नवी दिल्ली, 24 ऑगस्ट: तुम्ही देखील सोनंखरेदीचा विचार करत असाल तर सध्या तुमच्यासाठी चांगली संधी आहे. सोन्याचांदीच्या दरात (Gold-Silver) आज घसरण झाली आहे. एमसीएक्सवर (Multi Commodity Exchange MCX) सोन्याची वायदे किंमत (Gold price today) 0.19 टक्क्यांनी कमी होऊन 47,495 रुपये प्रति तोळा झाली आहे. तर चांदीचे दर (Silver Price Today) 0.2 टक्क्यांनी कमी होऊन 62,798 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. आधीच्या व्यवहाराच्या सत्रात सोन्याचांदीच्या किंमतीत उसळी पाहायला मिळाली होती. मात्र गेल्या वर्षभराचा विचार केला तर सोन्याच्या किंमतींचे प्रदर्शन घसरणीचे आहे.
ग्लोबल मार्केटबाबत बोलायचे झाले तर याठिकाणी आज सोनं स्वस्त झालं आहे. स्पॉट गोल्डमध्ये 0.2 टक्क्यांची घसरण झाल्यानंतर दर 1,801.78 डॉलर प्रति औंसवर आहेत. चर चांदीचे दर 0.5 टक्क्यांच्या घसरणीनंतर 23.54 डॉलर प्रति औंस आहेत.
हे वाचा-Petrol Price Today: सामान्यांना मोठा दिलासा! पुन्हा कमी झाले पेट्रोल-डिझेलचे दर
24 कॅरेट सोन्याचा भाव
गुड रिटर्न्स वेबसाइटच्या मते, दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 50630 रुपये, चेन्नईमध्ये 48670 रुपये, मुंबईमध्ये 47270 रुपये आणि कोलकातामध्ये 49410 रुपये प्रति तोळा इतका आहे.
मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचे दर
तुम्हाला जर सोन्याचांदीचे दर माहित करून घ्यायचे असतील तुम्ही घरबसल्या हे काम करू शकता. 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल. काही वेळात तुमच्या मोबाइल क्रमांकावर मौल्यवान धातूच्या किंमतीबाबत मेसेज येईल. शिवाय सोन्याच्या किंमतीबाबत लेटेस्ट अपडेट्ससाठी तुम्ही www.ibja.com या वेबसाइटला देखील भेट देऊ शकता.
हे वाचा-मुंबईतील महागड्या ठिकाणी टायगर श्रॉफने खरेदी केलं घर; घरातून दिसणार अरबी समुद्र
कशी ओळखाल सोन्याची शुद्धता?
जर तुम्हाला आता सोन्याची शुद्धता तपासून पाहायची असेल तर यासाठी सरकारकडून एक अॅप तयार करण्यात आले आहे. 'बीआयएस केअर अॅप' (BIS Care app) च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधात तक्रार देखील करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकांना त्वरित तक्रार नोंदविण्याची माहितीही मिळेल
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.