मराठी बातम्या /बातम्या /मनी /या स्टॉकने गुंतवणूकदारांना केले मालामाल, दिला 140 टक्क्यांचा रिटर्न! तुमच्याकडे आहे का हा शेअर?

या स्टॉकने गुंतवणूकदारांना केले मालामाल, दिला 140 टक्क्यांचा रिटर्न! तुमच्याकडे आहे का हा शेअर?

गेटवे डिस्ट्रिपार्क्स (Gateway Distriparks Share Price) हा आशिष कोचालिया यांच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट असलेल्या स्टॉकपैकी आहे. हा स्टॉक 2021 च्या अशा मल्टीबॅगर स्टॉकपैकी एक आहे, ज्याने या वर्षी चांगला रिटर्न दिला आहे.

गेटवे डिस्ट्रिपार्क्स (Gateway Distriparks Share Price) हा आशिष कोचालिया यांच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट असलेल्या स्टॉकपैकी आहे. हा स्टॉक 2021 च्या अशा मल्टीबॅगर स्टॉकपैकी एक आहे, ज्याने या वर्षी चांगला रिटर्न दिला आहे.

गेटवे डिस्ट्रिपार्क्स (Gateway Distriparks Share Price) हा आशिष कोचालिया यांच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट असलेल्या स्टॉकपैकी आहे. हा स्टॉक 2021 च्या अशा मल्टीबॅगर स्टॉकपैकी एक आहे, ज्याने या वर्षी चांगला रिटर्न दिला आहे.

मुंबई, 12 नोव्हेंबर: शेअर बाजारातील गुंतवणुकीकडे अनेक गुंतवणूकदार आकर्षित होत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून मल्टीबॅगर शेअरने देखील जबरदस्त रिटर्न (investment return) दिला आहे. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर (Investment in Share Market) तुम्ही मल्टीबॅगर स्टॉक्सचा (Investment in Multibagger stock) विचार करू शकता. शिवाय तुम्ही एखाद्या तज्ज्ञ गुंतवणूकदाराच्या पोर्टफोलिओनुसारही गुंतवणूक करू शकता. दिग्गज आशिष कोचालिया यांच्या पोर्टफोलिओतील (Ashish Kochalia Portfolio) हा मल्टीबॅगर स्टॉकही तुम्हाला चांगला रिटर्न देईल. जाणून घ्या कोणता आहे हा स्टॉक?

आशिष कोचलिया हे बेंचमार्क निर्देशांकापेक्षा स्वस्त शेअर्स निवडण्यासाठी ओळखले जातात. गेटवे डिस्ट्रिपार्क्स (Gateway Distriparks Share Price) हा आशिष कोचालिया यांच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट असलेला असाच एक स्टॉक आहे. हा स्टॉक 2021 च्या अशा मल्टीबॅगर स्टॉकपैकी एक आहे, ज्याने या वर्षी आतापर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना 140 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

हे वाचा-क्रिप्टोकरन्सीमध्ये एका दिवसात डोळे दिपवून टाकणारी वाढ,गुंतवणूकदार झाले कोट्यधीश

असे असूनही मार्केट एक्सपर्ट्स या स्टॉकवर बुलिश आहेत आणि गुंतवणूकदारांना घसरणीत खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. येत्या काही दिवसांत या शेअरमध्ये नफावसुली पाहायला मिळू शकेल, असे जाणकारांचे मत आहे. अशा स्थितीत हा स्टॉक खाली येईल तेव्हा त्याची खरेदी करण्याची चांगली संधी असेल असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

सहा महिन्यांत 291 रुपयांवर पोहोचला हा शेअर

गेल्या एका महिन्यात, हा मल्टीबॅगर स्टॉक 1 महिन्यात 261.55 रुपयांवरून 291 रुपयांपर्यंत वाढला आहे. या कालावधीत समभागाने सुमारे 12 टक्के परतावा दिला आहे. गेल्या 6 महिन्यांत हा स्टॉक 257.10 रुपयांवरून 291 रुपयांपर्यंत वाढला आहे. या कालावधीत 14 टक्के परतावा दिला आहे. यावर्षी आतापर्यंत या स्टॉकने 121.20 रुपयांपासून 291 रुपयांपर्यंत वाढ दर्शविली आहे.

काय आहे तज्ज्ञांचे म्हणणे?

चॉईस ब्रोकिंगचे सुमीत बगडिया सांगतात की, या शेअरमध्ये घसरण झाली, तर 280 रुपयांच्या आसपास खरेदी करावी. अल्पावधीत हा स्टॉक 320-330 रुपयांवर पोहोचेल.

हे वाचा-8 रुपयांचा शेअर पोहोचला ₹1090 वर, 1 लाखांचे बनले 1 कोटी रुपयांपेक्षाही जास्त!

गेटवे डिस्ट्रीपार्क्समध्ये आशिष कोचलिया यांचा हिस्सा 19,17,606 शेअर्सचा आहे. ही भागीदारी कंपनीने जारी केलेल्या पेड-अप भांडवलाच्या 1.54 टक्के आहे.

First published:

Tags: Money, Share market