जाहिरात
मराठी बातम्या / मनी / लग्नाचा सीझन होतोय सुरु! कार रेंटल सर्व्हिस ठरु शकतो चांगला स्टार्ट अप

लग्नाचा सीझन होतोय सुरु! कार रेंटल सर्व्हिस ठरु शकतो चांगला स्टार्ट अप

कार रेंटल सर्व्हिस बिझनेस टिप्स

कार रेंटल सर्व्हिस बिझनेस टिप्स

Band Baja ani Business: तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल आणि तुम्हाला कारबद्दल चांगले ज्ञान असेल, तर कार रेंटल सर्व्हिस तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. लग्नसराईच्या मोसमात हा व्यवसाय जोरात चालतो.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 28 एप्रिल: लग्नसराई सुरु होत आहे. या काळात अनेक व्यवसाय जास्त चालतात. यापैकीच एक व्यवसाय म्हणजे कार रेंटल सर्व्हिस. सामान्य दिवसात, आपण कुठेही जाण्यासाठी कोणतेही वाहन वापरू शकतो. परंतु लग्नाच्या वेळी, वराला लग्नाच्या ठिकाणी त्याच्या प्रवेशासाठी काहीतरी खास हवं असतं. अशा वेळी अनेकदा विशेष कारची व्यवस्था केली जाते. आता, एका दिवसासाठी कोणतीही व्यक्ती नवीन कार खरेदी करत नाही. अशा वेळी कार भाड्याने घेतली जाते. लग्नसराईच्या काळात हा व्यवसाय खूप चांगला चालतो.

    News18लोकमत
    News18लोकमत

    जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल आणि तुम्हाला कारबद्दल चांगले ज्ञान असेल, तर कार भाड्याने देण्याची सेवा तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. लग्नसराईच्या काळात हा व्यवसाय खूप चांगला चालतो.

    कार रेंटल बिझनेस कसा सुरु करावा?

    -हा व्यवसाय सुरू करण्याच्या अनेक पद्धती आहेत. जर तुमची गुंतवणूक क्षमता जास्त असेल तर तुम्ही स्वतः काही कार खरेदी करू शकता. -जर तुम्हाला जास्त गुंतवणूक करायची नसेल, तर तुम्ही तुमच्या कारसह एखाद्या रेंटल सर्व्हिसशी जोडले जाऊन तुमच्या कारच्या बदल्यात पैसेही मिळवू शकता. -तुम्ही तुमची स्वतःची कार रेंटल कंपनी उघडू शकता. ज्याचे तुम्ही रजिस्ट्रेशनही करू शकता. यामध्ये तुम्ही ड्रायव्हर आणि काही स्टाफ नियुक्त करून लोकांना कार भाड्याने देण्याची सेवा देऊ शकता. -तुम्ही इतर कार मालकांना तुमच्या कंपनीशी अटॅच करून कमिशन मिळवू शकता. -लग्नाव्यतिरिक्त तुम्ही तुमच्या कारचा कॅब म्हणूनही वापर करू शकता.

    Business Ideas : लग्नसराईत करा कार्ड प्रिंटिंग बिझनेस ! कमी खर्चात होईल फायदाच फायदा

    कार भाड्याने देण्याची सेवा सुरू करण्यासाठी गुंतवणूक

    कार रेंटल बिझनेस सुरु करण्यासाठी लागणारी गुंतवणूक ही, तुम्हाला कोणत्या प्रकारे बिझनेस सुरु करायचाय यावर ठऱते. जर तुम्ही नवीन कार घेतली तर तुमची गुंतवणूक जास्त होईल, तर सेकंड हँड कार घेतल्यास गुंतवणुकीचे प्रमाण कमी होऊ शकते. जर तुम्हाला कार मालकाला तुमच्या कंपनीत जोडून कमिशन मिळवायचे असेल तर तुम्ही हा व्यवसाय अगदी कमी गुंतवणुकीत सुरू करू शकता. याशिवाय तुम्ही स्पेशल मोमेंट्ससाठी विंटेज किंवा लक्झरी कार खरेदी केल्यास ही रक्कम करोडो रुपयांपर्यंत पोहोचू शकते.

    भारतात झपाट्याने वाढतोय मेकअप इंडस्ट्री आणि मेहंदी व्यवसाय, कसा सुरु करावा हा बिझनेस?

    बिझनेसचं रजिस्ट्रेशन कसं होतं

    कार भाड्याने देण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी, तुम्हाला त्याचं रजिस्ट्रेशन करावं लागेल. तुम्‍हाला तुमच्‍या व्‍यवसायाची महानगरपालिका, नगरपालिका यांच्‍या स्‍थानिक प्राधिकरणाकडे नोंदणी करावी लागेल. यासोबतच टॅक्स रजिस्ट्रेशनही करावं लागणार आहे. बिझनेस मॉडेलनुसार रजिस्ट्रेशन आणि लायसेन्स भिन्न असू शकतात. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणते डॉक्यूमेंट्स गरजेचे असतील ते जाणून घेऊया. -ड्रायव्हिंग लायसेन्स -आरसी पेपर -पीयूसी पेपर -इन्शुरन्स -फिटनेस सर्टिफिकेट -स्थानिक प्राधिकरणाच्या नियमानुसार परवानगी पत्र

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: lifestyle
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात