Home /News /news /

लॉकडाउनमुळे आर्थिक बाजू डळमळीत? या 4 सोप्या मार्गांनी मिळवा पैसे

लॉकडाउनमुळे आर्थिक बाजू डळमळीत? या 4 सोप्या मार्गांनी मिळवा पैसे

गेल्या वर्षीच्या लॉकडाउनचे परिणाम सर्वच क्षेत्रांत दीर्घ काळापर्यंत दिसत राहणार आहेत. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशी सगळ्यांचीच स्थिती आहे. अशावेळी काही पर्याय वापरून तुम्ही पैशांची तजवीज करू शकता

नवी दिल्ली, 23 मार्च: कोरोना विषाणूच्या (Coronavirus) फैलावामुळे जगभर पसरलेल्या महामारीमुळे (Pandemic) जे अनेक दुष्परिणाम झाले, त्यापैकी एक महत्त्वाचा दुष्परिणाम म्हणजे आर्थिक नुकसान. दीर्घकाळ लॉकडाउन (Lockdown) लागू करावा लागल्यामुळे छोटे-मोठे सगळेच उद्योगधंदे बंद ठेवावे लागले. त्याचा मोठा परिणाम अर्थचक्रावर झाला. (Financial Crisis) अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, अनेकांचे पगार कापले गेले, हातावर पोट असलेल्यांचे तर आणखीच हाल झाले. आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली असली, तरी कोरोना (Corona) पुन्हा डोकं वर काढतो आहे. तसंच गेल्या वर्षीच्या लॉकडाउनचे परिणाम सर्वच क्षेत्रांत दीर्घ काळापर्यंत दिसत राहणार आहेत. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशी सगळ्यांचीच स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर, अशा काही कल्पना पाहू या, की ज्या तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी थोडा हातभार लावू शकतील. घराची जागा भाड्याने देणं ई-कॉमर्स (E-Commerce) कंपन्यांना आपल्या घरातली थोडी जागा (Rent) भाड्याने देऊन पैसे कमावता येऊ शकतात. अलीकडे अनेक ई-कॉमर्स कंपन्या स्थानिक उद्योजकांसाठी अशा काही योजना आणतात, की ज्यात तुम्ही तुमचं घर भाड्याने देऊन लाखो रुपये कमावू शकता. एखाद्या स्टोअरचा आकार 250 वर्गफूट किंवा त्याहूनही कमी असू शकतो. जर तुमच्या घरात तेवढी जागा असेल, तर तुम्हीही पैसे कमावू शकता. त्या कंपन्यांच्या स्थानिक प्रतिनिधींना दोन ते चार किलोमीटरच्या परिसरातील ग्राहकांना उत्पादनं घरपोच करणं आणि रोज 20 ते 30 पॅकेजची डिलिव्हरी करणं, असं काम असतं. डिलिव्हरीवर आधारित शुल्काच्या अनुषंगाने यातून तुम्ही दर महिन्याला 18 ते 20 हजार रुपये मिळवू शकता. स्टॉक, बाँड, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक स्टॉक अर्थात शेअर्स (Stock), बाँड (Bond) आणि म्युच्युअल फंड (Mutual Fund) इत्यादी पर्यायांत पैसे गुंतवल्यास दीर्घ काळापर्यंत तुमच्या आर्थिक समस्या दूर करण्यास मदत होऊ शकते. मात्र त्यांची विक्री न करताही तुम्हाला काही रक्कम हातात मिळू शकते. बहुतांश बँका रिटेल ग्राहकांना म्युच्युअल फंड, स्टाँक आणि बाँड यांच्या लोन आणि इक्विटी योजनांमध्ये आपला भाग गहाण ठेवून तातडीने एक कोटी रुपयांपर्यंतचं कर्ज देण्याची परवानगी देते. एनबीएफसी 20 कोटी रुपयांपर्यंत कर्ज देऊ शकते. यात कमीत कमी 50 हजार रुपये कर्ज मिळू शकतं. कर्जाची रक्कम 50 ते 80 टक्क्यांपर्यंत असू शकते. कारचा उपयोग करा तुमच्याकडे कार असेल आणि तुम्ही आर्थिक संकटातून जात असाल, तर तुम्हाला कार न विकताही तिच्यापासून पैसे मिळू शकतात. कार (Car) हे अनेकांचं स्वप्न असतं. कष्टांनी ते स्वप्न पूर्ण केलेलं असतं. त्यामुळे अशी बिकट परिस्थिती आल्यानंतरही ती कार विकण्याचा धीर पटकन होत नाही. अशा स्थितीत कार न विकताही ती तुमच्या उत्पन्नाचं साधन बनू शकते. कारवर कर्ज घेऊन तुम्ही तुमची आर्थिक गरज भागवू शकता. साधारणतः किमान लाखभर रुपयांचं कर्ज मिळू शकतं. महत्त्वाच्या बँका कारच्या मूळ किमतीच्या 50 टक्क्यांपर्यंत कर्ज देऊ शकतात. यात कमी कागदपत्रं लागतात आणि त्या मानाने सुलभ पद्धतीने हे कर्ज मिळतं. जीवन विमा स्वस्त कर्ज मिळवण्यासाठी पीपीएफ (PPF) आणि जीवन विमा पॉलिसी (Insurance Policy) आदींचा उपयोग करता येऊ शकतो. पीपीएफ खातं उघडल्यानंतर तुम्ही तिसऱ्या वर्षापासून आणि सहाव्या वर्षापर्यंत कर्ज मिळवू शकता. तसंच एलआयसी अर्थात जीवन विमा पॉलिसीवरही कर्ज मिळू शकतं. पॉलिसी सरेंडर करण्याचं जे मूल्य असेल, त्याच्या 80 ते 90 टक्क्यांपर्यंतच्या रकमेएवढं कर्ज मिळू शकतं. हे कर्ज तीन ते पाच दिवसांत मिळू शकतं.
First published:

Tags: Car, Corona, Insurance, Investment, Lockdown, Money, Pandemic, PPF, Stock market

पुढील बातम्या