मराठी बातम्या /बातम्या /मनी /

बँकेचं दिवाळं निघालं तर बुडू शकतील 4.8 कोटी खाती; जाणून घ्या तुमचा पैसा सुरक्षित राहील का?

बँकेचं दिवाळं निघालं तर बुडू शकतील 4.8 कोटी खाती; जाणून घ्या तुमचा पैसा सुरक्षित राहील का?

बँकांमध्ये जमा असलेल्या ठेवींपैकी जवळपास 49.1 टक्के रक्कम सुरक्षित नाही, असं RBI चा ताजा अहवाल सांगतो.

बँकांमध्ये जमा असलेल्या ठेवींपैकी जवळपास 49.1 टक्के रक्कम सुरक्षित नाही, असं RBI चा ताजा अहवाल सांगतो.

बँकांमध्ये जमा असलेल्या ठेवींपैकी जवळपास 49.1 टक्के रक्कम सुरक्षित नाही, असं RBI चा ताजा अहवाल सांगतो.

नवी दिल्ली, 29 मे: जेव्हा एखाद्या बँकेचं दिवाळं निघतं तेव्हा खातेदाराजवळ एकमेव दिलासादायक पर्याय असतो ते म्हणजे इन्शुरन्स कव्हर. ते इन्शुरन्स कव्हर डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन म्हणजेच डीआयसीजीसी (Deposit Insurance and Credit Guarantee Corporation) द्वारे देण्यात येतं. 4 फेब्रवारी 2020 पासून डीआयसीजीसी (DICGC) अंतर्गत इन्शुरन्स कव्हरची रक्कम 1 लाख रुपयांहून 5 लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे.

ईटीच्या रिपोर्टनुसार, 4.8 कोटी बँक खात्यांमधील रक्कम आताही सुरक्षित नाही. आरबीआयच्या (RBI) ताज्या रिपोर्टनुसार, मार्च 2021 पर्यंत 252.6 कोटी खात्यांपैकी केवळ 247.8 कोटी खात्यांचाच इन्शुरन्स आहे. म्हणजे 4.8 कोटी खात्यांचा डीआयसीजीसी अंतर्गत इन्शुरन्स नाही. याचाच अर्थ जर बँकेचं दिवाळं निघालं तर या 4 कोटी खात्यांतील रक्कम मातीमोल ठरू शकते.

बँकेत जमा असलेल्या 49.1टक्के रकमेचा इन्शुरन्स नाही

रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, 2021 च्या मार्च महिन्याअखेरीस विमा असलेली रक्कम 76,21,258 कोटी रुपये होती. ही रक्कम 1,49,67,776 रुपयांच्या तुलनेत केवळ 50.9 टक्के आहे. म्हणजेच बँकांमध्ये जमा असलेल्या ठेवींपैकी जवळपास 49.1 टक्के रक्कम डीआयसीजीसीच्या कव्हरमध्ये नाही.

4.8 कोटी खात्यांमधील रक्कम (ठेवी) का सुरक्षित नाही?

डीआयसीजीसी कव्हर सर्व बँकांसाठी उपलब्ध आहे. त्यांना या सुविधेसाठी नोंदणी करावी लागते. तसेच इन्शुरन्स प्रिमिअम भरावा लागेल.

LIC पॉलिसी काढली असाल तर ALERT राहा! लुबाडली जाईल तुमची सर्व कमाई

आरबीआयच्या रिपोर्टनुसार, बँकांची डीआयसीजीसीसोबत नोंदणी करत नाहीत आणि इन्शुरन्स प्रिमिअम भरत नाहीत त्यामुळे त्यांच्याकडील ठेवी इन्शुरन्स कव्हरमध्ये येत नाहीत.

डिपॉझिट इन्शुरन्स कसं काम करतं?

डीआयसीजीसीच्या नियमावलीनुसार, बँकेचा परवाना रद्द करण्याची तारीख किंवा विलीनीकरणाची तारीख किंवा नवीन बँक स्थापन करण्याच्या तारखेच्या दिवशी बँकेत प्रत्येक ठेवीदाराजवळील मूळ रक्कम आणि व्याजाच्या रकमेसाठी जास्तीत जास्त 5 लाख रुपयांपर्यंतचा विमा काढला जातो. याचाच अर्थ असा, की एकाच बँकेत तुमची सर्व अकाउंट्स मिळून कितीही रक्कम असली तरी तुम्हाला केवळ 5 लाख रुपयांचे विमा कव्हर मिळते. या रकमेत तुमची मूळ रक्कम आणि व्याजाची रक्कम दोन्हीचा समावेश आहे. भविष्यात बँकेचं दिवाळं निघाल्यास जर तुमची मूळ रक्कम 5 लाख रुपये आहे, तर, तुम्हाला केवळ हीच रक्कम मिळेल. व्याज मिळणार नाही.

आता SBI च्या Debit Card वरही मिळते EMI ची सुविधा, पाहा कसा होईल फायदा

 या अकाउंट्सवर मिळतात डीआयसीजीसी इन्शुरन्स कव्हर -

डीआयसीजीसी द्वारे दिलं जाणारं विमा कव्हर सेव्हिंग अकाउंट्स, एफडी, करंट अकाउंट्स, आरडीसारख्या डिपॉझिट्वर लागू होतं. डीआयसीजीसीचं डिपॉझिट इन्शुरन्स एलएबी, पीबी, एसएफबी, आरआरबी आणि सहकारी बँकांसह विमा असलेल्या सर्व बँकांना मिळतं. 31 मार्च 2021 पर्यंत डीआयसीजीसीसह सर्व नोंदणीकृत विमा असलेल्या बँकांची संख्या 2,028 होती. त्यामध्ये 139 कमर्शिअल बँका आहेत. त्यापैकी 43 आरआरबी, 2 स्थानिक बँका, 6 पेमेंट बँका आणि 10 स्मॉल फायनान्स बँका आहेत. याशिवाय 1,919 कोऑपरेटिव्ह बँकांची देखील नोंदणी आहे. त्यापैकी 34 राज्य कोऑपरेटिव्ह बँक (एसटीसीबी), 347 जिल्हा केंद्रीय कोऑपरेटिव्ह बँक (डीसीसीबी) आणि 1,538 अर्बन कोऑपरेटिव्ह बँका आहेत.

First published:

Tags: Bank, Rbi