जाहिरात
मराठी बातम्या / मनी / कोरोना काळात सुरू केला बिझनेस, 20 वर्षांच्या तरुणांनी कमावले 1200 कोटी रुपये, मुंबईतील तरुणांची सक्सेस स्टोरी

कोरोना काळात सुरू केला बिझनेस, 20 वर्षांच्या तरुणांनी कमावले 1200 कोटी रुपये, मुंबईतील तरुणांची सक्सेस स्टोरी

सक्सेस स्टोरी

सक्सेस स्टोरी

2021 मध्ये दोन्ही मित्रांनी मिळून Zepto सुरू केलं. या साठी, 2021 मध्ये, त्यांनी 86 किराणा दुकानांशी कनेक्ट केलं आणि 10 लाख ऑर्डर डिलिव्हर केल्या.

  • -MIN READ Local18 Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 18 एप्रिल: साधारणपणे 20 वर्षांपर्यंत मुलं शिकत असतात, हे अभ्यासाचं वय असतं, असं म्हटलं जातं. या वयातील विद्यार्थी तारुण्याच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवताच आपल्या करिअरचा विचार करू लागतात. पण लहान वयातच 1200 कोटी रुपयांचा बिझनेस उभारणारा आदित पालिचा याला अपवाद होता. आदित पालिचा एका कंपनीचा सीईओ आहे. त्याच्या कंपनीचं 2022 मधील व्हॅल्युएशन 900 मिलियन डॉलर्स म्हणजेच 7300 कोटी रुपयांपेक्षा जास्त होतं. विशेष म्हणजे अवघ्या एका वर्षात या मुलाने आपल्या मित्राबरोबर कोट्यवधींची उलाढाल करणारी कंपनी स्थापन केली. ऑनलाइन ग्रोसरी डिलिव्हरी प्लॅटफॉर्म Zepto 2021 मध्ये लाँच करण्यात आला होता.

    News18लोकमत
    News18लोकमत

    2001 मध्ये मुंबईत जन्मलेल्या आदित पालिचाने वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी आंत्रप्रेन्युअरशिपला सुरुवात केली. त्यांनी GoPool नावाचं स्टार्टअप सुरू केलं. कम्प्युटर इंजिनीअरिंग पूर्ण करण्यासाठी तो यूएसमधील स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीत गेला, परंतु स्टार्टअप सुरू करण्यासाठी त्याने अभ्यासक्रम अर्धवट सोडला आणि त्याच्या यशस्वी स्टार्टअपने त्याचा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध झाले.

    फक्त एकदा करा गुंतवणूक अन् 10 वर्ष करा बक्कळ कमाई, ‘हा’ बिझनेस करेल मालामाल!

    कंपनीची उलाढाल 1 महिन्यात कोटींवर पोहोचली

    आदितने त्याचा मित्र कैवल्य व्होरा याच्याबरोबर एप्रिल 2021 मध्ये ऑनलाइन ग्रोसरी डिलिव्हरी प्लॅटफॉर्म Zeptoची सुरुवात केली. स्टार्टअप सुरू केल्याच्या 1 महिन्याच्या आत, कंपनीचं व्हॅल्युएशन 200 मिलियन डॉलर्स झालं. कोरोना महामारीच्या काळात त्यांनी 10 मिनिटांत किराणा सामान पोहोचवण्यासाठी हे स्टार्टअप सुरू केलं आणि त्यांची संकल्पना खूप यशस्वी झाली. आदित पलिचाचा मित्र आणि कंपनीचा को-फाउंडर कैवल्य व्होरा यांचीही कहाणी अशीच आहे. दोघांनी स्टार्टअप सुरू करण्यासाठी स्टॅनफोर्डमधील शिक्षण अर्धवट सोडलं. याआधी दोघांनी किरणकार्ट नावाचं स्टार्टअप सुरू केलं होतं, परंतु त्यांना त्यांचं प्रॉडक्ट बाजारात फिट बसत नसल्याचं वाटलं, म्हणून त्यांनी ते स्टार्टअप बंद केलं.

    Business idea: निशिगंधाचं फूल तुम्हाला करेल मालामाल! कमी गुंतवणुकीत सुरु करा जबरदस्त बिझनेस

    कोरोना काळात हिट झाली बिझनेस आयडिया -

    2021 मध्ये दोन्ही मित्रांनी मिळून Zepto सुरू केलं. या साठी, 2021 मध्ये, त्यांनी 86 किराणा दुकानांशी कनेक्ट केलं आणि 10 लाख ऑर्डर डिलिव्हर केल्या. कंपनी लाँच केल्यावर 5 महिन्यांत त्यांचं व्हॅल्युएशन 570 मिलियन डॉलरवर पोहोचलं. या यशासाठी आदित आणि कैवल्य यांचा हुरुनच्या अंडर 30 उद्योजकांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. सध्या Zepto भारतातील 10 प्रमुख शहरांमध्ये कार्यरत आहे. कंपनीत 1,000 कर्मचारी काम करतात. हे प्लॅटफॉर्मवर 3,000 प्रॉडक्ट्स डिलिव्हर करतं. यामध्ये फळं, भाजीपाला ते किराणामालाचा समावेश आहे. झेप्टोची खासियत म्हणजे त्यांची वेगवान डिलिव्हरी सर्व्हिस आहे. ते 10 ते 15 मिनिटांत सामानाची डिलिव्हरी करतात.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात