नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर: जगभरात आता क्रिप्टोकरन्सी (Crypto Currency) चांगलीच लोकप्रिय होत आहे. अत्यंत झपाट्यानं वाढणारी ही करन्सी अनेकांना मालामाल करत आहे. त्यामुळे या करन्सीमध्ये गुंतवणूक करण्याकडे कल वाढत आहे. नवनवीन क्रिप्टोकरन्सीज दाखल होत असून, अनेक अनोखे ट्रेंड्स (Trends) क्रिप्टोकरन्सीच्या जगात पाहायला मिळत आहेत. काही क्रिप्टोकरन्सीज एका दिवसात डोळे दिपवून टाकणारी वाढ नोंदवून सर्वांना थक्क करत आहेत, तर अचानक एखादी करन्सी शून्यावर जात असल्याचंही दिसत आहे. सध्या क्रिप्टो जगाला कोकोस्वॅप (KokoSwap) या नवीन करन्सीनं आश्चर्याचा धक्का दिला आहे. या करन्सीनं एका दिवसात 76 हजार टक्क्यांहून अधिक परतावा देऊन आपल्या गुंतवणूकदारांना कोट्यधीश केलं आहे. त्यामुळं एका दिवसात ही करन्सी जगप्रसिद्ध झाली आहे. याआधी कोकोस्वॅपचं नावदेखील फारसं कोणी ऐकलं नव्हतं; मात्र तिच्या प्रचंड वाढीनं सगळीकडे त्याचीच चर्चा आहे. या करन्सीचं बाजारमूल्य (Markt Cap) आता तब्बल 2 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचलं आहे.
अलीकडेच स्क्विड गेम (Squid Game) या वेबसीरिजवर आधारित स्क्विड गेम (SquidGame) टोकनमध्येही असाच आश्चर्यजनक ट्रेंड दिसून आला होता. अवघ्या काही दिवसांत स्क्विड गेम टोकनची किंमत अनेक हजार पटींनी वाढली आणि नंतर ती एकाच दिवसात शून्य झाली. त्याच वेळी, शिबा इनूसारख्या माइमकॉइननं (Mimecoin) या काळात हजारो गुंतवणूकदारांना लक्षाधीश बनवलं. आता ही करन्सी जगातल्या टॉप-10 क्रिप्टोमध्ये सामील झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cryptocurrency, Investment