नवी दिल्ली, 20 जून : तुम्ही UPI पेमेंट प्लॅटफॉर्म PhonePe वापरत असाल तर तुमच्यासाठी एक गुडन्यूज आहे. आता Google Pay यूझर्ससाठी UPI पेमेंट करणं आणखी सोपं झालंय. कंपनीने आपल्या अॅपवर UPI Lite फीचर लाईव्ह केलं आहे. आता यूझर्स पिन न टाकता 200 रुपयांपर्यंत सहज पेमेंट करू शकतात. नुकतंच पेटीएम आणि फोनपेने देखील हे फिचर सुरू केले आहे. महत्त्वाचं म्हणजे, UPI लाइट सप्टेंबर 2022 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी लो व्हॅल्यूच्या यूपीआय पेमेंट फास्ट आणि सोप्या करण्यासाठी लॉन्च केले होते. UPI Lite द्वारे, तुम्ही एका क्लिकवर अनेक छोटे दैनंदिन ट्रांझेक्शन सहज करू शकता. Business Idea: 25 रुपयांचे होतील शेडको रुपये! फक्त हजार रुपयात घरीच सुरु करा हा बिझनेस, सरकारही करेल मदत! 200 रुपयांपर्यंतच्या ट्रांझेक्शनसाठी पिनची गरज नाही UPI Lite Wallet यूझर्सला एकदा लोड झाल्यावर 200 रुपयांपर्यंतच्या इंस्टंट ट्रांझेक्शनची परवानगी देते. 200 रुपयांपर्यंतच्या ट्रांझेक्शनवर पिनची गरज नाही. यामुळे पेमेंट प्रक्रिया सोपी आणि फास्ट होईल. यामध्ये एकावेळी जास्तीत जास्त 2 हजार रुपये अॅड करता येतील. तुम्ही 24 तासांमध्ये UPI Lite द्वारे कमाल 4,000 रुपये खर्च करू शकता. Term Insurance घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी पॉलिसीधारकाचा झाला मृत्यू? नॉमिनीला पूर्ण पैसा मिळेल का? Google Pay मध्ये UPI Lite फिचर कसं अॅक्टिव्हेट करायचं? -Google Pay अॅप ओपन करा. -अॅपच्या होम स्क्रीनच्या वरच्या उजव्या कोपर्यात तुमच्या प्रोफाइल पिक्चरवर क्लिक करा. -यानंतर UPI Lite Pay Pin Free वर क्लिक करा आणि सूचनांचे पालन करा. -पैसे अॅड करण्यासाठी UPI Lite ला सपोर्ट करणारे एलिजिबल बँक खाते निवडा. -तुम्ही UPI पिन टाकताच UPI Lite अकाउंट यशस्वीरित्या अॅक्टिव्ह होईल. -महत्त्वाचं म्हणजे तुम्ही Google Pay वर फक्त एक UPI Lite खाते तयार करू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.