जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Business Ideas : लग्नसराईत करा कार्ड प्रिंटिंग बिझनेस ! कमी खर्चात होईल फायदाच फायदा

Business Ideas : लग्नसराईत करा कार्ड प्रिंटिंग बिझनेस ! कमी खर्चात होईल फायदाच फायदा

लग्नसराईसाठी लग्नपत्रिकेच्या बिझनेसची आयडिया

लग्नसराईसाठी लग्नपत्रिकेच्या बिझनेसची आयडिया

Business Idea:असे अनेक व्यवसाय आहेत जे तुम्ही अगदी कमी गुंतवणुकीत सुरू करू शकता. यामुळे तुम्हाला चांगलं उत्पन्न देखील मिळू शकतं. आम्ही तुम्हाला अशाच एका व्यवसायाबद्दल सांगणार आहोत. जर तुम्ही व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही कार्ड प्रिंटिंगचा ऑप्शन निवडू शकता.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 27 जानेवारी: आपला व्यवसाय सुरु करावा असं अनेक जण ठरवतात. मात्र कोणता व्यवसाय करावा हेच कळत नाही. सध्याच्या काळात तसं बिझनेस करण्याच्या ऑप्शन्सची कमी नाही. तसं पाहिलं तर कोणताही व्यवसाय सेटअप करण्यासाठी भरपूर गुंतवणूक करावी लागते. परंतु असे काही व्यवसाय आहेत ज्यांच्या सेटअपसाठी मोठ्या रकमेची गरज नसते तर फक्त योग्य नियोजन करणं गरजेचं असतं. असे अनेक व्यवसाय आहेत जे तुम्ही अगदी कमी गुंतवणुकीत सुरू करू शकता. या व्यवसायांमधून तुम्हाला चांगलं उत्पन्न देखील मिळू शकतं. आम्ही तुम्हाला अशाच एका व्यवसायाबद्दल सांगणार आहोत. जर तुम्ही व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही कार्ड प्रिंटिंगचा सर्वोत्तम पर्याय निवडू शकता. हा एक चांगला फायदेशीर बिझनेस आहे जो तुमच्यासाठी चांगल्या उत्पन्नाचा स्रोत बनू शकतो.

या व्यवसायात आहे फायदाच फायदा

आपल्या देशातील सुमारे 65% लोकसंख्या 35 वर्षांपेक्षा कमी वयाची आहे. यामुळे, संपूर्ण देशात दरवर्षी होणाऱ्या विवाहांची संख्या लाखोंच्या घरात आहे. आता घरात लग्न असेल तर निमंत्रणपत्रिका देण्यासाठी लग्नपत्रिका छापण्याला प्रथम प्राधान्य दिले जाते. लग्नाच्या सीझनमध्ये, एकाच दिवशी हजारो कार्डे फक्त एकाच शहरात छापली जातात. दरम्यान तुम्हीही व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर, कार्ड प्रिंटिंगचा व्यवसाय हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. एवढंच नाही तर कार्ड प्रिंटिंग व्यवसायात तुम्ही केवळ लग्नपत्रिकाच नाही तर वाढदिवस किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमासाठी आमंत्रण पत्रिकाही छापू शकता. असे कार्यक्रम वर्षभर चालतात. अशा वेळी हा चांगला व्यवसाय ठरू शकतो.

भारतात झपाट्याने वाढतोय मेकअप इंडस्ट्री आणि मेहंदी व्यवसाय, कसा सुरु करावा हा बिझनेस?

कार्ड प्रिंटिंग कसे शिकायचे

कार्ड प्रिंटिंग शिकण्यासाठी तुम्हाला कोणत्याही कोर्सची गरज नाही. यासाठी तुम्ही ज्या लोकांचे आधीच प्रिंटिंगचे दुकान आहे त्यांना भेटा. या क्षेत्रात काम करणारे लोक तुम्हाला त्यातील बारकावे सहज समजावून सांगू शकतात. कार्ड प्रिंटिंगमध्ये वेगवेगळ्या रंगांची शाई वापरली जाते. वेगवेगळ्या रंगांची शाई कशी बदलायची आणि ती कोणत्या प्रमाणात वापरायची हे तुम्हाला माहीत असावं.

कार्डही कम्प्यूटरवरुन डिझाइन केले जातात

कार्ड सुंदर आणि आकर्षक बनवण्यासाठी उत्तम डिझायनिंग असणं अत्यंत आवश्यक आहे. कार्ड प्रिंट कोणीही करू शकतो, परंतु चांगले डिझाइन करणे ही प्रत्येकाला जमत नाही. इंटरनेटवर तुम्हाला अनेक कार्ड डिझाइन्स सापडतील. पण जर तुम्ही प्रिंटिंगच्या व्यवसायात उतरत असाल तर स्वत:ला अपडेट करणं खूप गरजेचं आहे. यासाठी तुम्हाला कार्ड डिझाइन शिकाव्या लागतील.

कोरोना काळात सुरू केला बिझनेस, 20 वर्षांच्या तरुणांनी कमावले 1200 कोटी रुपये, मुंबईतील तरुणांची सक्सेस स्टोरी

कार्ड प्रिंटिंग व्यवसायात फायदे

या व्यवसायात तुम्ही कमी गुंतवणूक जास्त नफा मिळवू शकता. खरंतर एका सामान्य कार्डची किंमत 10 रुपये आहे. कार्डची किंमत कार्ड आणि कागदाची गुणवत्ता आणि डिझाइन यावर अवलंबून असते. कार्डची क्वालिटी आणि डिझाइन जसजसे चांगले होत जाते, तसतसे त्याचे मूल्यही वाढते. हा एक फायदेशीर व्यवसाय आहे. कारण प्रत्येक लग्नात किमान 500 ते 1000 कार्डे छापली जातात. समजा तुम्ही 10 रुपयांचे कार्ड प्रिंट करत असाल तर त्यातील पूर्ण खर्च काढून तु्ही 3 ते 5 रुपये सहज वाचवू शकता. जर कार्ड महाग झाले तर 1 कार्डमध्ये ही बचत 10 ते 15 रुपयांपर्यंत होऊ शकते. त्यामुळे किती नफा कमावता येईल हे स्वतःच मोजा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात