Home /News /money /

Amazon चा सर्वात मोठा सेल! लॅपटॉपवर 30 हजारांपर्यंत तर स्मार्टफोन्सवर मिळवा 10000 पर्यंतची सूट

Amazon चा सर्वात मोठा सेल! लॅपटॉपवर 30 हजारांपर्यंत तर स्मार्टफोन्सवर मिळवा 10000 पर्यंतची सूट

Amazon Prime Day सेल 26 आणि 27 जुलै रोजी असणार आहे, यामध्ये ग्राहकांना लॅपटॉप्स आणि मोबाइल खरेदीवर धमाकेदार ऑफर्स आणि डिस्काउंट मिळणार आहे.

    नवी दिल्ली, 19 जुलै: अ‍ॅमेझॉनवर प्राइम डे सेल (Amazon Prime Day Sale) लवकरच सुरू होणार आहे. Amazon Prime Day Sale मध्ये याहीवर्षी नवीन आणि जुन्या प्राइम ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काही आकर्षक ऑफर्स कंपनीने आणल्या आहेत. अ‍ॅमेझॉन प्राइम डे सेलमध्ये स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस, लॅपटॉप्सची खरेदी करण्याची सुवर्णसंधी ग्राहकांना मिळते आहे. अनेक ग्राहक या सेलची वाटही पाहत असतात. यामध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तूव्यतिरिक्त घरासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तूंची खरेदी देखील तुम्हाला करता येईल. अ‍ॅमेझॉनकडून प्राइम मेंबर्ससाठी 26 आणि 27 जुलै रोजी वर्षातील सर्वात मोठा सेल  असणार आहे. 27 जुलै रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत हा सेल असणार आहे. यामध्ये तुम्ही खास ऑफर्स, डिस्काउंट्स मिळवू शकता. हा सेल लाइव्ह जाण्यासाठी एका आठवड्याचा कालावधी शिल्लक राहिला आहे, तरी अद्याप नेमक्या कोणत्या ऑफर्स यामध्ये दिल्या जाणार आहेत याचा खुलासा कंपनीकडून करण्यात आलेला नाही. मात्र प्रीमियम स्मॉर्टफोन्स आणि अन्य गॅजेट्सना टीज करण्यात आले आहे जे कमी किंमतीत उपलब्ध आहेत. हे वाचा-Amazon Prime Day: 10000 रुपयांत खरेदी करा हे बजेट स्मार्टफोन, जाणून घ्या फीचर्स अ‍ॅमेझॉनने खुलासा केला आहे की, त्यांच्याकडून या सेलमध्ये प्रीमियम स्मार्टफोन्सवर 10,000 रुपयांपर्यंत तर लॅपटॉप्सवर 35,000 रुपयांपर्यंतची सवलत मिळेल. या सेलदरम्यान कंपनीकडून  OnePlus, Xiaomi, Samsung, Apple, HP, boAt, Sony, Amazfit, Lenovo या ब्रँड्सच्या प्रोडक्ट्सवर भरभक्कम सूट मिळणार आहे. अ‍ॅमेझॉन काही निवडक ग्राहकांना बँकेच्या ऑफर्स देखील उपलब्ध करून देत आहे. एचडीएफसीमध्ये खातं असणाऱ्यांना डेबिट किंवा क्रेडिट किंवा EMI वरुन पेमेंट केल्यानंतर 10 टक्क्यांची इस्टंट सूट दिली जाणार आहे. या सेलमध्ये ग्राहक त्यांचे जुने स्मार्टफोन एक्सचेंज देखील करू शकतात. स्वस्तात मिळू शकतील अशा स्मार्टफोन्स आणि लॅपटॉप्सची यादी -यामध्ये  iPhone 11, iPhone 12 Pro, OnePlus 9, OnePlus 9 Pro, Samsung Galaxy Note 20 यासह अन्य डिव्हाइस समाविष्ट आहेत -मिड रेंजमध्ये OnePlus Nord CE 5G, Redmi Note 10 Pro Max, Redmi Note 10s, Samsung Galaxy M31s या स्मार्टफोन्सवर सवलत मिळेल. हे वाचा-Home Loan संदर्भात सुवर्णसंधी! मिळवा 10000 पर्यंत Amazon गिफ्ट व्हाउचर -अ‍ॅमेझॉनकडून या स्मार्टफोनवर मिळणाऱ्या सवलतीबाबत अद्याप कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही, मात्र या स्मार्टफोन्सवर डिस्काउंट मिळण्याची शक्यता अधिक आहे. -या सेलमध्ये Lenovo Tab M8 आणि Mi Notebook Horizon Edition यासारखे प्रसिद्ध लॅपटॉप कमी किंमतीत मिळतील -याशिवाय Boat Airdopes 441, OnePlus Buds Z आणि Sony WF-1000XM3 यावर देखील सूट मिळेल.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Amazon, Amazon subscription

    पुढील बातम्या