जाहिरात
मराठी बातम्या / मनी / लग्नाच्या सीझनमध्ये असा सुरु करा डीजेचा बिझनेस, होईल 8 लाखांपर्यंतची कमाई!

लग्नाच्या सीझनमध्ये असा सुरु करा डीजेचा बिझनेस, होईल 8 लाखांपर्यंतची कमाई!

कसा सुरु करावा डीजेचा व्यवसाय

कसा सुरु करावा डीजेचा व्यवसाय

डीजे व्यवसायाबाबत लोकांमध्ये मोठी क्रेझ आहे. विशेषत: तरुणांनी हा व्यवसाय करण्यात अधिक इंट्रेस्ट दाखवलाय. त्यामुळे तुम्हालाही संगीताची आवड आणि समज असेल तर तुम्हीही हा व्यवसाय सुरू करू शकता.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

कोणत्याही लग्नात हाय म्यूझिक नसेल तर लग्न चांगलंच वाटत नाही. लग्न किंवा मिरवणूक संगीत आणि मस्तीशिवाय अपूर्ण वाटते. प्री-वेडिंग बॅचलर पार्टी असो किंवा महिला संगीत, डिस्क जॉकी म्हणजेच डीजेमुळे एक वेगळाच रंग येतो. यामुळेच डान्स आणि संगीताचे प्रेमी केवळ लग्नसमारंभातच नाही तर वाढदिवस, वर्धापनदिन यांसारख्या प्रसंगी डीजे बोलावतात. त्यामुळे गेल्या काही काळात डीजेचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढत आहे. डीजे व्यवसायाबाबत लोकांमध्ये मोठी क्रेझ आहे. विशेषत: तरुणांना हा व्यवसाय खूप आवडतो. त्यामुळे तुम्हालाही संगीताची आवड आणि समज असेल तर तुम्हीही हा व्यवसाय सुरू करू शकता.

News18लोकमत
News18लोकमत

करु शकता 8 लाख रुपयांपर्यंतची कमाई

समजा एखाद्या कार्यक्रमासाठी तुमच्या डीजेचे एका दिवसाचे भाडे 10,000 रुपये आहे. 365 दिवसांपैकी 80 दिवसांसाठी बुक केले जाते. त्यानुसार 10,000x80 आठ लाख रुपये कमवू शकतात. यामध्ये तुमच्या मॅनपावर, ट्रान्सपोर्टेशन आणि इतर खर्चाचाही समावेश होतो.

कमी पैशांत सुरु करा फुलांचा बिझनेस, या 5 टिप्स फॉलो केल्यास करता येईल बंपर कमाई

डीजे व्यवसाय कसा सुरू करायचा

सध्याच्या काळात जवळपास प्रत्येक लहान-मोठ्या कार्यक्रमात डीजे बोलावला जातो. त्याची लोकप्रियता देखील खूप वाढतेय. याच कारणामुळे सध्या डीजे सर्व्हिसची मागणी खूप वाढली आहे आणि तो एक अतिशय प्रॉफिटेबल बिजनेस बनला आहे. हा बिझनेस सुरु करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह, ते चालवण्याचे स्किल्स देखील आवश्यक आहे. तुम्ही डीजे घेतला म्हणजे तुम्हीच तो ऑपरेट करावा असं नाही. तुम्ही हे ऑपरेट करण्यासाठी लोकांनाही ठेवू शकता. परंतु हे इक्विपमेंट्स तुम्ही चांगल्या प्रकारे समजून घेतल्यास आणि ती योग्यरित्या चालवायला शिकलात तर तुम्हालाच फायदा होऊ शकतो.

लग्नाचा सीझन होतोय सुरु! कार रेंटल सर्व्हिस ठरु शकतो चांगला स्टार्ट अप

आवश्यक इक्विपमेंट्स

डीजे बिझनेस सुरू करण्यासाठी, तुम्हाला सीडी प्लेयर, लॅपटॉप, अॅम्प्लीफायर, डीजे मिक्सर, डीजे लाईट, साउंड सिस्टम, मायक्रोफोन, डीजे ट्युटेबल, म्युझिक ट्यून, डीजे डान्स फ्लोर आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या बजेटनुसार त्यांच्या उपकरणांची क्वालिटी निवडू शकता. तुमच्या गुंतवणुकीच्या बजेटनुसार तुम्ही त्यांना सेकंड हँड देखील खरेदी करू शकता.

अंदाजे किती पैसे लागतात?

डीजे सर्व्हिसचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला किमान 3 ते 4 लाख रुपये गुंतवावे लागतील. यासोबतच या व्यवसायांतर्गत तुमच्या ग्राहकांना सर्व्हिस प्रदान करण्यासाठी तुम्हाला काही मॅन पावर आणि वाहतुकीचा खर्चही सहन करावा लागतो. ते वेळ आणि लोकेशनवर अवलंबून असते.

असं करा रजिस्ट्रेशन

डीजेचा व्यवसाय कोणत्याही स्तरावर सुरू करण्यासाठी त्याचं रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे. या व्यवसायाचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी, प्रथम तुम्हाला स्थानिक प्राधिकरणाची परवानगी घ्यावी लागेल. ज्यांचा व्यवसाय नोंदणीकृत आहे त्यांच्यावर ग्राहकांचा अधिक विश्वास असल्याचे अनेक वेळा दिसून येते. अशा वेळी, जेव्हा तुम्हाला पेमेंट दिले जाते, तेव्हा ग्राहक तुमच्याकडून बिल देखील मागू शकतो. यासाठी तुम्हाला जीएसटी नोंदणी देखील करावी लागेल. मी तुम्ही तुमच्या उपकरणांचा विमा देखील काढू शकता. मालाचे नुकसान किंवा चोरी झाल्यास तुम्हाला जास्त नुकसान सहन करावे लागणार नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात