• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • Amazon Prime Day Sale 2021: 10000 रुपयांत खरेदी करा हे बजेट स्मार्टफोन, जाणून घ्या फीचर्स

Amazon Prime Day Sale 2021: 10000 रुपयांत खरेदी करा हे बजेट स्मार्टफोन, जाणून घ्या फीचर्स

तुम्ही जर अ‍ॅमेझॉन प्राइम मेंबर असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. अ‍ॅमेझॉनकडून प्राइम मेंबर्ससाठी 26 आणि 27 जुलै रोजी वर्षातील सर्वात मोठा सेल (Amazon Prime Day Sale 2021) असणार आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 18 जुलै: तुम्ही जर अ‍ॅमेझॉन प्राइम मेंबर असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. अ‍ॅमेझॉनकडून प्राइम मेंबर्ससाठी 26 आणि 27 जुलै रोजी वर्षातील सर्वात मोठा सेल (Amazon Prime Day Sale 2021) असणार आहे. 27 जुलै रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत हा सेल असणार आहे. यामध्ये तुम्ही खास ऑफर्स, डिस्काउंट्स मिळवू शकता. विविध इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस, स्मार्टफोन यांची खरेदी तुम्ही करू शकता. खास करुन तुम्ही स्वस्तात मोबाइलची खरेदी करू शकता. विविध दिग्गज कंपन्यांचे मोबाइल तुम्हाला 10000 रुपयांपर्यंत खरेदी करता येतील.  ओप्पो, शाओमी, सॅमसंग आणि इतर काही महत्त्वाच्या कंपन्यांचे मोबाइल तुम्हाला खरेदी करता येणार आहेत. काही एक्सक्लूझिव्ह देखील लाँच होणार आहेत, मात्र याबाबत कंपनीकडून कोणता तपशील शेअर करण्यात आलेला नाही. काही मोबाइल फोन्सवर 40 टक्क्यांपर्यंत देखील सूट मिळणार आहे. Micromax in 1 'मेड इन इंडिया' प्रोडक्ट्स अंतर्गत ग्राहकांना Micromax in 1 खरेदी करता येईल. याची 64 जीबी मॉडेलची किंमत जवळपास 10000 रुपये आहे. यामध्ये  Android 10 असून हा मोबाइल  MediaTek Helio G80 प्रोसेसरसह येतो. यामध्ये आणखी दोन सेन्सरसह रिअर कॅमेरा 48-मेगापिक्सेल आहे. हे वाचा-केवळ 49 रुपये प्रतिदिन EMI वर घरी घेऊन या ही टू-व्हीलर, जाणून घ्या फीचर्स Poco C 3 या स्मार्टफोनची किंमत 7,499 रुपयांपासून सुरू होते. स्मार्टफोन 6.35 इंचांच्या एचडी+ डिस्प्लेसह मिळतो आहे. यामध्ये MediaTek Helio G35 चिपसेट असून 4 जीबीपर्यंत रॅम आणि 64GB पर्यंत इंटरनट स्टोरेज आहे. हा स्मार्टफोन 5,000mAh च्या बॅटरीसह येत असून यामध्ये ट्रिपल रेअर कॅमेरा सेट करण्यात आळा आहे. यामध्ये 13 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा आहे. Realme Narzo 30A 8,999 रुपये किंमत असणारा Realme Narzo 30A हा पॉकेट फ्रेंडली फोन आहे. यामध्ये तुम्हाला 6.5-इंच HD + डिस्प्ले मिळेल आणि हुडमध्ये MediaTek Helio G85 चिपसेटसह येतो. यामध्ये ड्युअल सिम कार्ड सपोर्ट आहे. हा फोन रिअलमी यूआयसह अँड्रॉइड10 वर चालतो. यामध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप असून 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आहे हे वाचा-ही स्टार सीरिजची नोट खरी आहे की बनावट? विक्री केल्यास मिळेल इतकी किंमत Samsung Galaxy M1 या फोनची किंमत 9,999 आहे, यामध्ये 6.4 इंचाचा एचडी+ डिस्प्ले आहे. हूड अंतर्गत 4GB पर्यंत रॅम आणि 64GB पर्यंत इंटरनल स्टोरेजसह ऑक्टा-कोर प्रोसेसर मिळेल. स्मार्टफोनमध्ये 5,000mAhची बॅटरी आहे. यामध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा आहे ज्यामध्ये 13-मेगापिक्सलचा प्राइमरी शूटर आहे.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: