मराठी बातम्या /बातम्या /मनी /ITR Deadline: करदात्यांना दिलासा! वाढू शकते इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्याची तारीख

ITR Deadline: करदात्यांना दिलासा! वाढू शकते इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्याची तारीख

Income Tax Return Filing Deadline

Income Tax Return Filing Deadline

Income Tax Return Deadline: ई-फायलिंगमध्ये येणाऱ्या समस्यांमुळे केंद्रीय प्रत्यक्ष बोर्ड (CBDT) आर्थिक वर्ष 2020-21 (अॅसेसमेंट इयर 2021-22) साठी आयटीआर दाखल करण्याची डेडलाइन वाढवू शकते.

नवी दिल्ली, 24 ऑगस्ट: करदात्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे, तुम्ही अद्याप आयटीआर दाखल केला नसेल तर जाणून घ्या. आयकर विभागाच्या नव्या पोर्टलमध्ये सामान्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. काही तांत्रिक समस्यांमुळे कामंही रखडली आहेत. दरम्यान केंद्रीय प्रत्यक्ष बोर्ड  (CBDT) आर्थिक वर्ष  2020-21 (अॅसेसमेंट इयर 2021-22) साठी आयटीआर दाखल करण्याची डेडलाइन वाढवू शकते. आर्थिक वर्ष 2021 साठी आयटीआर दाखल करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर आहे. याआधी आयटीआर दाखल करण्याची तारीख 31 जुलै होती, मात्र अलीकडेच ही तारीख वाढवून 30 सप्टेंबर केली होती. दरम्यान आयकर विभागाने लाँच केलेल्या नवीन पोर्टलमध्ये काही अडचणींचा सामना करावा लागत आहे, त्यामुळे ही डेडलाइन वाढण्याची शक्यता आहे.

इन्फोसिसने तयार केलंय पोर्टल

टेक्नॉलॉजी कंपनी इन्फोसिसने (Infosys)हे नवं पोर्टल सुरू केलं होतं. आयटीआरची नवी वेबसाइट 7 जुलै रोजी लाँच करण्यात आली होती. आधी वेबसाइटचा अॅड्रेस incometaxindiaefiling.gov.in असा होता जो की बदलून incometax.gov.in करण्यात आला होता. मात्र सुरुवातीपासूनच या पोर्टलवर सामान्यांना अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला होता.

हे वाचा-Petrol Price Today: सामान्यांना मोठा दिलासा! पुन्हा कमी झाले पेट्रोल-डिझेलचे दर

नवीन पोर्टलवर आहेत या सुविधा

Income Tax 2.0 पोर्टलमध्ये अनेक नवीन पेमेंट मेथड्स समाविष्ट करण्यात आले आहेत. करदात्यांना नेट बँकिंग, UPI, क्रेडिट कार्ड, RTGS आणि NEFT सारखे पेमेंट पर्याय मिळतील, थेट त्यांच्या खात्यातून पैसे कापले जातील. याशिवाय नवीन साइटवर आयटीआरची प्रोसेसिंग वेगवान होईल, जेणेकरून करदात्यांना रिफंड लवकरात लवकर मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र लाँचनंतर लगेचच यामध्ये विविध समस्या पाहायला मिळाल्या

समस्या सोडवण्यासाठी 15 सप्टेंबर डेडलाइन

केंद्रीय अर्थ मंत्रालयाने इन्कम टॅक्स e-filing पोर्टलमधील अडचणींबाबत सोमवारी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अर्थमंत्रालयाने या सर्व अडची सोडवण्यासाठी 15 सप्टेंबर ही डेडलाइन निश्चित केली आहे. इन्फोसिसला या तारखेपर्यंच सर्व समस्या सोडवाव्या लागतील. इन्फोसिसच्या अधिकाऱ्यांना तसे निर्देश देण्यात आले आहेत.

हे वाचा-Gold Silver Price: स्वस्त झालं सोनं-चांदी, किंमतीत मोठी घरसण; इथे तपासा आजचा भाव

अर्थमंत्र्यासह झालेल्या बैठकीत इन्फोसिसच्या सीईओंनी अशी माहिती दिली की ते आणि त्यांची टीम ई-पोर्टलमधील अडचणी दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. यावर जवळपास 750 लोकांची टीम काम करत आहे. कंपनीचे सीईओ प्रवीण राव देखील या प्रोजेक्टवर लक्ष ठेवून आहेत.

First published:
top videos

    Tags: Money