मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Home Loan संदर्भात सुवर्णसंधी! मिळवा 10000 पर्यंत Amazon गिफ्ट व्हाउचर; ही आहे शेवटची तारीख

Home Loan संदर्भात सुवर्णसंधी! मिळवा 10000 पर्यंत Amazon गिफ्ट व्हाउचर; ही आहे शेवटची तारीख

बीएचएफएल (BHFL) होम लोन घेणाऱ्या ग्राहकांना 10000 रुपयांपर्यंत अ‍ॅमेझॉन गिफ्ट व्हाउचर (Amazon Gift Voucher) मिळणार आहे.

बीएचएफएल (BHFL) होम लोन घेणाऱ्या ग्राहकांना 10000 रुपयांपर्यंत अ‍ॅमेझॉन गिफ्ट व्हाउचर (Amazon Gift Voucher) मिळणार आहे.

बीएचएफएल (BHFL) होम लोन घेणाऱ्या ग्राहकांना 10000 रुपयांपर्यंत अ‍ॅमेझॉन गिफ्ट व्हाउचर (Amazon Gift Voucher) मिळणार आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 18 जुलै: तुम्ही देखील घर घेण्याचं स्वप्न पाहत असाल तर तुम्हाला अशी सुवर्णसंधी पुन्हा मिळणार नाही. बजाज हाउसिंग फायनान्स लिमिटेड (Bajaj Housing Finance Limited) अर्थात बीएचएफएल (BHFL) त्यांच्या ग्राहकांना गृह कर्जावर (Home Loan) आकर्षक ऑफर्स देत आहे. बीएचएफएल होम लोन घेणाऱ्या ग्राहकांना 10000 रुपयांपर्यंतचे अ‍ॅमेझॉन गिफ्ट व्हाउचर (Amazon Gift Voucher) कंपनीकडून देण्यात येत आहे. दरम्यान ग्राहकांनी जाणून घेण्याची गोष्ट म्हणजे ही ऑफर केवळ 22 जुलै 2021 पर्यंत वैध आहे. बजाज हाउसिंग फायनान्सच्या वेबसाइटवरुन गृहकर्जासाठी अर्ज करणाऱ्यांना हे व्हाउचर मिळेल. ऑफरचा फायदा घेण्यासाठी केला जाणारा अर्ज 21 जून 2021 ते 22 जुलै 2021 दरम्यानचा असणं आवश्यक आहे.

50 लाखांपेक्षा जास्त कर्जावर मिळेल 10000 रुपयांचं गिफ्ट व्हाउचर

बजाज हाउसिंग फायनान्स लिमिटेडकडून मिळणाऱ्या या ऑफरच्या नियमानुसार एखाद्या ग्राहकाने जर पन्नास लाखापर्यंतचे कर्ज घेतले आहे तर त्याला पाच हजार रुपयाचे गिफ्ट व्हाउचर (Amazon Gift Voucher of 5000 Rs) मिळेल. जर ग्राहकाने पन्नास लाखांपेक्षा जास्त होम लोन घेतले आहे तर त्याला 10000 रुपयांचे गिफ्ट (Amazon Gift Voucher of 10000 Rs) व्हाउचर मिळेल. बजाज हाउसिंग फायनान्सकडून मिळणाऱ्या गृहकर्जावर कमीत कमी व्याजदर 6.75 टक्के आहे.

हे वाचा-आवडत नाही आधार कार्डावर असणारा PHOTO? या सोप्या स्टेप्स फॉलो करून करा बदल

काही कालावधीसाठी नाही वाढणार गृहकर्जावरील व्याजदर

अलीकडे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या झालेल्या पतधोरण आढाव्यामध्ये व्याजदरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेले नाहीत. याचा अर्थ असा की काही काळ तरी होम लोनवरील व्याज दर वाढणार नाही. गृहकर्ज देणाऱ्या दिग्गज कंपन्या 7 टक्क्यांपेक्षा कमी दराने कर्ज देत आहेत. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया (6.70%), बँक ऑफ बडोदा (6.75%), आयसीआयसीआई बँक (6.75%), कोटक महिंद्रा बँक (6.65%) यांचा समावेश आहे.

First published:

Tags: Bajaj finance, Home Loan