिकाणी बँका बंद राहतील) 20 जून- रविवार 25 जून- गुरु हरगोविंद जी यांची जयंती (जम्मू आणि श्रीनगरमधील बँका बंद राहतील) हे वाचा- बँकेचं दिवाळं निघालं तर बुडू शकतील 4.8 कोटी खाती; तुमचा पैसा सुरक्षित राहील का? 26 जून- दुसरा शनिवार 27 जून- रविवार 30 जून- रेमना नी (केवळ इजवालमध्ये बँका बंद राहतील) कोणत्याही नवीन अपडेटसाठी बँक ग्राहकांना सुट्टीची यादी नियमितपणे तपासण्याची आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर  जारी केलेल्या सुट्टीच्या यादीसह याची पडताळणी करण्याची शिफारस केली जाते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात