मुंबई, 26 एप्रिल: सध्या देशभरात मेकअप इंडस्ट्री आणि मेहंदीचा व्यवसाय भारतात झपाट्याने वाढतोय. मुंबईतील बॉलीवूड हॉलीवूड इंटरनॅशनल (BHI) मेक अप आणि हेअर स्टाइलिंग अकादमीच्या मते, या उद्योगाचा वार्षिक वाढीचा दर 20% एवढा आहे. कारण आता भारतीयांमध्ये लग्नासारखे इव्हेंट संस्मरणीय बनवण्याची क्रेझ वाढली आहे. तुम्हालाही मेकअप आर्टिस्ट म्हणून तुमचा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर तुम्हाला मेकअपशी संबंधित प्रत्येक गोष्टीत परफेक्ट असणं आवश्यक आहे. मेकअप आर्टिस्ट ब्रायडलपासून ते ते पार्टी वेअर मेकअपपर्यंत सर्व प्रकारचा मेकअप करतात.
मेकअप आर्टिस्टचा बिझनेस
मेकअप आर्टिस्ट होण्यासाठी बारावीनंतर मेकअप कोर्स निवडता येतो. या क्षेत्रात अनुभव आणि टॅलेन्टला प्राधान्य दिले जात असले तरी कोर्स केल्यानंतर मोठ्या कॉस्मेटिक कंपन्यांमध्ये नोकरी मिळणं सोपं होते. मेकअपमधील बारकावे शिकण्यासाठी बहुतेक लोक डिप्लोमा कोर्सेसची मदत घेतात. हा कोर्स सहा महिने ते एक वर्षाचा आहे. ज्यामध्ये विद्यार्थ्यांना लेटेस् मेकअप आणि त्वचेशी संबंधित समस्यांबद्दल सांगितले जाते.
फक्त एकदा करा गुंतवणूक अन् 10 वर्ष करा बक्कळ कमाई, ‘हा’ बिझनेस करेल मालामाल!मेकअप कोर्सेस कोणते?
-फाउंडेशन प्रोग्राम इन मेकअप आर्टिस्ट्री -डिप्लोमा ऑफ ब्यूटी थेरेपी -मेकअप आर्टिस्ट सर्टिफिकेट कोर्स
मेकअप इंस्टीटियूट
-व्हीएससीसी इंस्टीटियूट, दिल्ली -सिम्बायोसिस स्किल अँड प्रोफेशनल यूनिव्हर्सिटी, पूणे -एशियन अकॅडमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन, नोएडा -जावेद हबीब हेयर अँड ब्यूटी अकॅडमी, पूणे -आयएसएएस इंटरनॅशनल ब्यूटी स्कूल, पूणे
Business idea: निशिगंधाचं फूल तुम्हाला करेल मालामाल! कमी गुंतवणुकीत सुरु करा जबरदस्त बिझनेसहा बिझनेस कसा सुरु करु शकता?
1. प्रत्येक गोष्ट बारकाईने शिका मेकअफ आर्टिस्ट आणि मेहंदी बिझनेसमध्ये यशस्वी होण्यासाठी त्या गोष्टींसंबंधीत सर्व गोष्टींचे ज्ञान आवश्यक आहे. म्हणूनच हा बिझनेस सुरु करण्यासाठी पहिले ट्रेनिंग घेणे आवश्यक आहे. ट्रेनिंग घेतल्यानंतरही स्वतःला नेहमी अपडेट ठेवणं गरजेचं असतं. मेकअप ट्रेंड नेहमीच बदलत राहतात. यामुळे एक यशस्वी मेकअफ आर्टिस्ट बनण्यासाठी तुम्हाला बदलत्या ट्रेंड्सची माहिती असणं गरजेचं असतं. 2. बिझनेस प्लान बनवा एक एंटरप्रेन्योर म्हणून यशस्वी होण्यासाठी प्लान आखणे अत्यंत आवश्यक आहे. हे तुम्हाला तुमच्या बिझनेसमधील वैशिष्ट्य शोधण्यात मदत करेल. तुमच्या प्लॅनमध्ये तुमचा व्यवसाय उभारायला किती पैसे लागतील, टार्गेट मार्केट काय असेल, तुम्ही ग्राहकांकडून किती पैसे घेऊ शकता, तुम्ही व्यवसायाला काय नाव द्याल, तुम्हाला आवश्यक परवानग्या आणि परवाने कोठून मिळतील, वेबसाइट कुठून बनवाल. साहित्य कुठून खरेदीकला. अशा प्रकारच्या गोष्टी सामिल केल्या जाऊ शकतात. 3. मार्केटिंग खूप महत्वाचे आहे व्यवसायाच्या यशासाठी मार्केटिंग खूप महत्वाचे आहे. तुम्हाला तुमच्या कौशल्याबद्दल लोकांना सांगावे लागेल. सध्या यासाठी सोशल मीडिया हा सर्वोत्तम पर्याय आहे. तुम्ही तुमचे मेकअप व्हिडिओ फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम सारख्या प्लॅटफॉर्मवर टाका, लाइव्ह मेकअप व्हिडिओ बनवा आणि फोटो शेअर करा. यासोबतच तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्सही शेअर करा. याद्वारे लोकांना तुमच्याबद्दल माहिती होईल आणि जे इंट्रेस्टेड असतील त्यांच्याकडून ऑर्डर मिळणं सुरु होईल. या गोष्टी लक्षात ठेवा -मेक-अप किंवा मेहंदी लावणे ही एक कला आहे आणि जो त्यात पारंगत आहे तो त्यात यशस्वी होऊ शकतो. -तुम्ही एखाद्या कलाकाराला कामावर घेऊन व्यवसाय सुरू करत असाल, तर फक्त प्रोफेशनल कामावर घ्या. -ही बाब त्वचेशी संबंधित आहे, त्यामुळे वापरल्या जाणाऱ्या वस्तू चांगल्या क्वालिटीच्या असाव्यात. -मेकअप किंवा मेहंदी कलाकार होण्यासाठी कोणत्याही पदवीची आवश्यकता नाही, तुम्ही प्रमाणपत्र-डिप्लोमा कोर्स करू शकता.