नवी दिल्ली, 3 जानेवारी : नवीन वर्षात तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स घ्यायचा असेल तर आता चांगले पर्याय आहेत. विमा कंपन्या अनेक प्रकारच्या योजना ऑफर करतात. त्यामुळे सामान्य माणसाचा गोंधळ उडतो. म्हणूनच विमा नियंत्रक यंत्रणा म्हणजेच (IRDAI) ने सगळ्या विमा कंपन्यांना एक लाख ते 5 लाख रुपयांपर्यंतचा स्टँडर्ड इंडिव्हिज्य़ुअल हेल्थ इन्शुरन्स उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
'आरोग्य संजीवनी पॉलिसी'
हेल्थ इन्शुरन्सच्या बाजारपेठेत स्वतंत्र पॉलिसीचे काही पर्याय आहेत. प्रत्येक विमा पॉलिसीची वेगवेगळी वैशिष्ट्यं असल्याने ती निवडण्यात अडचणी येतात. त्यामुळे आरोग्य संजीवनी पॉलिसी नावाची एक स्टँडर्ड पॉलिसी असेल. या पॉलिसीसोबत कंपन्या आपलं नाव जोडू शकतात.या पॉलिसीमध्ये ग्राहकांना मूलभूत आरोग्यसुविधा पुरवल्या जातील.
कमीत कमी एक लाखांचं कव्हर?
या योजनेअंतर्गत कमीतकमी 5 लाख रुपये ते जास्तीत जास्त 1 लाख रुपयांचं कव्हरेज असेल. यामध्ये अत्यावश्यक आरोग्य सेवांचा समावेश असेल. यात कोणतीही अॅड ऑन सेवा नसेल. कंपन्या या निर्देशांच्या चौकटीत राहून पॉलिसीच्या किंमती ठरवू शकतात.
(हेही वाचा : यावर्षी श्रीमंत बनायचंय? या 7 गोष्टी केल्यात तर राहाल टेन्शन फ्री)
या चार्जेसचा सहभाग
मूलभूत उपचारांमध्ये हॉस्पिटलमध्ये भर्ती होण्याचा खर्च, एका मर्यादेपर्यंत मोतीबिंदूवरच्या उपचारांचा खर्च, एखाद्या आजारामुळे करावी लागणारी प्लॅस्टिक सर्जरी, दातावरचे उपचार अशा खर्चांचा समावेश असेल.
आयुष योजना
आयुष योजनेनुसार हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होण्याचा खर्च, त्याचबरोबर आधीचा एक महिना आणि डिस्चार्जनंतरचे दोन महिने हा खर्च कव्हर होईल. ही विमा पॉलिसी कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 65 वर्षांच्या वयोगटात घेता येईल. ही विमा पॉलिसी पोर्टेबल असेल आणि सगळ्या देशात सारखीच असेल. एक एप्रिल 2020 पासून ही विमा पॉलिसी ग्राहकांसाठी आणावी, अशा सूचनाही विमा कंपन्यांना देण्यात आल्या आहेत.
================================================================================
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.