जाहिरात
मराठी बातम्या / मनी / कमी पैशांत सुरु करा फुलांचा बिझनेस, या 5 टिप्स फॉलो केल्यास करता येईल बंपर कमाई

कमी पैशांत सुरु करा फुलांचा बिझनेस, या 5 टिप्स फॉलो केल्यास करता येईल बंपर कमाई

बिझनेस टिप्स

बिझनेस टिप्स

लग्नाच्या सीझनमध्ये फुलांची मोठ्या प्रमाणात मागणी असते. सजावर आणि आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी फुलं मागवली जातात. हीच संधी साधून तुम्ही फुलांचा बिझनेस सुरु करु शकता.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 2 मे: लवकरच लग्नसराईचा हंगाम सुरू होणार आहे. लोकांना त्यांचा खास दिवस अविस्मरणीय बनवायचा असतो. यासाठी ते भरपूर पैसे खर्च करायला तयार असतात. अशा वेळी लग्नसमारंभात फोटोग्राफरपासून तर केटरींगपर्यंत अनेक प्रकारचे बिझनेस जास्त चालतात. यामधील एक महत्त्वाचा बिझनेस म्हणजे फुलांची विक्री. लग्नांमध्ये फुलांची सजावट केली जाते. सध्याच्या काळात तर डेकोरेशनसाठी जास्त फुलं वापरली जातात. अशा वेळी फुलांचा बिझनेस करणं उत्तम आयडिया असू शकतो.

News18लोकमत
News18लोकमत

या टिप्स करा फॉलो

फुलांचा व्यवसाय यशस्वी होऊ शकतो का? : हा व्यवसाय सुरु करण्यासाठी जास्त गुंतवणूक करण्याची गरज नाही. हा व्यवसाय फक्त लग्नसराईमध्येच नाही तर बाराही महिने चालतो. लग्न सोहळ्यांसोबतच मंदिरांमध्ये पूजा करण्यासाठी किंवा मेळावा किंवा समारंभांमध्ये कोणत्याही विशेष पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी फुलांना मागणी असते. याशिवाय इतर कार्यक्रमांमध्येही फुलांनी सजावट करण्याची क्रेझ वाढत आहे. किती गुंतवणुकीने सुरुवात करता येईल : कमी पैशात तुम्ही फुलांचा व्यवसाय सुरू करू शकता. यासाठी तुम्हाला फार महागड्या उपकरणांची गरज नाही. हे काम सुरू करण्यासाठी, तुम्हाला फक्त 1,000-1,500 चौरस फूट जागा लागेल. यादरम्यान फुले ठेवणे, डीप फ्रीझर, फुले तोडणे, बांधणे, बुके बनवणे अशी उपकरणेही खरेदी करावी लागतील. यासोबतच तुम्ही थेट शेतकऱ्यांकडून किंवा बाजारातून फुले खरेदी करून कार्यक्रमस्थळी पाठवू शकता.

Flipkart वर या वर्षातील सर्वात मोठा सेल, मिळणार 80 टक्के डिस्काउंट, ही आहे तारीख

असा वाढवता येईल व्यवसाय: लग्नसमारंभात कार सजावट, कार्यक्रमस्थळी सजावटीसाठी फुलांचा अधिक वापर केला जातो. अशा वेळी तुम्ही वेडिंग प्लानर्स आणि कार डेकोरेशनशी संपर्क साधून तुमचा व्यवसाय वाढवू शकता. फुलांच्या अधिक आणि एकाच वेळी विक्रीसाठी, आपल्याला विवाह किंवा इतर तत्सम कार्यक्रम व्यवस्थापित करणाऱ्या लोकांशी संपर्क साधावा लागेल. या गोष्टी महत्त्वाच्या : कार्यक्रमांचे नियोजन करणारेच तुमचे ग्राहक बनले तर तुम्हाला भरपूर कमाई करता येईल. हा व्यवसाय वाढवण्यासाठी स्थानिक पातळीवर तुमचा संपर्क चांगला असणं आवश्यक आहे. यासोबतच ग्राहकांचे समाधान देखील खूप महत्वाचे असते. लोकांना तुमचे काम आवडले तर तुम्हाला ऑर्डरची कमतरता भासणार नाही.

इंजीनियर तरुणाने नोकरी सोडून उभारलं मिसळ हाऊस, आज लाखोंच्या कमाईसह 50 जणांना देतोय रोजगार!

डेकोरेशन आणि क्रिएटिव्ह स्किल्स: तुम्ही केलेली सजावट अशी असावी की ती लोकांना ती पहिल्याच नजरेत आवडेल. त्यासाठी योग्य प्रशिक्षण आणि कौशल्ये तुमच्याकडे असणं गरजेचं असतं. अशा वेळी तुम्ही तुमच्या कामात दक्ष असायला हवं. अन्यथा मग असा व्यक्ती कामावर घ्या जो या कामात परफेक्ट असेल. यासोबतच फअलोरल डेकोरेशनमध्ये मदत करण्यासाठी एका छोट्या टीमचीही गरज पडू शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात