मुंबई, 20 जून 2023 : जून महिना संपण्यासाठी अजुन 10 दिवस बाकी आहेत. तेव्हाच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने जुलै 2023 मध्ये असणाऱ्या बँक हॉलिडेची लिस्ट जारी केली आहे. देशभरातील बँका जुलै 2023 मध्ये दुसऱ्या आणि चौथ्या शनिवार आणि रविवारसह सुमारे 15 दिवस बंद राहतील. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका खुल्या असतात. आरबीआयच्या गाइडलाइन्सनुसार, सर्व सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी बँका बंद राहतील आणि काही प्रादेशिक सुट्ट्या राज्य-स्पेसिफिक आहेत. यासोबतच प्रादेशिक सुट्ट्या संबंधित राज्य सरकारे ठरवतात. तसंच बँकिंग रेग्यूलेटरने बँकांना रविवारी बंद ठेवणं अनिवार्य केलंय. खुशखबर! या बँका FD वर देतात 9 टक्के व्याजदर, इथे चेक करा लिस्ट जुलै महिन्यात शनिवार आणि रविवार व्यतिरिक्त इतर आठ सुट्ट्या आहेत. ज्या 5 जुलैपासून गुरु हरगोविंदजींच्या जन्मदिनी सुरू होतील आणि 29 जुलै रोजी मोहरमच्या सुट्टीसह संपतील. काही राज्ये वगळता भारतातील सर्व बँकांना या सुट्ट्या लागू होतील. तसंच शनिवार रविवारच्या 7 सुट्ट्या आहेत. जुलै महिन्यात 5 रविवार आणि दोन शनिवार सुटी असणार आहेत. जुलै महिन्यात एकूण 15 सुट्ट्या आहेत. बँकेत कोणाचे फार महत्त्वाचे काम असेल, तर त्याचा वेळ बँकांच्या सुट्टय़ांनुसार काढावा लागतो. मात्र या काळात एटीएम, कॅश डिपॉझिट, ऑनलाइन बँकिंग आणि मोबाइल बँकिंग नेहमीप्रमाणे सुरू राहतील. Google Pay अॅपवर लाइव्ह झालं ‘हे’ जबरदस्त फिचर, पिन न टाकताच करता येईल ट्रांझेक्शन पाहा बँक हॉलिडे लिस्ट 2 जुलै 2023: रविवार 5 जुलै 2023: गुरु हरगोबिंद सिंह जयंती (जम्मू, श्रीनगर) 6 जुलै 2023: एमएचआईपी दिवस (मिजोरम) 8 जुलै 2023 : दूसरा शनिवार 9 जुलै 2023: रविवार 11 जुलै 2023: केर पूजा (त्रिपुरा) 13 जुलै 2023: भानु जयंती (सिक्किम) 16 जुलै 2023: रविवार 17 जुलै 2023: यू तिरोट सिंग डे (मेघालय) 21 जुलै 2023: द्रुक्पा त्शे-ज़ी (गंगटोक) 22 जुलै 2023 : चौथा शनिवार 23 जुलै 2023: रविवार 29 जुलै 2023: मुहर्रम (जवळपास सर्वच राज्यांमध्ये) 30 जुलै 2023: रविवार 31 जुलै 2023: शहादत दिवस (हरियाणा आणि पंजाब)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.