मराठी बातम्या /बातम्या /मनी /

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका! 1 जूनपासून प्रवासासाठी मोजावे लागणार अधिक पैसे

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका! 1 जूनपासून प्रवासासाठी मोजावे लागणार अधिक पैसे

Corona काळात प्रवास करताना हलगर्जीपणा नको

Corona काळात प्रवास करताना हलगर्जीपणा नको

मार्च महिन्यात देखील नागरी उड्डाण मंत्रालयाने (Ministry of Civil Aviation) देशांतर्गत विमानप्रवासाच्या भाड्याची किमान मर्यादा 5 टक्क्याने वाढवण्याचा निर्णय घेतला होता.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 29 मे: कोरोना काळात (Coronavirus Pandemic) विमानप्रवास पुन्हा एकदा महाग होणार आहे. सरकारने डोमेस्टिक फ्लाइट्सच्या (Domestic Flights) भाड्याची लोअर लिमिट 13 ते 16 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मार्च महिन्यात देखील नागरी उड्डाण मंत्रालयाने (Ministry of Civil Aviation) देशांतर्गत विमानप्रवासाच्या भाड्याची किमान मर्यादा 5 टक्क्याने वाढवण्याचा निर्णय घेतला होता. फेब्रुवारीमध्ये लोअर प्राइस बँडमध्ये 10 टक्के तर हायर प्राइस बँडमध्ये 30 टक्क्यांची वाढ झाली होती. त्यामुळे 1 जूनपासून तुम्ही जर विमानप्रवास करण्याचा विचार करत असाल तर तुमच्या खिशाला अधिकचा भूरदंड बसणार आहे.

विमान प्रवासभाड्यात झालेली ही वाढ एक जूनपासून (1st June) लागू होणार आहे. दरम्यान प्रवासभाड्याची कमाल मर्यादा सध्या स्थिर ठेवण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे एअरलाइन कंपन्यांना मदत मिळणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे विमान उड्डाणांची संख्या पुन्हा कमी झाली होती.

हे वाचा-1 जून पासून बदलणार 5 महत्त्वाचे नियम, LPG पासून ITR फायलिंगपर्यंत काय होणार बदल

40 मिनिटांच्या प्रवासासाठी किमान 2600 रुपये

नागरी उड्डाण मंत्रालयाने शुक्रवारी जारी केलेल्या अधिकृत आदेशानुसार 40 मिनिटांच्या प्रवासासाठी असणारं किमान भाडं 2300 वरून 2600 करण्यात आलं आहे. यामध्ये 13 टक्के वाढ करण्यात आली आहे. याशिवाय 40 ते 60 मिनिटांच्या प्रवासासाठी असणारं किमान भाडं 2900 वरून वाढवून 3300 प्रति व्यक्ती करण्यात आलं आहे.

हे वाचा-LIC पॉलिसी काढली असाल तर ALERT राहा! लुबाडली जाईल तुमची सर्व कमाई

हे आहेत 7 प्राइस बँड

देशात विमान प्रवासाला किती वेळ खर्ची होत आहे, त्यानुसार प्रवासभाड्याची कमाल आणि किमान मर्यादा निश्चित केली जाते. ही मर्यादा गेल्यावर्षी जवळपास दोन महिने चाललेल्या लॉकडाऊनंतर, जेव्हा 25 मे रोजी लॉकडाऊन उघडण्यात आला होता त्यावेळी निश्चित केली गेली होती. गेल्या वर्षी मेमध्ये डीजीसीएने देशांतर्गत उड्डाणांसाठी एकूण 7 फेअर बँडची घोषणा केली. हे 7 किंमत बँड प्रवासाच्या वेळेवर आधारित आहेत. पहिला बँड 40 मिनिटांपर्यंत प्रवास असणाऱ्या फ्लाइट्ससाटी आहे. उर्वरित बँड अनुक्रमे 40-60 मिनिटे, 60-90 मिनिटे, 90-120 मिनिटे, 120-150 मिनिटे, 150-180 मिनिटे आणि 180-210 मिनिटे असे आहेत.

First published:

Tags: Airplane, Coronavirus, Money